समानतेच्या जागेतील असमानता!

श्रावणी बोलगे

मागच्या काही वर्षात भारतात सामाजिक संस्थाची रेलचेल वाढली आहे. ह्या संस्थांमध्ये बिगर सरकारी संस्था,सेमी सरकारी संस्था यांचा समावेश होतो. ह्या संस्था न्याय, समानता , अधिकार, सामाजिक सुरक्षा यांसारख्या विषयांवर काम करतात. ह्या संस्थांचा उद्धेश न्याय जमिनिस्तारापर्यंत पोहोचवणं, जमिनी स्तरावरील आवाज सरकार पर्यंत पोहोचवण , जमिनी स्तरावरील माहिती, आकडे प्रकाशित करून जगासमोर आणन, समाज, सरकार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर न्याय , हक्क ह्यांचा लढा देणं हा असतो.Central Statistical Institute of India नुसार भारतात ३३ लाख बिगर सरकारी संस्था (NGO) आहेत.

ह्या जागांवर ब्राम्हणवर्चस्व आहे हे वेगळ स्पष्ट करण्याजोगे निराळेही नाही. (ह्यात मी दलित -बहुजन -आदिवासी समुदाय सोबत काम करणाऱ्या संस्थाविषयी बोलत नाहीये )उच्चवर्णीयांच्या न्याय आणि समानता याच्या आकलनात जात क्वचितच सापडते हेही आपल्याला माहीतच आहे.आता बोलूयात ह्या जागांविषयी ! NGO ह्या शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात काम करतात. ह्या लेखात मी शहरी भागात असणाऱ्या सामाजिक संस्थावर लक्ष केंद्रित करणार आहे. शहरांमध्ये काम करणाऱ्या संस्था ह्या सामाजिक दृष्ट्या मागास किवा पिछाडलेल्या समाजासोबत काम करतात. परंतु ह्या संस्थांमध्ये DBA( दलित बहुजन आदिवासी ) समाजाचे प्रतिनिधित्व किरकोळ किवा अजिबातच दिसत नाही .

DBA( दलित, बहुजन , आदिवासी ) समाजातील तरुण लोक जेव्हा ह्या संस्थांमध्ये काम करतात,तेव्हा एकतर त्या स्तरापर्यंत पोहचण्याचा संघर्ष फार मोठा असतो . ह्या जागांवर काम करत असताना देखील भाषा , कपडे, खाणे ह्यावरून प्रचंड भेदभाव केला जातो. DBA समाजातून येणारे संशोधक , field worker ह्यांचा पगारात आणि एखाद्या उच्चवर्णीय व्यक्तीच्या पगारात प्रचंड तफावत असते. ह्या पुढे जाऊन ब्राम्हण्यावादी वर्चस्व असणार्या जागेत स्वतःचा आवाज , विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवणं हे अथक परिश्रमाच काम असत. आणि जरी स्वतःचे विचार मांडले तरी ते लाथाडून लावण्याची शक्यता प्रचंड! अश्या वातावरणात न्यायासाठी काम करायला पुढे आलेल्या DBA समाजातील लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.

आता बोलूयात कामाच्या स्वरूपाविषयी. ह्या संस्था जरी मागासवर्गीय लोकांसाठी काम करत असल्या तरी संचालक, मैनेजर, संशोधक ह्या सर्व पदांवर उच्चवर्णीयांचा भरणा असतो. त्यांचे प्रबंध, संशोधन हे एका विशिष्ठ ब्राम्हण्यवादी मानसिकतेन तयार झालेलं असत. हे प्रबंध लिहिताना क्वचितच जात आणि जातीय भेदभाव ह्यावर लक्ष दिलेले असते . तसेच field वर जाऊन माहिती जमा करणे, फॉर्म भरणे, लोकांशी बोलणे हे सगळी कष्टाची काम करणारी लोक बहुतांशी वेळा DBA समाजातालीच असतात .

ह्या सगळ्या गोष्टी सहन करून, त्यातून संघर्ष करून जरी कोणी थोड्या वरच्या पदावर पोहोचला तरी तिथे सहन करावा लागणारा जातीभेद हा आतिशय सूक्ष्म आणि पटकन ओळखता येईल असा नसतो. तुमच्या मताला चलाखीने बदलणे, नजरअंदाज करणे , जातीवाचक टोमणे मारणे,बहुजन सणाच्या सुट्ट्या न देणं, वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी करणे , स्वताच्या DBA सहकर्मी साठी उभ न राहाण , जात ही संकल्पना सगळ्यांना समजवण्याचा भार एका DBA व्यक्तीवरच टाकण ,स्त्रीवादी संभाषणात जातीचा विचार न करण, गरिबी आणि जात ह्याला वेगळ करून काम करण,बहुजन व्यक्तीच्या शिक्षणावर, त्यांच्या पालकांच्या शिक्षणावर आश्चर्य व्यक्त करणे हे आणि अशी कित्येक प्रकारचे जातीभेद एका DBA समाजातील व्यक्तीला सहन करावे लागतात .त्याचबरोबर जर तुम्ही एक महिला किवा इतर genderचे असताल, तर तुम्हाला सोसाव्या लागणाऱ्या टोमण्यांची पातळी ही अतिशय खालच्या स्तराची असते.DBA व्यक्तीच्या कामाला प्रोत्साहन न देणं, अनुल्लेखाने टाळणं , कामच कौतुक न कारण , ब्राम्हण्यावादी चालीरीती , शिष्टाचार , देव-देवता अंगावर लादण ही अन्य काही प्रकारची भेदभावाची उदाहरण!

ह्या संस्थाचे कर्तेधर्ता सहसा उच्चवर्णीयच असतात आणि कामाचे नियंत्रण देखील त्यांच्याकडेच असते. त्यामुळे विचारांची देवाणघेवाण करायला फारशी मोकळीक नसते आणि त्यात उच्चवर्णीय लोकांचा प्रत्यक्ष /अप्रत्यक्ष दबाब.

समानतेसाठी काम करणाऱ्या ह्या संस्थाची असमानता एक फार मोठी पाखंडता आहे.ह्या सामाजिक संस्था आपल्या अहवालांमध्ये मध्ये,पॅनेल चर्चा मध्ये ,लेखांमध्ये अतिशय लिबरल भूमिका घेतात . सामाजिक सुरक्षेविषयी जीवापाड कणीव असल्याच भासवतात ,काही अंशी ही कणव खरी असली तरी ह्या सामाजिक सुरक्षेच्या महाजालातील Intersectionality समजून घेण्याची कुवत फारच कमी असते किवा जाणीवपूर्वक ती टाळली जाते.

ह्या सामाजिक संस्थांची समाजाविषयीची आणि न्यायाची जाणीव प्रचंड उथळ असेत आणि ह्या जागांवर समानतेचे ढोंग धारण करण्यात आता ते प्रचंड माहीर देखील झालेले आहेत.

ह्या सामाजिक संस्थांची सत्यता जगासमोर आणणं, तेथील भेदभावाविरुद्ध लढण , शिव-फुले-शाहू – आंबेडकर विचारधारेवर उभारलेल्या आपल्या जाती निर्मुलन आणि जातीभेद ह्या विरुद्ध लढा देण ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि त्याच प्रमाणे स्वतःच्या आदर आणि प्रतिष्ठेसाठी ह्या ब्राह्मणवादी विचारधारेवर घाला घालण फार महत्वाच आहे.

जय भीम !

( लेखात नमूद केलेल्या गोष्टी स्वानुभवातून आणि निरीक्षणातून लिहिलेल्या आहेत )

सूची –
१.DBA- दलित-बहुजन -आदिवासी

२. NGO- Non-Profit- Organization ( बिगर सरकारी संस्था )

श्रावणी बोलगे
( लेखिका व्यवसायाने वकील असून गेले २ वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि सध्या दिल्ली येथे वास्तव्य आहे
),

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*