एका आदिवासीच्या नजरेतून RRR…

सुनिता बुरसे RRR सिनेमा पहिल्याच दिवशी बघायचा ठरलं, उशिरा बघेपर्यंत अनेक परिक्षण वाचायला मिळतात, आपली मतं त्यात मिसळावी असं होऊ नये म्हणून पहिल्याच दिवशी बघितला. सिनेमाच प्रमोशन चालू झालं तेव्हा त्यात आदिवासी क्रांतिकारकांवर आधारित असल्याने सिनेमा वेगळ्या विषयाला हात घालणार, आदिवासी समाजाचा संघर्ष जो आतापर्यंत फारसा रूपेरी पडद्यावर आला नाही […]

कोणाच्या फायद्याचा हो हा बजेट?

बोधी रामटेके सध्याच्या सरकारचा तिसरा अर्थसंकल्प विधानसभेत सादर झाला त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यासाठी नवीन विमानतळ उभारणीचा व सोबतच जिल्ह्याला समृद्धी महामार्गाशी जोडण्याची घोषणा करण्यात आली आहे. नक्कीच आनंदाची बाब आहे. ज्यांनी रेल्वे कशी असते हे ही बघितलं नाही त्या आमच्या लोकांना किमान दुरून का होईना आकाशात विमान उडताना तरी बघायला मिळेल. […]

बा भिमा तुझी प्रतिमा टिपताना…

आदिती रमेश गांजापूरकर बा भिमातुझी प्रतिमा टिपतानास्वाभिमानालाही देखील हेवा वाटावा, असे तुझे अविभक्त करणारे वारेमाप समतेची आकाशगंगा नांदवितात. क्रांतीच्या महानायका अस्पृश्यतेच्या वावटळीत जन्म घेतलास,तुझ्या बुद्धितेजापुढे आत्महत्या करावी लागली मनुला. स्वाभिमान डीवचलेल्या, आत्मशक्ती पिचलेल्या माणसांच्या वस्तीकडे काळाला झपाटून ओढणारा महासूर्य होतास. अस्तित्वाची स्फुर्ती पूर्णत्वाला नेऊन, ठिणगी ची मशाल पेटवणारा अग्णीलोळ होतास.स्त्रीमुक्तीच्या […]

खाजगीकरणाचे षडयंत्र, वीज बिल दुरुस्ती विधेयक आणि फुले आंबेडकरी कामगार संघटनांची भूमिका

एन. बी. जारोंडे कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची करून खाजगीकरणाला अनुकूल वातावरण तयार करण्याची एक सुनियोजित खेळी : वीज कर्मचाऱ्यांनी सावध होण्याची गरज. विद्यमान केंद्र सरकार सत्तेवर आल्यापासून या सरकारने वीज कायदा – २००३ मध्ये संशोधन करून राज्यांच्या मालकीच्या वीज कंपन्यांचे पुर्णपणे खाजगीकरण करण्याचा चंग बांधला आहे. वीज कायद्यामध्ये संशोधन करण्यासाठी या […]

केवळ मुक्त व्यक्ती वाटाघाटी/करार करू शकते – नेल्सन मंडेला (भाग एक)

अपूर्व कुरूडगीकर एक आरसा झालाय कदाचित काही न लिहिता. आयुष्यातले काही प्रसंग तुम्हाला खचून टाकतील पण तुम्हाला त्यातून उभा राहायच कि नाही हे सर्वस्व आपल्यावर असतं, हाती कोणते पुस्तक घ्यावं आणि ते पूर्ण करून त्यावर लिहावा असं मागच्या वर्षभरापासून वाटत होतं पण ते काही जमलं नाही. आता ठरवल पुस्तक संपवायचं […]

कलमवाली बाई

सागर अ. कांबळे कलमवाली बाई म्हणाली‘या शोषितांना बोलता येत नाही’आणि तिने कलम करायला सुरुवात केली ‘बाईच असते बाईची सखी’हे पालुपद घेऊन ती मोठी फेमस होत राह्यलीशोषितात फूट पाडायला आणि कलम बाजार मांडायलातिने चांगलाच डाव मांडला एकदा कलमवाली बाई भर रस्त्यात‘वेश्या व्यवसाय गरजेचा आहे’ म्हणालीएक फॉरेनवरून आलेली कलमवाली बाई म्हणाली‘वेश्या व्यवसाय […]

‘नान यार’ चा प्रश्न सोडवला जात नाही तोवर ‘कोहम’ चा प्रवास फिजूल आहे

सागर अ. कांबळे ‘नान यार’ आणि ‘कोहम’ मधला संघर्ष तितकाच जुना आहे. आपल्याकडे आता सगळे काही आहे आणि जीवनाला काहीएक अर्थ द्यावा म्हणून काही गोष्टी करून बघू असे ठरवायची ज्यांना संधी मिळते असा एक वर्ग समाजात आहे. त्याचा कोहमचा प्रवास चालू असतो. कोहम म्हणजे वेदातील प्रश्न : ‘मी कोण?’ दुसरीकडे […]

दाभोलकर – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मिम्सतार्थ

प्रशिक सरकटे मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या नरेंद्र दाभोलकर – अंधश्रद्धा निर्मूलन समिती ह्या मुद्द्यावर मिम्स च्या स्वरूपात मांडलेला मतितार्थ, अर्थात मिम्सतार्थ प्रशिक सरकटे लेखक मुंबई येथे Independent Researcher आहेत.

No Image

महामानवाच्या ब्राम्हणीकरणाची गाथा

November 3, 2020 pradnya 0

सत्यशोधक “ब्राह्मण विद्वान गृहस्थांनी ऐतिहासिक संशोधनाच्या बाबतीत हातचलाखीचे प्रकार केलेले आहेत हे उघड आहे. तसे करण्यामागे ब्राह्मण विद्वान गृहस्थांचे ह्या ऐतिहासिक वाङ्मयाचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी दुहेरी हेतू आहेत. यातला पहिला हेतू असा की,आपल्या बापजाद्यांनी निर्मिलेल्या या तथाकथित वाङ्मयाचे सर्वतोपरी रक्षण करणे,प्रसंगी सत्याचा बळी द्यावा लागला तरी बेहत्तर!…आणि सर्वार्थाने ब्राह्मणांच्या हक्काधिकारांना […]

No Image

आमचं आधार कार्ड अन् पास फक्त ‘जयभीम’ !

June 16, 2020 pradnya 0

डॉ. प्रतिभा अहिरे (फेक फेमिनिस्टाना कोलून) मॅडम,तुम्ही दादाचं काय म्हणताय,आई,ताई,सईच काय इव्हन मलासुद्धा ठाऊक नसतो हो तुमच्या “सो काॅल्ड ” फेमिनिजमचा ‘फ ‘आम्ही शतकानुतके हेतूतः गावकुसाबाहेर फेकेल्या गेलेली सुर्यफूलंआता जगच बनलंय म्हणता खेडंआपसूकच जगाच्या वेशीबाहेर….राजवाडा.. महारवाडे..ते भीमनगर, प्रबुद्ध काॅलनीया खडतर प्रवासात आमचं आधार कार्ड अन् पासफक्त ‘जयभीम’आमचा घास,श्वास खरंच फक्त […]