Bhagyesha Kurane
पुर्वाश्रमीचा अस्पृश्य समाज आजही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रहिवास करताना आढळतो.तसेच यापैकी ज्या जनसमुदायाने रोजगाराच्याशोधात शहरी भागामध्ये स्थलांतर केलेले आहे अशा समुदायापैकी जवळपास 70% समाज आजही झोपड़पट्टी भागात रहिवास करताना आढळतो.उर्वरित शैक्षणिक संधीचा हकदार वर्ग शहराच्या मध्यवस्तीमध्ये स्थिरावलेला दिसतो.निम्नस्तरीय झोपड़पट्टी व शहराच्या मध्यवस्तीत राहाणाऱ्या समाजामध्ये एक आर्थिक सामाजिक दरी कायम दिसून येते.झोपड़पट्टी भाग , वस्त्यांमध्ये राहाणाऱ्या समाजात शिक्षणाबाबत उदासीनता,शैक्षणिक संधींबाबत अनभिज्ञता,मार्गदर्शनाचा अभाव आढळून येतो.व याचेच पर्यावसन मग बेरोज़गारी,व्यसनाधीनता,दारिद्र्य,गुन्हेगारी यामध्ये झालेले आढळते.या वस्तीमध्ये राहाणाऱ्या तरुण वर्गाचे प्रबोधन कशाप्रकारे घडवून आणू शकतो , याबाबत विचार सुरू होता व या मधूनच साऊ रमाई बूक बँकेची संकल्पना अस्तित्वात आली.
आज आपल्या अनेक वस्त्यामध्ये लोकवर्गणीतून विहार उभे राहिल्याचे आढळते.या विहारांचा उपयोग सामुदायिक बौद्ध वंदने करिता दर रविवारी होत असतो.व इतरदिवशी हे विहार बंद ठेवले जातात.लग्न साखरपुडा बारसे असे कार्यक्रम करण्यासाठी देखील विहार वापरात आणले जाते.या कामांसाठी विहार वापरण्याऐवजी विहार हे ज्ञान ग्रहणाचे केंद्र बनले पाहिजे , विहाराचा उपयोग प्रबोधनात्मक कार्यक्रमासाठी , अभ्यास करण्यासाठी झाला पाहिजे असा विचार मनात आला.विहारांद्वारा वाचन संस्क्रुति रुजली पाहिजे या उद्देशातून सध्या पहिले पाऊल म्हणून वस्ती पातळीवरील प्रत्येक विहारांमध्ये ग्रंथालय सुरू करण्याचे योजले आहे.
बाबासाहेबांच्यावरील संदेशा नुसार आम्ही सर्व विद्यार्थी सामाजिक बांधिलकीतून या उपक्रमाचे कार्य पुढे नेत आहोत.आज पर्यंत एकूण 57000 रुपये लोकवर्गणीतून आम्ही जमा केले आहेत व चार लाइब्रेरी आम्ही सुरू केल्या आहेत.पुण्यातील वडारवाडी,गोखलेनगर,दत्तवाडीया वस्त्यांमध्ये तर रत्नागिरी जिल्ह्यातील मीठनगाव या वाडिमध्ये विहारांमध्ये ग्रंथालय उभे केले आहे.व इतर वस्त्यांवरही अशा लायब्ररी सुरू करण्याचा मानस आहे.
याचबरोबर लहान मुलांना विहारांत येण्याची सवय लागली पाहिजे.शिक्षणाची आवड निर्माण झाली पाहिजे.यासाठी विहारांना शैक्षणिक खेळणी,शैक्षणिक साहित्याचा पुरवठा आम्ही करत आहोत.याचसोबत graduation करणाऱ्या मुलांसाठी स्पर्धापरीक्षांची पुस्तके पुरवण्याचा प्रयत्न आहे.तरी या कामासाठी आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे.आपण या निमित्ताने आर्थिक अथवा पुस्तकरूपी मदत करून विहार_तेथे_ग्रंथालय ह्या उपक्रमास सहकार्य करावे अशी नम्र विनंती.
~~~
Bhagyesha Kurane has a B.A. in political science from Fergusson College and Co-founder of Sau_Ramai Book Bank.