Round Table India
You Are Reading
माणुसकी मिळेल का? माणुसकी?
0
Features

माणुसकी मिळेल का? माणुसकी?

rupali 2

 

रूपाली माने-निकाळजे (Rupali Mane-Nikalje)

rupali  2मागील काही वर्षांत भारतामध्ये महिलांना पुरूषांच्या बरोबरीने समान संधी उपलब्ध व्हावी म्हणून राज्यघटनेच्या मुलभुत तत्वाचा आधार घेऊन या देशामधील महिलांना वेगवेगळ्या सवलतीच्या माध्यमातून त्याच्या मुक्तीचे नवे पर्व सुरू झालेले असुन सर्व महिलांपैकी काहीच महिला त्याचे फळ चाखत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात पालकांचीही साथ मिळत आहे. तसेच समाजातून महिलांनी केलेल्या कार्याबद्दल व त्यांच्या कतृत्वा बद्दल शाब्बासकी सुद्धा मिळत आहे. अशावेळी मात्र काही सत्तेमधील आणि सत्तेबाहेरील पुरानमतवादी लोक आजही महिलांना ‘अबला नारी’ च्या स्वरूपात संस्कृतीच्या नावाने गुलाम ठेवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करीत आहेत.

मागील काही घटनांचा वेध घेतला असता असे मानायला हरकत नसावी की, महिलांना जात-पात, धर्म, वंश, पंथ यामध्ये विभागणी करून संस्कार व संस्कृती पालनाची मोठी जबाबदारी स्त्रियांना देऊन, संस्कृतीच्या नावाने तीच्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय व अत्याचार करण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येक महिला कधी ना कधी, कुठे ना कुठे तरी शिकार झालेलीच आहे. अन्याय आणि अत्याचार यांच्या घटना वाढत असल्याचे स्पष्ट दिसत असतानाही आजही महिला जातीच्या, संस्कृतीच्या, धर्माच्या आणि विविध प्रकारे एकमेकांपासून वेगळ्या आहेत. बलात्कार हा अमानवी, अमानुष अत्याचार आहे.जात-पात, धर्म, वंश, पंथ कोणीही त्याचे समर्थन करने ही त्या व्यक्तीच्या मनातील विकृती आहे.

कोणीतरी येईल आणि स्त्रीयांना संरक्षण देईल या भ्रमात कुणी राहू नये. या देशात आजवर प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आणि माझ्या अनुभवातून असे दिसते की, दोन महिन्यांच्या चिमुकल्या मुली पासून ते पंच्च्याहत्तर वर्षाच्या आजीलाही या देशातील नराधमांनी सोडले नाही. यावेळी हे ओरडून आवरजुन सांगावे लागते की, तीने छोटे कपडे घातले….., जीन्स पॅन्ट घातली…., तीने असे केले…, तसे केले या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर बाळावत्या मध्ये असलेली चिमुरडी आणि नऊवारी साडी नेसून असलेली आजी, गावातील शेतकाम, ऊसकाम आणि शहरात आॅफिस मध्ये काम करणारी स्त्री सर्वच या पुरूष प्रधान प्रवृत्तीला बळीच पडलेल्या आहेत.

जात- पात, धर्म, वंश, पंथ यांच्या भांडणात नेहमीच स्त्रिला बदनाम केले जाते. आंतरजातीय/ आंतरजातीय धर्मीय विवाह, प्रेमसंबंध, शिवताशीवत, पावित्र्य अशा अनेक गोष्टींचा आधार घेऊन नेहमीच स्वतःच्या घरांमधील, समाजातील स्त्रीच्या संरक्षणाच्या नावाने तीच्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय व अत्याचार करण्यात आले आहेत.

 जोपर्यंत समाजामध्ये स्त्रीला “मादी”, “अबला ” आणि “दुबळी” म्हणून पाहिले जाईल आणि तसेच संस्कार लहानपणापासून रुजवले जातील तोपर्यंत अश्या घटना घडतच राहतील. त्यामुळे स्वतःच आता स्वतःचे रक्षक बनने काळाची गरज आहे. मुल्य शिक्षणाचा बाळकडू पाजुन चांगल्या आणि वाईट स्पर्शाची ओळख आणि त्याची जागृती करने, तसेच मुलींना योग्य वेळी स्वरक्षणाचे धडे देणे गरजेचे आहे. शेवटी स्त्री सुद्धा एक माणुस आहे आणि ती या जगामधील मोठ्या लोकशाही असलेल्या गणराज्यामध्ये वावरते, तेव्हा तिच्या नावाने होणारी भांडणे थांबवा, स्वातंत्र्यामध्ये समान संधी मिळावी म्हणून पुरूषांच्या बरोबरीने येण्यास वाव द्या आणि एवढंही नाही जमलं तर मुक्तछंद पणे आमची माणुस म्हणुन जगण्याची संधी हिसकावून घेऊ नका. आम्हालाही माणुस म्हणुन जगु द्या.

 ~~~

 

 

 Rupali Mane-Nikalje did her M.B.A. with Finance and HR and is now working on the issues of women belonging to the marginalized communities through the Savali Educational and Social Development Organization.