सचिन आनंद तुपेरे
कुठं गेलं रे ब्राह्मण Studies?
कुणी लिहितंय का
“सवर्ण विचारसरणीचं सामाजिक अन्वयार्थ”?
का ते ‘standard syllabus’मध्ये आधीच गिळलंय?
तुमचा अकॅडेमिक चिखल —
जिथं Dalit Studies नावाचा विभाग आहे,
जणू आम्ही माणूस नव्हे, तर प्रयोगशाळेचा विषय.
तुमचं “research ethics”
आमचं आयुष्य विषय करतं
पण अत्याचार करणाऱ्याची जात?
ती तुमच्या hypotheses मध्ये
unmarked variable म्हणून पुसून टाकलेली.
तुमच्या विद्यापीठात
मी फक्त “case study” आहे.
तुम्ही म्हणता —
“Dalit experience matters!”
पण माझ्या अनुभवाला
तुमच्या नोट्समध्ये पानच नाही!
तुम्ही लिहता —
“Subaltern Identity in Post-colonial India”
पण माझं नाव
तुमच्या कॉन्फरन्समध्ये
स्पेलिंग मिस्टेक होऊन छापलं जातं.
“Voice of the Marginalized” म्हणता —
पण आमचा आवाज
तुमच्या एसी हॉलमध्ये
माईक घेऊन फक्त सवर्ण बोलतात.
पण तुमच्या स्टेजवर
मी बूट घालून गेलो,
तर कार्यक्रमाची थीम बदलते —
“Caste and Modernity”
Panel मध्ये चार upper-caste liberal बसवून
परिसंवादाच नाव सामाजिक समता ठेवतात
आणि discussion करतात –
“Is caste still relevant?”
Is caste still relevant?
भावड्या it’s evolved, upgraded, mutated….
सचिन आनंद तुपेरे
– गंगापूर, औरंगाबाद.
-9096421337

Khup chann dada