
शुभांगी जुमळे

आपल्या कार्यामुळे राजर्षी शाहू महाराज हे केवळ आपल्या संस्थानात नाही तर भारतभर लोकप्रिय होते. सामाजिक सुधारणेचा इतिहास पाहतांना सर्वसामान्य लोकांचे कल्याण करणे, बहुजन समाजातील लोकांना पारंपारिक बंधनातून मुक्त करणे त्यांना शिक्षण देण्यासाठी त्यांची प्रगती करण्यासाठी त्यांना जुन्या रूढी व परंपरांना अंधश्रद्धा, अज्ञानातून शिक्षण देऊन बहुजन समाजातील प्रगती, जागृती करण्याचे त्यांनी त्याच्या संस्थानातील सर्व स्तरातील सामान्य लोकांना समानता समतावादी वागणूक देण्याचे काम केले.कानपूर कुर्मी क्षत्रिय सभेने सामाजिक कार्याचा गौरव म्हणून १९१९ साली राजर्षी ही उपाधी शाहू महाराजांना दिला होती.आपल्या संस्थानातील जनतेला आपुलकीने त्याच्या समस्याचा विचार करणारे लोकराजे राजर्षी शाहू महाराज होते.
२ एप्रिल १८८४ वयाच्या विसाव्या वर्षी कोल्हापूर संस्थानाच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली.
इग्रंजाच्या सत्तेखाली असलेला हिंदुस्तान दोन भागात विभाजन झाले होते. एक इग्रंजाच्या सत्तेखाली असलेले भाग दुसरे संस्थानातील ताब्यात असणारा भाग. मुलूख दोन्ही शासन व्यवस्था वेगवेगळे होते.पण इग्रंज आपल्या प्रतिनिधी मार्फत संस्थानिकावर वर्चस्व ठेवून होते.
सर्वप्रथम आपल्या संस्थानातील लोकाचे अज्ञान,अंधश्रद्धा, ,स्पृश्य अस्पृश्यता श्रेष्ठ कनिष्ठ उच्च निचता हा भेदभाव समाजातील लोकांचा समाजातून दूर करण्यासाठी शिक्षण हाच एक पर्याय आहे.
म्हणून आपल्या संस्थानात शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचे राजर्षी शाहू महाराजांनी ठरवले.
एकीकडे हिंदी,संस्कृत विद्येचे शिक्षण द्यावे की पाश्चात्य संस्कृतीचे इग्रंजी शिक्षण द्यावे त्यावेळी इग्रंजानी मेकॉले ह्यांचा शिक्षण झिरपणीचा सिद्धांत स्विकारला.
तर महाराष्ट्र अक्षर लेखन सामान्य जनतेच्या हातात लेखणी देणारे ,बहुजन समाजाच्या दुःखाचे मूळ त्यांचे अज्ञान ,अंधश्रद्धा आहे ते अज्ञान निमूर्लन शिक्षणानेच दूर होऊ शकते स्त्री शिक्षणाची दारे उघडणारे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीमाय ह्याच्या वैचारिकतेचा प्रभाव आणि शिक्षणाच्या दुष्टीने सर्व जाती धर्मातील लोकांना जागृत आणि शिक्षण सर्व स्तरातील बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर राजर्षी शाहू महाराजांनी ठरवले. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. राजर्षी शाहू महाराजांच्या मते, शिक्षण सर्व विकासाचा पाया आहे. तसेच सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचा एकमेव मार्ग आहे. असे शाहू महाराजांची शिक्षण विषयी मते होती.शोषणमुक्त समाजनिर्मीतीचे ध्येय स्पृश्य अस्पृश्यता हा भेदभाव न करता शिक्षणाचा दर्जा समान पातळीवर आणण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात शैक्षणिक क्षेत्रातील कार्य पुढील प्रमाणे आखले होते.
विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत.
शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना सवलती देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांना वसतिगृहाची व्यवस्था केली.
उच्च शिक्षणासाठी परदेशी शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांना आर्थिक शैक्षणिक मदत केली
स्त्री शिक्षणासाठी संस्थानात राजाज्ञा काढली
स्त्री शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.
एक प्रशासक म्हणून संस्थानातील बहुजनाच्या शिक्षणासाठी झडणार लोकराजा राजर्षी शाहू महाराज हे होते .१८ एप्रिल १९०१ व्हिक्टोरीया मराठा बोर्डिग वसतिगृहाची स्थापना केली होती तेव्हा सर्व बहुजन समाजातील अन्य जातीच्या मुलांना तिथे आश्रय दिला होता. नंतर जैन बोर्डिग, ढोर चाभारं बोर्डिग, अस्पृश्य वसतिगृह, मिस क्लार्क होस्टेल तर १९०६ मध्ये मोहमेडन एज्युकेशन सोसायटी ची स्थापना मुस्लिम बोर्डिग सुरू केले.विविध जाती धर्माची वीस वसतिगृह त्यांनी आपल्या संस्थानात सुरू केले. १५ मे १९१२ पाटील शाळा सुरू केली.बहुजनाच्या हुशार विद्यार्थ्यांना खास शिष्यवृत्ती शिक्षणास उत्तेजनासाठी पुस्तकं, पाट्या पेन्सिल मोफत देण्यासाठी अडीच हजार रुपये मंजूर केले.
प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत कायद्याचा अंमलबजावणी या योजनेत अंतर्गत पाचवे ते हजार लोकवस्तीच्या गावात शाळा उघडण्यात आल्या.
पालकांनी मुलांना शाळेत पाठवायला पाहिजे असा आग्रह त्यांचा होता.जे पालकं त्याच्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत. त्यांना एक रुपया दंड आकारला जाईल. अशी घोषणा त्याच्या संस्थानात केली होती.
ज्या मुलांना दिवसभरात शाळेत येता येणं शक्य नाही अश्यासाठी रात्र शाळा सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
शैक्षणिक क्षेत्रातील डायरेक्टर, एज्युकेशनल इन्स्पेक्टर अशी पदे राजर्षी शाहू महाराजांनी निर्माण केली.
शिक्षकासाठी प्रशिक्षण आणि मेरीट प्रमोशन या योजना १९११ सुरू केल्या.
स्त्री शिक्षणास प्रोत्साहन कोल्हापूर संस्थानात स्त्री शिक्षणाचा दुष्टीकोन हा तत्कालीन सामाजिक व्यवस्थेपेक्षा फार पुढारलेला राजर्षी शाहू महाराजांचा होता.त्यांनी संस्थांतील मुलींच्या शिक्षणासाठी शिक्षण व्यवस्था पाहण्यासाठी एक खास स्त्री शिक्षणाधिकारी पद निर्माण केले होते. रमाबाई केळकर यांची राजर्षी शाहू महाराजांनी नेमणूक केली होती.
कोल्हापूर संस्थानात मुलीसाठी स्वतंत्र शाळा स्थापन केल्या गेल्या.
मुलींना शाळेत यावे मुलांच्या बरोबरीने शिक्षण घ्यावे यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात खास मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले होते.
मुलींसाठी शिष्यवृत्तीची तरतूद करण्यात आली होती. मुलींच्या उच्च शिक्षणासाठी बाबतीत उदार दुष्टी राजर्षी शाहू महाराजांनी ठेवली.
राजाराम कॉलेज मध्ये शिकणारया सर्व मुलींना मोफत शिक्षण करण्यात आले होते. त्यातील काही स्त्रीयांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी पाठवले होते.
इंदूमतीदेवी या विधवा स्त्रीला शिक्षण देवून तिला स्वावलंबी बनविले हे उदाहरण आहे स्त्री शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारे राजे म्हणून राजर्षी शाहू महाराज स्त्री शिक्षणामुळे कुटूंबाचा व समाजाचा विकास घडून येतो. म्हणून मुलींना, स्त्री शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराजांचा आग्रह धरला होता.
समाजातील सर्व स्तरातील सामान्य जनतेचा बहुजन समाजातील अस्पृश्यता भेदभाव करणारे संस्थांनातील असमानता वागणूक देणारे कर्मचारी अधिकारी राज्यात असेल तर कर्मचारी अधिकारी सहा आठवड्याच्या आत राजीनामा द्यावा लागेल.
महार जातीच्या लोकांना कामांची सक्ती करता येणार नाही. त्याच्या जमिनी स्वतः च्या नावावर करून देण्याचा निर्णय राजर्षी शाहू महाराज आपल्या संस्थानात केला होता. म्हणून सामान्य माणसाच्या सामाजिक परिस्थिती समजून घेणारे राजर्षी शाहू महाराज होते.
राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक क्षेत्रातील धोरणामुळे
सामाजिक परिवर्तनाला चालना मिळाली.
शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला समानतेच्या
पातळीवर आणण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात काम केले.
राजदंड ही शोभेची वस्तू नसून ते सेवेचे साधन आहे.
आपले सामाजिक कर्तृत्व अठरापगडी जातीच्या निरक्षण प्रजेला शिक्षणासाठी जात ,धर्म, वंश,भाषा, यापलीकडे जावून अज्ञानाच्या अंधारातून बहुजन समाजात शिक्षणाची ज्योत जागृती निर्माण करणारे समता समानतावादी लोकांचे आवडते
लोकराजा राजर्षी शाहू महाराज
राजर्षी तू राजा प्रेमळ निधडा दिलदार
मराठगडी तू नेता आमुचा प्रणाम शतवार .
शुभांगी जुमळे
शुभांगी जुमळे ह्या शिक्षिका असून आंबेडकरी, बौद्ध साहित्याच्या अभ्यासक संशोधक आहेत.
[ ९६८९८२५६२३ ]
- बहुजनांच्या शिक्षणाचे उध्दारक राजर्षी शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य - June 26, 2025
- बुद्ध ते बाबासाहेब स्त्री उद्धाराचा संस्थात्मक, संवैधानिक प्रयत्न. - June 10, 2025
- फूलनदेवी – डाकू राणी नाही तर न्यायाची राणी - July 14, 2024
Leave a Reply