फूलनदेवी – डाकू राणी नाही तर न्यायाची राणी

शुभांगी जुमळे

उत्तर प्रदेश चंबळच्या खोऱ्यात यमुनेच्या नदीच्या काठावर छोट्याशा गावात वसंत उत्सवाच्या दिवशी जन्म झाला म्हणून आई वडिलांनी लेकीचे नाव फूलन ठेवले.तीन बहिणी फूलन आई खमकी वडील साधे कुटूंब मजूरी करणारे.उत्तर प्रदेश जिथे वर्चस्ववादी सर्वण समाजातील ठाकूर समाजातील लोक इतर गरीब बहुजन कामगार, मजूर लोकांना गुलामगिरी ते शोषण करणारी समाजव्यवस्था. तर नावाडी मल्लाह जातीतील फुलनदेवी ज्या वयात बालपण खेळायचे होते.त्यावयात गरीबी, मुलगी आहे म्हणून नातलगं चांगले स्थळ आले.म्हणून बालविवाह करणारे गरीब, अशिक्षीतपणा, ह्या कारणांमुळे बालविवाह करणारे फुलनदेवी चे पालकं. फुलनदेवी ह्यांचे लग्न वयस्कर पुट्टीलाल वयाने मोठा होता. बालपणी फूलनदेवीला लग्न समजण्याआधीच पुट्टीलाल ने तिच्या मनावर शरीरावर जे मानसिक भावनिक शारीरिक लौगिकं अत्याचार केले त्यास घाबरून फूलनदेवी सासरयाला सांगायची मला माहेरी पाठवा. शेवटी आजारी पडल्यावर फूलनदेवीला आईवडीलांकडे फूलन देवी आली.वडीलांसोबत मजुरी कामं करू लागली.पण गरीब, परिस्थिती, आपण मूलगी असल्यामुळे आपले लग्न वयस्कर नवर्याने केलेले शोषण ती ह्या मुळे पुरूषांना फक्त समाजातील बाई भोगवस्तू पाहिजे. एवढं तिला त्या वयात समजून आले. त्यावेळी फूलनदेवी आयुष्यात आयुष्यात घडणारी घटना फूलनदेवी ते दास्य सुंदरी बाबू गुजर विक्रम मल्लाह डाकू पण विक्रम मल्लाह डाकू सोबत आणि फूलनदेवी मजूरी करणारे हात आता बंदूक पकडून बंड प्रतिशोध करणारी डाकूराणी फूलनदेवी झाली होती.

बालाराम श्रीराम ठाकूर ह्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी
फूलनदेवी वर सामुहिक ठाकूर ह्यांनी पशूं प्रमाणे बलात्कार करून नग्न धिडं काढणारा उच्च वर्णीय ठाकूर समाज. भेकड समाजातील व्यवस्था बाईची जात ही लौगिकं शोषण करण्यासाठी असते.फूलनदेवी म्हणतात ज्या समाजात भटक्या म्हशीला एखाद्या मुलीपेक्षा मान दिला जातो.त्या समाजातील लोकांकडून मी काय माझ्या वर झालेल्या अत्याचार बदल न्याय सोडा बलात्कार झाले तेव्हा एक माणूस म्हणून सोडा माणुसकी म्हणून विरोध करून शकले नाही. शेवटी मी माझ्या हातात बंदूक घेऊन सूड घेण्यासाठी अत्याचाराची शिकार होणारयाच्या अन्यायाला वाचा फोडणे, श्रीमंत उच्च वर्णीय ठाकूर ते समाजातील जमिनदार, लोकांना लुटून गरीब लोकांना मदत करणारी स्वतः गरीब, शोषण बालवयात अत्याचार सहन करून विद्रोही बंडखोरी करणारी दास्य सुंदरी फूलनदेवी जेव्हा आपल्या वर झालेल्या बलात्कार बदला बेहमई हत्याकाडं १९८१मध्ये २२ठाकूर एका रांगेत उभे करून बंदुकीने ठार केलेल्या वर फूलनदेवी म्हणतात. आज जगाला हे उदाहरण राहील एखाद्या गरीब शोषित महिलांवर जेव्हा उच्च कुलीन ठाकूर अत्याचार करतो .तेव्हा ती सूडाने पेटवून समाजातील पशूंचे मानसिकता असलेल्या भोगवादी पूरषव्यवस्थेला नष्ट करण्याची ताकद एका महिलेत येते.

बेहमई हत्याकाडं नंतर तब्बल दोन वर्षे पोलिसांनी फूलनदेवीला शोधण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशातील तत्कालीन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.जगाला बेहमई हत्याकाडं नंतर फूलनदेवी बंडखोर डाकूराणी माहिती झाली होती. विक्रम मल्लाह ह्यांच्या सोबत फूलनदेवी आपले डाकूराणी ते फूलनदेव डकैती जीवन, जंगला मध्ये आश्रय, ते पोलिसांनपासून लपून राहणे. जंगलात डाकूचे जीवन जगत होती. विक्रम मल्लाह डाकू चा घातपात हल्ला ठार झालेला फूलनदेवी समजून घेणारा विक्रम मल्लाह डाकू असूनही सुशिक्षीत लिहता वाचता येणारी तिच्या आयुष्यात पहिला पुरूष होता तिला माणूस म्हणून समजून घेणारा.त्यानंतर फूलनदेवी त्याच्या डाकू टोळी निवडक साथीदार घेऊन डकैती करत होती.उच्च वर्णीय ठाकूर, जमिनदार लुटून गरीबांना मदत करणे त्यांचे सुरूच होते. तर दुसरीकडे डाकूचे जीवन इतर डाकू टोळी सतत जंगलात जाऊन स्वतः सुरक्षित आहोत की नाही सतत जंगलात वास्तव्य करणं.इंदिरा गांधी सरकार ह्यांनी फूलनदेवी ह्यांना आत्मसर्मपण प्रस्ताव ठेवला होता. विक्रम मल्लाह डाकू नंतर फूलनदेवी काही साथीदार फूलनदेवी आत्मसर्मपण करावी की नाही ह्या विचारात असतांना फूलनदेवी ह्यांनी सरकार समोर आपल्या काही अटी ठेवल्यावर उत्तर प्रदेश मध्ये आत्म सर्मपण न करता फूलनदेवी ह्यांनी अर्जुन सिंग १९८३ कारकिर्दीत मध्य प्रदेश मध्ये मोठ्या सभेत जाहिर आत्मसर्मपण केले.सपाचे मुलायम सिंग यांनी फूलनदेवी आत्मसर्मपण वेळी मदत केली. आत्मसर्मपण नंतर फूलनदेवी ग्वाल्हेर कारागृहात फूलनदेवी ह्यांना भेटायला ,मुलाखती घेण्यासाठी येणारे पत्रकार तिला पूर्वा आयुष्यातील प्रश्न विचारणारे प्रश्न किंवा फोटो काढणारी पत्रकार जेव्हा कारागृहात यायचे. तेव्हा फूलनदेवी ह्यांची मानसिक न समजून घेता त्यांची जगाला वेगळी प्रतिमा रानटी दाखवणारी ही समाजातील लोकं फूलनदेवी ह्यांचा राग यायचा. शाररिक मानसिक भावनिक थकवा ग्वाल्हेर कारागृहात असतांना फूलनदेवी ह्यांच्या वर झालेले पोटाचेऑपरेशन नंतर फूलनदेवी ग्वाल्हेर कारागृहातून तिहार कारागृहात पाठवण्यात आले. तेव्हा फूलनदेवी लिहणे वाचने फूलनदेवी वागणूक सामान्य माणसाच्या सारखी आपण आता आयुष्यात जगू शकणारी इच्छा. फूलनदेवी वागणूक तिहार कारागृहात असतांना एकूण अकरा वर्ष कारागृहात एक ही केस कोर्टात सुरू नसतात.

बावीस खूण,तीस लुटमार, अठरा अपहरण सगळे खटले उत्तर प्रदेश सरकारने मागे घेतले .फूलनदेवी वागणूक बघून त्यांना कारागृहातून तिहार मधून सुटका झाली. फूलनदेवी त्यानंतर दास्य सुंदरी ते राजकीय कारकीर्द मुलायम सिंग ,अर्जुन सिंग तत्कालीन सपा, बसपा बाबू मनोहर पशुपालन मंत्री, तर दुसरीकडे गंगा चरण राजपूत एकलव्य सेना स्थापना करून फूलनदेवी ह्यांना अध्यक्ष बनवले.खर तर एकलव्य सेना उच्च वर्णीय लोकांना समजून सांगण्यासाठी एकलव्य ह्याचं समाजातील बहुजनाना गुलाम न ठेवता प्रतिक होते समाजातील बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले राजकीय ते सामाजिक कार्यासाठी फूलनदेवी बाबासाहेब आंबेडकर ह्यांची विचारसरणी ते तथागत गौतम बुद्ध ह्यांच्या मार्गाने आयुष्यात जाण्याचा मोठा निर्णय घेऊन १५ फ्रेबुवारी १९९५नागपुरात दिक्षा भुमी वर बुध्द धम्मात प्रवेश केला. खर तर ही सगळ्या मोठी फूलनदेवी ह्यांच्या आयुष्यातील क्रांती होती.जगाला युध्द नाही तर बुध्द पाहिजे. हे कदाचित फूलनदेवी ह्यांनी समजून घेतले होते.त्यानंतर फूलनदेवी सपा कडून अकराव्या लोकसभा निवडणुकीत मिर्झापूर भदोही१९९६ परत दुसरयादा १९९९मध्ये त्या सपा कडून मिर्झापूर मतदार संघातून निवडून आलेल्या. पण एक चंबळ डाकूराणी ते संसद दिल्ली प्रयत्न बहुजन समाजातील एक महिला तिचा संर्घषमय जगणं जंगल ते कारागृह ते संसद उच्च वर्णीय लोकांना ते फारसे कदाचित पटलं नाही म्हणून दिल्ली निवासी त्यांची हत्या करण्यात आली. त्या हत्येमागे एक नक्कीच राजकारण होते हे संशयास्पद होते.राजकीय राजकारण पुरूष सत्ता, जातीव्यवस्था हत्या करण्यात आलेली करणारे शेर सिंह राणा बेहमई हत्याकाडं बंदला घेतला म्हणतो कारण ते उच्च वर्णीय ठाकूर होते म्हणून एका महिलेवर अत्याचार बलात्कार काय मान्य होता का मग त्यांना हे आज प्रयत्न समजून आले नै ?
फूलनदेवी हत्या झाली तेव्हा केंद्र सरकार भाजपाचे होते.आणि उत्तर प्रदेश मुख्यमंत्री राजनाथ सिंह होते.
तत्कालीन मुख्यमंत्री ते तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी फूलनदेव हत्या चौकशी सीबीआई कडे का केली नाही?

२०१४ मध्ये भाजप सरकार बनले तेव्हा राजनाथ सिंह गृहमंत्री होते.
शेर सिंह राणा तिहार कारागृहात पॅरोल सुटल्यावर नंतर परत कारागृहात गेले नाही ?
कारागृहात पलायन करून पृथ्वीराज चौहान अस्था कश्या आणल्या त्यांनी आपले आत्मचरित्र सिनेमा सुध्दा काढला
खरंच हा समाज उच्च वर्णीय ठाकूर होते म्हणून एक बहुजन समाजातील दास्य सुंदरी ते राजकीय कारकीर्द स्वतः ला आयुष्यात खंबीर उभ्या राहणारया महिलेचा फूलनदेवी ह्यांचा हत्या करून अंत करतो .ही मानसिकता उच्च वर्णीय लोकांची आहे कारण त्यांना एका महिलेचे अस्तित्व मान्य नसते.हेंच दिसून येते. तर दुसरीकडे रॉबिनहूड स्त्री अवतार, बॅडिट क्वीन जगणारी चंबळ खोरे यमुनेच्या पात्रातील फूलनदेवी जगण्याच जगाला एक पात्र फूलन ते डाकूराणी फूलनदेवी हाताने मजूरी करणारे हात त्याचं हातांत बंदुक घेऊन सूड घेण्यासाठी उठलेले हात टाईम पत्रिका जेव्हा जगाला सांग ते जगातील क्रांतिकारी महिला मध्ये भारताची फूलनदेवी चवथ्या स्थानावर आहे. ॥ मी फूलनदेवी ॥ आत्मचरित्र मारी तेरेज क्यूनी , पाल रोबाली त्यांत फूलनदेवी म्हणतात
माझ्या जातीतली एक स्त्री प्रथमच आपली कहाणी सांगतेय. अन्यायानं दबल्या जाणारया आणि अपमानानं जळणारया लोकांसाठी मी धैर्यानं हात पुढे करत आहे. मी जे भोगलं त्यांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हा प्रयत्न.
समाजातील पितृसत्ताक उच्च वर्णीय जातीयता.
फुलनदेवी एक वाक्य नेहमी आठवते .
पुरुषांनी मला जे भोगायला लावलं
त्यांना मी तेंच परतफेड करायला लावली.
सशक्त बंडखोर फूलनदेवी डाकूराणी ते संसद
चबंळ ते दिल्ली असा आयुष्यातचा क्रांतीकारक प्रवास होता.

शुभांगी जुमळे ह्या शिक्षिका असून आंबेडकरी, बौद्ध साहित्याच्या अभ्यासक संशोधक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*