भीमा तुझी वाणी गाता
गाता रडली आई
तुझ्या शाईने इतिहास लिहिला
सांगे मजला आई
तुझ्यासारखा ज्ञानी नव्हता
पुढे बी होणार नाही
क्रांतीच्या तू महासागरा
कधीच अटणार नाही (2)
भीमा तुझी यशोगाथा
गाई ती ठाई ठाई
गौवर्या थापल्या कष्ट सोसले
तुझ्या पुस्तकासाठी
बाई हासुनी मर्दा वानी
होती तुझ्या पाठीशी (2)
दिव्या परी देह जाळीला
तरी न बोले रमाई
स्वतहा झिजला तरी न खचला
पारस विश्वाचा झाला
हात लावता सोने केले
चमत्कार तो केला (2)
तुझ्या पायाची धूळ नाही
सांगे सुनील जगाशी
तुझ्या शाहीनं इतिहास लिहिला
सांगे मजला आई
~~~
कवी : सुनील दादाराव उबाळे
शताब्दी काव्य मंडळ अध्यक्ष, विविध साहित्य संमेलना मध्ये सहभागी तसेच औरंगाबाद आकाशवाणी वर काव्य वाचक.

Leave a Reply