जयभीम, मी दौलत !

दौलत सिरसवाल

जयभीम माझं नाव दौलत गुरुबच्चन सिरसवाल,
मी औरंगाबादेतील उस्मानपुरा या भागात राहतो, आणि BCA च्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी आहे. माझा जन्म वाल्मिकी समाजात झाला, आजपर्यंत प्रस्थापित पक्षांनी माझ्या समाजाचा हिंदू रक्षक म्ह्णून असो, कि हिंदू-मुस्लिम देश म्हणून असो, एक हिंदुत्ववादी म्हणून पुरेपूर उपयोग करून घेतला. आणि यातून ते त्यांची राजकीय पोळी भाजून घेण्यात, त्यांची सत्ता अबाधित राखण्यात यशस्वी झाले आहेत. या अनेक कारणांनी माझा समाज प्रेम आणि मित्रत्व यापासून वेगळा ठेवला गेला आहे. या राजकीय पक्षांनी आजपर्यंत माझ्या समाजासाठी काहीही केलेलं नाही. ते माझ्या समाजासाठी UPSC/MPSC चे क्लासेस देऊ शकत होते, शिक्षणाच्या संधी देऊ शकत होते परंतु माझ्या समाजासाठी काय दिलं तर वर्ल्ड टॉयलेट कॉलेज. या पक्षांना वाटते कि माझ्या समाजाचा निव्वळ उपयोग करून घ्यावा आणि आम्ही फक्त मैला सफाईचेच काम करावे .

१९९३ मध्ये मैला सफाईचा कामावर बंदी आणली आहे, हाताने मैला साफ करण्यावर बंदी घातली आहे, पण आजतागायत माझा समाज ह्या कामापासून दूर जाऊ शकलेला नाही, तो आज हि मैला सफाईचे काम करतो, हे काम करत असताना अनेकांचे विषारी वायूच्या संपर्कात आल्याने बळी गेले आहेत. आजही माझ्या समाजातील जवळपास ८० टक्के लोक निरक्षर आहेत आणि त्यांच्या कडे हे काम करण्या व्यतिरिक्त इतर कुठला पर्याय उपलब्ध नाही.


लहानपणी मी सुद्धा, अंधश्रद्धा, हिंदुत्व, धर्म यात खूप अडकून गेलेलो होतो, पण माझे शिक्षण सुरु असताना मी फॅम-फेस ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंट या संघटनेच्या संपर्कात आलो आणि इथे आल्यावर मला आंबेडकरवाद काय आहे, बुद्धाची शिकवण काय आहे, स्त्रियांसाठी, अस्पृश्यांसाठी शिक्षणाची सोय करणारे फुले दाम्पत्य कोण आहेत याची ओळख झाली. मैत्री आणि आपुलकी काय असते याची जाणीव मला फॅम च्या संपर्कात आल्यावर झाली. “एक वही – एक पेन अभियान” या फॅम च्या क्रांतिकारी कार्यात मी सहभागी आहे हे मी अभिमानाने सांगू शकतो. यासाठी मी फॅम चा ऋणी आहे.

आजपर्यंत माझ्या समाजासाठी राजकीय पक्षाच्या बाबतीत कुठला पर्याय उपलब्ध नव्हता, पण आता मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने तो पर्याय दिसत आहे, मैल सफाईचा कामावर बंदी, KG – PG मोफत शिक्षण आणि पर्यायी उपजीविकेचे साधन निर्माण करण्याचे त्यांनी जे आश्वासन दिले आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मी माझ्या समाजातील सर्वांना बाळासाहेबांना भक्कम पाठिंबा द्यावा असे मी आवाहन करतो.

~~~


दौलत सिरसवाल: हे आंबेडकरी विचारांचे सामाजिक कार्यकर्ते आहेत, आणि फॅम या संघटनेत सक्रिय आहेत.

6 Comments

  1. जयभीम, sc&st लोकांनी आंबेडकरी चळवळीत यावे तुमच्यासाठी आहे ही चळवळ तर आपण गरिबी ,समता प्रस्थापित करू

  2. सप्रेम जय भिम भाई
    शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी पेईल तो
    गुरगुरल्या शिवाय राहणार नाही!
    – डॉ. बी. आर. आंबेडकर

  3. आज खुप दिवसानंतर कोणासोबत फोटो काढायची ईच्छा झाली पण ती पण अधुरी राहिली . कारण ही तसेच होते.#DaulatSiraswal दौलत Siraswal . पाच सहा वर्षा पासुन फँम या संघटनेत काम करतो .तेव्हा पासुन आमची थोडीशी ओळख . आंबेडकरी चळळळीसाठी वाहुन घेतलेला तरुण. मला त्याच्या बद्दल खुप आदर वाटायचा. ईतका हँन्डसम मुलगा मुव्हमेंट चालवतो. माझ्या बघण्यातला तो एकमेव होता. फँमच्या मिटिग मध्ये एकदा चर्चा चालु होती .डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जमा होणाऱ्या वर्गणी संदर्भात चर्चा चालु होती . त्याभर चर्चेत स्वतःची अगोदर झालेली चुक मानन्य करण्याचे धाडस कुणाकडेच नसेल . त्यांनी सर्वा समोर स्वतःची चुक कबुल केली . मला त्यावेळेस त्याचा खुप अभिमान वाटला. आणि आज एका ठिकाणी भेट झाली . आणि चर्चा मध्ये समजले की तो वाल्मीकी समाजाचा आहे . हे ऐकुन मला विश्वासच बसेना. एवढ्या तळमळीने आंबेडकरी चालविणारा तरूण वाल्मीकी समाजातील…
    गौतम बुध्द क्षत्रिय समाजातील त्याना गुरु मानले . कुणबी समाजातील संत तुकारामानी . संत तुकारामाना गुरू मानले मराठा समाजातील छत्रपती शिवाजी महाराजानी. छत्रपती शिवरायाना गुरु मानले माळी समाजातील महात्मा फुले यांनी . महात्मा फुले यांना गुरू मानले महार समाजातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी. बौध्द समाजातील सध्याचे वातावरण बघुन असे वाटते की. दौलत सारखा वाल्मीकी समाजातीलच तरूण खरी आंबेडकरी चळवळ चालवेल.
    स्वतःच्या समाजाचा विरोध न जुमानता दौलत चे कार्य चालु आहे . हे कार्य मला सुध्दा खुप प्रेरणा देत आहे.. ईतर चळवळीत दौलत ला सर्व काही भेटेल पण त्यानी स्वाभिमानी बाणा दाखवुन आंबेडकरी चळवळीशी एक निष्ठ आहे . आंबेडकरी चळवळीत स्वतःच्या झालेला चुका मान्य करायला कुणीच तयार नाही . सर्व स्वतःला ग्रेट समजत आहे . पण दौलत चा आदर्श घेवुन स्वतःच्या झालेला चुका कबुल करुन त्या सुधरवा व आंबेडकरी चळवळ स्वाभिमानाने चालवा.
    पुढच्या वेळेस मी नक्की फोटो घेणार आहे तुझ्या सोबत .
    जय भिम जय भारत
    विजय नामदेव त्रिभुवन
    मो.नं. ८६०५८९५२४४
    मुकूंदवाडी औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published.


*