नामदेवा…

सिद्धार्थ कांबळे शब्दांच्या दुनियेतशून्य फोडत जाणारातू क्रियाशील तत्ववेत्ताविवस्त्रतेच्या मूलस्रोतांचीअखंड मांडणी करणाराएका युगाचापक्षपाती भाष्यकारआणि म्हणूनअसतो आविर्भावातअगदी आनंदिकतुझ्या अभंगाच्या अर्थाला प्रकट करतानाआतमध्ये रुतवताना… आम्ही-शब्दांचे बुरुज चढतोतुझ्या तात्त्विक स्वरांचं प्रकटीकरण करतोतुझ्या ओवींच्या श्लीलतेचीविस्कटलेल्या तर्क-वितर्कातूनमोजणी करतो बांधणी करतोसफळ -निष्फळ …याउपरदेतो संदर्भ ऐतेहासिक अघोरीपणाचेपेरतो सुरुंग राजरोसरोखतो आरोपांच्या फैरीउद्ध्वस्त करतो सनातनी इमलेआणि प्रसवतो आमच्या माणूसपणाच महाकाव्यतुझ्यामार्फत… […]

प्रिय पँथर…

सिध्दार्थ कांबळे प्रिय पँथर… हा फक्त लढा नाहीहे –हा आहे तुझ्या माझ्यातल्या अणू-रेणूंच्या उत्सर्जित कणांचं चिरायूत्वग्रहगोल उत्थापनाच्या संदर्भात पेटलेला धगधगता अग्निडोहसर्वांगिण सार्वभौमत्वाचा आशावादी उरूसहा फक्त पक्षपाती तिटकारा नाहीहे –तर जात धर्म युद्धाच सर्वोतपरी अनहिलेशन ! तू फक्त इतक्यात डोळे मिटू नयेनिष्प्रभ खडकांचा इतिहास जागवू नयेहळूहळू निद्रा चिरकाळ नांदु पाहतेयशून्याचा पसारा […]