के. राम भाऊ

बहुजन समाजात बुध्द, शिवाजीराजे, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णा भाऊ साठे आदी महानायकांच्या चळवळीमुळे आणि भारतातील बहुजनवादी आंबेडकरी चळवळीमुळे अनेक नेते घडले आणि समाजाप्रती आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करुन आंबेडकरी चळवळ व विचारधारा शेवटच्या घटकापर्यत पोहचवण्यासाठी जिवाची प्राण आहुती दिली.
महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळीत बौध्द(पूर्वीचे महार) व मातंग समाजात अनेक नेते या चळवळीमुळे घडले, तर उत्तर भारतात मा.कांशिरामजी साहेब,दिना भानाजी सारखे प्रखर बहुजनवादी आंबेडकरी नेते समाजाला मिळाले!
भारतात बहुजनवादी आंबेडकरी चळवळीचा प्रभाव आंबेडकर व आंबेडकरोत्तर काळात खुप मोठ्या प्रमाणात पडल्याचा बहुजन समाजात दिसतो.त्यामुळे महार/बौध्द समाजा व्यतिरिक्त इतर बहुजन समाजात सुध्दा तेवढाच प्रभाव परिवर्तनाच्या रुपाने पाहाण्यास मिळतो!

बाबासाहेबांच्या हयातील बहुजन समाजातील अनेक सहकारी त्यांच्या कार्यामुळे प्रभावीत होवुन आंबेडकरी चळवळीत सामिल झाले होते!त्या चळवळीचा परिणाम आंबेडकरोत्तर काळात वाढत गेला.पुढे आरपीआय,पँथर व बामसेफ या पक्ष व संघटनामुळेही प्रभाव पडला हे सुध्दा ऐतिहासिक सत्य आहे!पण बामसेफमुळे सर्वात जास्त प्रभाव पडल्याचे दिसते.
आरपीआय व पँथर मुळे केवळ बौध्द व मातंग समाजात थोड्याफार प्रमाणात,पण परिणामकारक परिणाम झाल्याचे दिसते,कारण या पक्षाने व संघटनेने केवळ एका जाती समुहापुर्ते मर्यादित राहुन काम केल्यामुळे जो डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा परिवर्तनाचा प्रभाव मात्र पाडता आला नाही.
पण बामसेफमुळे मात्र विविध जाती,जमाती व धर्म परिवर्तित समाजाला मात्र खडबडुन जाग आली आणि आंबेडकरी विचारधारेत इतरही जातीसमूहातील जनतेचा सहभाग वाढुन नवे नेतृत्व उदयास आले!
याच आंबेडकरी चळवळीच्या सामाजिक परिवर्तनादी अभिसरणातुन परिवर्तनाची नांदी सुरु झाली ती बहुजन मातंग समाजात!या परिवर्तनामुळे मातंग समाजात वेगवेगळ्या प्रकारचे अनेक नेतृत्व उदयास आले.या परिवर्तनाच्या क्रांती यज्ञातुनच मातंग समाजात एक नेतृत्व विसाव्या शतकाच्या उत्तर्धात म्हणजे १९८० नंतर महाराष्र्टात जन्मास आले.ज्यांच्या परिवर्तनवादी क्रांतीने महाराष्र्टातील समस्त मातंग समाजाला ब्राम्हणी हिंदु धर्माच्या बेड्यातुन बाहेर पडण्यासाठी स्वातंत्र्याची हाक देणारे. ॲड एकनाथजी आव्हाड ऊर्फ जिजा यांचा जन्म झाला.महार बौध्द व मातंग समाजाच्या लहानापासुन ते वयोवृध्द व्यक्तीच्या ओठावर ज्यांच नाव अमर राहिले ते जिजा!

मातंग समाज महार समाजाप्रमाणेच भारतीय समाजव्यवस्थेत ब्राम्हणी गुलामीत खितपत असलेला एक समुदाय जो धर्म देव अंधश्रध्दा उपवास तापास आदी गुलामीच्या चिखलात रुतलेला समाज!पण याच समाजात जिजांचा जन्म व्हावा हे बहुतेक निसर्गालाही मान्य असावे म्हणुन लहुजी साळवे, मुक्ता साळवे, आण्णा भाऊ साठे यांच्यानंतर मातंग समाजाला बौध्द धम्माच्या वाटेवर आणण्यासाठी जिंजा येणे क्रमप्राप्त ठरले आहे!
जिजांचा जन्मच मुळात गावगाड्याच्या गावकुसात अठराविश्व दारिद्र असलेल्या आणि ब्राम्हणी धार्मिक समाजव्यवस्थेनुसार “पोतराजकी” ज्या समाजाची व कुटुंबाची “मालकी” म्हणून लादली त्यात झाला.वडिल पोतराज होते ज्यामुळे घरातील सदस्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटत होता!वडिलाची इच्छा होती की,जिजांनी पुढे त्यांचा वारसा चालवुन पोतराज व्हावे आणि गावच्या गावकीत जीवन जगावे,पण ते निसर्गालाच मान्य नव्हते.जिजांच्या शिक्षणाला वडिलांचा विरोध होता,पण “एका कृर्तृत्वान पुरुषाच्या यशाच्या मागे स्रीचा हात असतो!”त्याप्रमाणे जिजांना त्यांच्या आईमुळे “बाबासाहेबांच्या भाषेतील वाघिणीचे दुध” पिण्यास मिळाले आणि ब्राम्हणी व्यवस्थेला टक्कर देण्यासाठी/उलथुन टाकण्यासाठी,मातंग समाजासह बहुजन समाजाला ब्राम्हणी गुलामीतून बाहेर करण्यासाठी बाबासाहेबांच्या चळवळीत घडलेला समाजसुधारक निर्माण झाला.जिजांनी कायदा/लाॅ व समाज कार्य/एमएसडब्लु चे शिक्षण समांतर पध्दतीने पुर्ण केले आणि समाजकार्यास सुरुवात केली.
मुळात जिजा विद्यार्थी असतानाच आंबेडकरी चळवळीच्या प्रभावामुळे समाजिक जाणिवेतुन चळवळीत सामिल झाले आणि बहुजन महामानवांचे अनुयायी बनुन समाजाप्रती काम करण्याची “भिमप्रतिज्ञा” घेतली!
मातंग समाजाला ब्राम्हणी हिंदु गुलामीतुन बाहेर काढण्यासाठी जिजांनी सर्वात प्रथम “क्रांती”ची सुरुवात समाजात करण्याआधी आपल्या कुटुंबातुन सुरु केली!मातंग समाजातील “पोतराज” या धार्मिक गुलामीला लाथाडण्यासाठी पहिला प्रयत्न वडिलांचे केस कापुन क्रांतीची सुरुवात केली.हा त्यांचा भारतातील ब्राम्हणी हिंदु धर्म ठेकेदारांच्या जिव्हारी सर्वात मोठा वार होता!नंतर या परिवर्तनाची आग महाराष्ट्रातील मातंग समाजासह इतर बहुजन समाजात सुध्दा त्यांनी लावली हा इतिहास आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील “सोनेरी पान” आहे हे बहुजन समाजाला कदापिही विसरुन चालणार नाही!पोतराज रूढी बंद करून,अस्पृश्यता,जातीवाद,धर्मवाद,अंधश्रध्दा,वेठबिगारी,गावकी,संध्याकाळी मारुतीच्या मंदिरासमोर डफ वाजवणे अशा अनेक ब्राम्हणी गुलामीचे प्रतिक असणार्या ब्राम्हणी चाली व रुंढींना मुठमाती देत त्याविरोधात क्रांती व परिवर्तनाचे हत्यार उपसले आणि बीड जिल्हाच्या भुमी परीवर्तनाने आधुनिक काळात हादरुन सोडली!हाच जिजांचा “आंबेडकरवाद” जो आण्णा भाऊंनी “जग बदल घालुन घाव” या मधून प्रतिबध्द केला आहे!
पुढे आंबेडकरी चळवळीत स्वत:ला झोकुन देत मातंग समाजासह इतर बहुजन समाजाला जागे करण्यासाठी समाज परिवर्तनाचे “कंकण” हातात बांधुन अखंड महाराष्ट्र सामाजिक परिवर्तनाने “प्रबुध्द” करण्यासाठी “सामाजिक भिक्खुत्व” स्विकारले!
बीड जिल्हा आणि “गायरान जमिन” म्हणले की, आपसुकपण समोर उभ राहातात ते जिजा!महार,बौध्द,मातंग,पारधी,कैकाडी,वडारी आदी गावकुसाबाहेर व गावाच्या माळराणावर राहुन जीवन जगणार्या या समाजातील भुमीहिन कुटुंबाला “गायरान” जमिन कसून जीवन जगता यावे म्हणुन महाराष्ट्राला हादरा देणारे जिजा आहेत,म्हणुनच त्यांच्या या “गायरान जमीन आंदोलना”ची अमेरिकेत असणार्या “संयुक्त राष्ट्र संघ/United Nation” जागतिक स्तरावर दखल घेतली पण भारतातील ब्राम्हणी सरकार व शासन व्यवस्थेला दखल घेता आली नाही हि भारतासाठी शरमेची बाब आहे.आज बीडसह महाराष्ट्रात महार,बौध्द,मांतग,पारधी आधी भुमीहिन समाज शेती करुन जगत आहे.
जिजांनी याच गायरान आंदोलनातुन अनुसुचित जमातीमधे मोडणारा “पारधी” समाज मुख्य समाज व्यवस्थेत आणण्यासाठी सर्वात प्रथम प्रयत्न केल्याचा इतिहासाला नोंद घ्यावी लागते.आज जो महाराष्ट्रातील पारधी समाज आंबेडकरी/बहुजन चळवळ व विचारधारेला जोडुन स्वत:चा विकास साधत आहे त्याला कारणीभुत जिजा आहेत!त्यांच्यामुळे पारधी समाजात अनेक कार्यकर्ते,सामाजिक नेते समाजात निर्माण झाले.बीड जिल्ह्यात सुमित्रा पवार व पुणे जिल्ह्यात सुनिता भोसले या दोन महिला सामाजिक कार्यकर्त्या पारधी समाजाला आणि महाराष्ट्राला मिळाल्या आहेत,हे जिजांचे “आंबेडकरीत्व” काळ्या दगडावरची पांढरी रेषा असलेले सामाजिक अभिसरणाचे “क्रांती पर्व” मानावे लागते!हा त्यांचा १९८० च्या दशकातील सामाजिक कार्याचा सामाजिक परिवर्तनाचा लढा आहे!
नंतर पुढे १९९० च्या दशकात मातंग समाजासह इतर समाजात आत्मसन्मानाची स्वाभिमानी चेतना निर्माण करण्यासाठी १९९० मधे “मानवी हक्क अभियान” नावाचे मानवी मुक्तीचे संघटन उभे केले आणि “संगम” या गावी पहिली शाखा स्थापन केली आणि मातंग समाजासह इतर समाजाला ब्राम्हणी व्यवस्थेच्या विरोधात लढा लढण्यासाठी क्रांतीचा मार्ग दाखवला.या संघटनेचा झंझावात मराठवाडा काबिज करत प.महाराष्ट्र,विदर्भ,प.खानदेश सह महाराष्र्टाबाहेर द.मध्य प्रदेश,आंध्र प्रदेश,मादिंगा बहुल कर्नाटक व तमिळनाडु पर्यत पोहचला!
मला चांगले आठवते की,आमच्या आष्टी तालुक्यात मानवी हक्क अभियान या संघटनेचा चांगला प्रभाव वाढला होता आणि तालुका प्रभारी म्हणुन आमच्या महार/बौध्द समाजातील एका सामाजिक कार्यकर्त्याकडे दिला होता.जिजांनी नुसते स्वसमाजाला प्राधान्य न देता इतरही बहुजन समाजातील घटकांना त्यात सामावुन घेतले होते आणि बीड जिल्ह्यात महार बौध्द मातंग पारधी वडारी कैकाडी या समाजावर होणार्या जातीय अन्यायाला वचक बसवण्यासाठी “सामाजिक संघटन” म्हणुन मजबुत केले होते!
जिजा हयात असताना बहुजन समाजातील आर्थिक दारिद्र्यात असणार्या कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यासाठी बीड जिल्ह्यातील भुमिहिन,शेतमजुर,बिगारी कामगार आदी आर्थिक चणचण असणार्या समुहातील स्रीयांसाठी ग्रामिण भागात “बचत गटा”ची निर्मिती केली आणि आर्थिक स्थर सुधारण्यासाठी प्रयत्न केले!”सावित्रीबाई फुले म्युच्युयल बेनिफिट ट्रस्ट” नावाची अशिया खंडातील महिलांनी महिलांसाठी चालवली जाणारी पहिली “महिला पतसंस्था” जिजांनी स्थापन केली आणि अनेक कुटुबांना गरिबीच्या दारिद्र्य रेषेखालुन कायमचे बाहेर काढले.यातुन जिजांनी बाबासाहेबांना अपेक्षित असणारे “आर्थिक समतावादी समाज जीवन” अधारीत असलेले बाबासाहेबांचे आर्थिक समतावादी विचार बहुजन समाजात पेरताना दिसतात.आजघडीला हि पतसंस्था महाराष्र्टातील मराठवाड्यात पाच जिल्ह्यांमधे कार्यरत असल्याचे दिसते.२०२० पर्यत या पतसंस्थेचा आर्थिक विकास सुमारे २० कोटी रु.पर्यत असल्याचा दिसतो!
संयुक्त राष्र्ट संघ जगातील अनेक देशातील नेते,कार्यकर्ते,समाजसुधारक यांना आपल्या कार्यक्रमात बोलावुन विविध विषयांवर चर्चा घडवुन आणते आणि त्यासाठी उपाय योजना काढण्यासाठी प्रयत्न करत असते!आज पर्यंत युनोमधे भारतातील अनेक प्रतिनिधी तेथे गेले पण म्हणावे तसे प्रश्न तेथे उपस्थित केले नाहीत.एव्हाना युनो जेव्हा स्थापन झाली,तेव्हा भारताने जगात होत असलेल्या “वंशवादा” विरोधात सर्वात प्रथम आवाज उठवला,पण भारतात असलेल्या “वर्ण व जात” व्यवस्थेविरोधात मात्र एक चकार शब्द काढला नाही,भारताची युनोमधील वास्तविकता आहे.याला अपवाद ठरले ते जिजाच!

२००१ साली जिजांना युनोच्या मुलनिवासी समाजावर जागतिक स्तरावर काम करणाऱ्या समितीने आमंत्रण दिले होते.तेव्हा जिजांनी भारताचे आणि बहुजन भारतीय समाजाचे प्रतिनिधी म्हणुन सर्वात प्रथम “जातीवाद व अस्पृश्यता” यावर प्रश्न उपस्थित करुन भारतातील ब्राम्हणी समाज व्यवस्थेची “असमानतावादी/विषमतावादी” समाज व्यवस्था कशी आहे?जी मानवी मुल्यांना दिवसाढवळ्या पायदळी तुडवत आहे हे दाखवुन दिले!जिजांच्या आधी बाबासाहेबांनी आपल्या”जाती व्यवस्थेचे विध्वसंन” व “जातीचा उगम विकास” या संशोधनपुर्ण संशोधनातुन भारतीय ब्राम्हणी समाज व्यवस्थेतेचे “लक्तरे” जगाच्या वेशीवर टांगली होती आणि त्यानंतर जिजांनी मोका पाहुन प्रथमत: युनोत हा विषय मांडणारे पहिले भारतीय बहुजन ठरतात हे आमच्या बहुजन समाजाला माहित नाही,कारण ब्राम्हणांनी ही गोष्ट आमच्या बहुजन समाजापासुन हेतुपुरस्पर लपवून ठेवली आहे!पुढे जिनिव्हा येथे युनेस्कोच्या “मानवी हक्क संरक्षण संमेलना”त जिजांनी भारतातील “जात”जातीवाद व जाती व्यवस्था” नष्ट करण्यात यावी म्हणुन हल्लाबोल केला,हे देखिल आमच्यापासून ब्राम्हणांनी लपुन ठेवले.एकंदरीत भारतातील बहुजन समाज देखिल एक मानव प्राणी आहे ज्याला निसर्गाने जन्माला घातले आहे त्याला माणुस म्हणुन जीवन जगता यावे आणि मानवी हक्क मिळावेत म्हणुन आपल्या कार्यासह युनोला दखल घ्यायला लावणारे इतिहासाच्या पानात न सापडणारे जिजा मात्र युनोत आमच्यासाठी भांडले हे महत कार्य न विसरणारे आहे!अशा प्रकारे जिजांनी महाराष्र्टातील बीड जिल्ह्यापासुन थेट अमेरिकेतील युनोपर्यत आपल्या परिवर्तनादी/क्रांतीकारी कार्याचा ठसा उमटवला असल्याचे दिसते!
जिजा सामाजिक परिवर्तनाचे काम करत असताना देखिल राजकिय कार्यातही सहभागी होते.ग्रामपंचायत पासुन जिल्हा परिषदेच्या राजकाराणाचा त्यांनी आंबेडकरी विचारांचा टप्पा गाठला,पण आमदारकीची निवडणुक मात्र त्यांच्या आयुष्यातील जीवघेणी भरारी होती.१९९५ साली मा.कांशिरामजी साहेब हयात असताने जिजांनी उस्मानाबाद विधानसभेची निवडणुक लढवली.विरोधक स्वकियच लक्ष्मण ढोबळे होते.निवडणुक प्रचारा दरम्यान सभांमधुन जी खडाजंगी झाली त्याचा परिणाम म्हणुन जिजांवर “प्राणघातक” हल्ला झाला होता.
हि घटना जिजांच्या आंबेडकरवादावर झालेला ब्राम्हणी व्यवस्थेचा अप्रत्यक्ष हल्ला होता.तरीही जिजा थांबले नाहीत.
सामाजिक,धार्मिक,राजकिय,आर्थिक आदी क्षेत्रात आपल्या परिवर्तनावादी कार्याने स्वत:ला झोकुन देवून बाबासाहेबांचा सच्चा अनुयायी म्हणुन जीवनाच्या शेवटच्या टप्पावर मात्र न थांबता आक्टोबर २००६ साली नागपुरच्या दिक्षा भुमीवर बहुजन समाजाला ब्राम्हणी ” हिंदू “धर्माच्या गुलामीतुन बाहेर पडण्यासाठी “बौध्द धम्म” बाबासाहेबांनी दिला होता तो जिजांनी मातंग समाजासह पारधी समाजातील बांधवासह स्विकराला.हि त्यांची धार्मिक परिवर्तनाची नांदी मात्र मातंग समाजासह इतर बहुजन समाजाला झोपेतुन खडकन जागी करणारी ठरली आणि जिजांच्या या धार्मिक क्रांतीने मांतग समाजाला बौध्द धम्माच्या वाटेवर नेणारा खरा बाबासाहेबांच्या विचारांचा वारसदार आणि बुध्दांच भिक्खुत्व स्विकारणारा “क्रांतीचा सिंह” मिळाला!
जिजांनी आपल्या हयातीत अनेक ठिकाणानी सभा संमेलनातून बहुजन महामानवांच्या चळवळीचा,कार्याचा आणि विचारांच्या मानवी उत्क्रांतीचा विकासाचा संदेश दिला.शेवटपर्यत बाबासाहेबांचा “आंबेडकरी कार्यकर्ता” म्हणुन जीवन जगले हे त्यांचे व्यक्तीमत्व बहुजन समाजासाठी एक क्रांती आणि ऊर्जेचे केंद्र ठरल्याशिवाय राहात नाही.
जिजा जे जीवन जगले आणि त्यातुन त्यांना जे ज्ञात झाले त्या सर्व क्रांतीकारी परिवर्तनवादी अभिसरणाचा परिपाक म्हणुन बहुजन समाजाला मानवतावादी बहुजन महामानवांच्या विचारकार्याचा पाया असलेले “जग बदल घालुन घाव” हे आत्मचरित्र बहुजन समाजाला मार्गदर्शक म्हणुन ऐतिहासिक दस्तऐवजाच्या रुपात स्वाधिन केला!
आजपर्यत भारतातील अनेक संशोधकांनी त्यांना शब्दबध्द करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे त्यांच्या कार्याची व विचारांची दखल घेत ५ संशोधित पुस्तके त्यांच्या जीवनावर लिहिली गेली आहेत,तर २७ संशोधकांनी चक्क त्यांच्या संपुर्ण आयुष्यावर PhD/संशोधन प्रबंध लिहिले आहेत,हे जिजांचे सर्वात मोठेपण आहे!
के. राम भाऊ
लेखक बीड येथील रहिवासी असून कामानिमित्त हैदराबाद येथे असतात.

Leave a Reply