शुभांगी जुमळे
बौध्द धर्मात भिक्खुणी संघ हा स्त्रियांच्या शिक्षणासाठीआणि आध्यात्मिक वैचारिक तत्वज्ञान विकासासाठी एक महत्त्वाचा घटक होता.बुध्द संघात स्त्रीया शिक्षणासाठी सामील झाल्यामुळे स्वतःच्या अस्तित्वाची, हक्काची, लढण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. भिक्खुणी संघातील थेरीच्या जीवनगाथा संग्रह थेरीगाथा. भिक्खुणी होण्याआधी जीवन त्यांची पूर्व आयुष्यातील परिस्थिती बुध्द संघात राजघरण्यातील स्त्री ते सामान्य कुटूंबाची स्त्री प्रवेश होता.तत्कालीन स्त्री समाजातील स्थान कसे होते बौध्द संघातील ज्ञानप्रबोधना मुळे स्त्रीयाच्या जीवनात आमुलाग्र बदल झाला. भिक्खुणी संघातील स्थान मानाचे दिल्या गेले.ज्या ऐतिहासिक कालीन स्त्री शिक्षणाचा अधिकार नव्हता. पण बौध्द धर्मातील स्त्री शिक्षण ते बौध्द संघातील भिक्खुणी प्रवेश देऊन स्त्री ला समानतावादी स्वातंत्र्याचा उद्दघोषक करणारे तथागत गौतम बुद्ध पाहिले महामानव होते.
कारण वैदिक काळात स्त्री ह्या प्रकारचे मानाचे स्थान स्वातंत्र्य नव्हते. पण बौध्द कालीन ज्ञान प्रबोधनाचे वैचारिक तत्वज्ञान आचरण विचारातून त्याच्या भिक्खुणी संघामध्ये अध्ययन, अध्यापन वैचारिक शिक्षण ,शिक्षक ,शिकवण ह्यामुळे ज्ञानदान व ज्ञानार्जन करणारा बुध्दिमान भिक्खुणी गण तयार झाला. भिक्खुणी धममदिना उत्तम अध्यापन शिक्षक, श्रेष्ठ विद्वान धम्मकथीका म्हणून प्रसिद्धीस आल्या.
भिक्खुणी संघातील नियम ज्याला विनय म्हटले .भिक्खुणी संघाच्या नियमानुसार ज्या भिक्खुणी मार्गदर्शन, मार्गदर्शिका म्हणून कार्यरत त्याच्या कडे अध्यापनासाठी आलेल्या शिष्यगण विनयाचे नियमानुसार पालन पंधरा दिवसांनी होणारया प्रवचनातून थेरी भिक्खुणी मार्गदर्शन करीत.ज्या भिक्खुणी संघातील वीस वर्षे ज्ञानाचे काम केले .अश्या विद्वान भिक्खुणीस मार्गदर्शक बुध्द संघात ज्ञानात्मक कार्य करता येत असे.
विनया नियमानुसार आठ नियमांचे पालन करणे अपरिहार्य असे त्यांना विद्वान भिक्खुणी मध्ये महाप्रजापती गौतम जेष्ठ वरीष्ठ भिक्खुणी ते सिघंलक माता धम्मावर नितांत विश्वास असणारया. श्वेमा महाज्ञानी
बुध्द कालीन स्त्री पुरुषाच्या ते बुध्द संघातील भिक्खु भिक्खुणी अध्ययन अध्यापन समानता होती .प्रत्येकाला समान वैचारिक तत्वज्ञान ते ज्ञानार्जन करणायाचा अधिकारी होता.
समानतचे तत्त्वज्ञान विशद करणारे उदाहरण संयुक्त निकायातील भिक्खुणी संयुक्तामधिल सोमा सुत्तपटिका मध्ये सोमा भिक्खुणीच्या मारा सोबत झालेल्या संवादातून हे स्पष्ट होते.सोमा भिक्खुणी ध्यान करीत असतांना मार त्यांना म्हणतात,
जे स्थान ऋषींना मिळणे कठीण आहे. ते दोन बोटाची जिची प्रज्ञा त्या स्त्री भिक्खुणी ला मिळणे शक्य नाही. यावर सोमा भिक्खुणी उत्तर देतात ‘ चित्त उत्तम प्रकारे समाधान पावले असता आणि ज्ञानालाभ झाला असता सम्यकपणे धम्म जाणणारया व्यक्तीला स्त्रीत्व कसे आड येणार? ज्या व्यक्तीला स्त्री, पुरूष आहे .हा अंहकार असेल त्याला माराने या गोष्टी सांगाव्या सोमा भिक्खुणीने माराला दिलेल्या उत्तरावरून चुल्लवेदल्ल सत्ता मध्ये तथागत सांगतात अर्हत्वपदास नेणारया धम्म मार्ग जसा पुरूषांच्या करता मोकळा आहे.तसाच स्त्री भिक्खुणी साठी ज्ञानाचा मार्ग मोकळा आहे.यावरून बुध्द कालीन संघातील स्त्रियांचा दर्जा पुरूषांच्या एवढांच आहे हे सिद्ध होते.
बुध्द विचारांचे तत्वज्ञान आचरणात अध्ययन,व अध्यापन स्त्री पुरुष समानता अडीच हजार वर्षांपूर्वी बुध्दकालीन स्त्री उंबरठे सोडून वैचारिक धम्माच्या मुख्य प्रवाहात आल्या पालि भाषेतील रचलेल्या थेरीगाथा ग्रंथात बुध्द कालीन भिक्खुणी स्वतःची पद्दमय स्मृती मनोगते आहे. ह्यामुळे अध्ययन अध्यापन धम्म, वैचारिक तत्वज्ञान प्रगती ही बुध्दकालीन भिक्खुणी बुध्द संघातील दिसून येते.संघात भिक्खुणी प्रवेश देऊन तथागत गौतम बुद्ध ह्यांनी स्त्री मुक्तीची शिक्षण शिक्षक अध्ययन अध्यापन पाऊलवाट निर्माण करून दिली होती.
शुभांगी जुमळे
शुभांगी जुमळे ह्या शिक्षिका असून आंबेडकरी, बौद्ध साहित्याच्या अभ्यासक संशोधक आहेत.
[ ९६८९८२५६२३ ]

Leave a Reply