About

राउंड टेबल इंडिया चा असा विश्वास आहे कि हे आंबेडकरी युग आहे, जे स्वातंत्र्य, समता व बंधुता या आंबेडकरी आदर्श तत्वांच्या आधारावर एका नवीन समाजाची निर्मिती करण्याचे हे युग आहे. राऊंड टेबल इंडिया एक वृत्त आणि माहिती पोर्टल म्हणून, ज्याचा उद्देश मुख्यत्वाने दलित-बहुजन समाजाच्या प्रगतीचा आढावा घेणे, त्याबद्दल माहिती संकलित करणे, आंबेडकरी समताधिष्ठित समाजासाठी वेगवेगळया स्तरांतून होत असलेल्या प्रयत्नांची दाखल घेणे हा असेल.

अस्पृश्यता आणि जातींचे अस्तित्व नाकारण्यासाठी भारतीय समाज/प्रसार माध्यमानी नेहमीच इथल्या वर्चस्ववादी सामाजिक शक्तींना मदत होईल अशी भूमिका बजावली आहे. समाजातल्या अनिष्ट प्रथा, जातीव्यवस्था अबाधित राहील, या दृष्टीने समाज/प्रसार माध्यमे त्यांची जबाबदारी पार पाडत आले आहेत. तथाकथित मुख्यप्रवाही समाज माध्यमे आणि पर्यायी समाज माध्यमे हि वर्चस्ववादी सामाजिक शक्ती नियंत्रित करतात, जेव्हा “ईतर” तुमच्याकरिता जगाची व्याख्या करतात तेव्हा तुम्ही ते बदलू शकता का?

आंबेडकरी विचारधारेने प्रेरित नवउमेदीचा आवाज उंचावण्यासाठी राऊंड टेबल इंडिया काम करत आहे .

याच प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी मराठी-राऊंड टेबल इंडिया “भीमाच्या लेखण्या” या नावाने विस्तारित केले जात आहे. राऊंड टेबल इंडियाच्या लेखक, वाचक आणि वापरकर्त्यांसाठी “भीमाच्या लेखण्या” दलित-बहुजन आवाजाच्या विस्तृत अभिव्यक्तीसाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणून काम करेल. दलित-बहुजनांच्या अनुषंगाने येणाऱ्या अगणित विषयांची हाताळणी करण्यासाठी, इतिहासातील तसेच वर्तमानातील घटना, त्यावरील लेखन, काव्य, दृश्य स्वरूपातील अभिव्यक्ती “भीमाच्या लेखण्या” मध्ये, नियमित स्तंभांतून प्रकाशित केली जाईल.

नवउमेदीचे दलित-बहुजन जे ज्ञानार्जन करण्याच्या प्रक्रियेत आहेत त्यांच्यासाठी “भीमाच्या लेखण्या” एका ऑनलाईन ग्रंथालयाची भूमिका पार पाडेल. वेगवेळ्या पातळ्यांवर आंबेडकरी युग निर्माण करण्यासाठी जे प्रयत्नशील आहेत त्यांना जोडणे, त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेणे, त्यांच्या कार्याची ओळख करून देणे हा “भीमाच्या लेखण्या” चा उद्देश आहे. अंतिमतः तरुण दलित-बहुजन वर्गाला जोडणे, त्यांना संवादाच्या प्रक्रियेत आणणे, दलित-बहुजन सामाजिक दृष्टिकोन जाणून घेणे, आणि यासाठी आवश्यक त्या चर्चा घडवून आणण्यासाठी, आंबेडकरी युगासाठी “भीमाच्या लेखण्या” एक माध्यम असेल.