भिमा कोरेगावच्या जातियवादी हल्ल्यातील पिडीतांना न्याय केव्हा मिळणार?

भिमाकोरेगाव विजयी रणस्तंभाला मान वंदना द्यायला आलेल्या निःशस्त्र निरपराध भिमसैनिकांवरती संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्या सारख्या अनियंत्रित संघटनांच्या मनुवादी लोकांनी केलेल्या हल्ल्याला आता जवळ जवळ एक वर्ष पुर्ण होत आले आहे. फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून लाखो लोक भिमा-कोरेगावच्या विजयी रणस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत असतात. २०१८ हे वर्ष पेशवाईचा पाडाव करून मानवमुक्तीच्या लढयाला सुरवात करण्याच्या घटनेचे द्विशताब्दी वर्ष, त्यामुळे यावर्षी दरवर्षी पेक्षा कैकपटीने जास्त अभिवादन करण्यासाठी आलेल्या भिमसैनिकांवरती या अनियंत्रित हिंदुत्ववाद्यांनी गेल्या ४, ५ वर्षापासून पुर्व तयारी करून भ्याड हल्ला केला. त्याचे पडसाद संपूर्ण भारतातच नव्हे तर जगामधेही उमटताना आपण सर्वांनी पहिले आहे. आंबेडकरीच नव्हे तर मानवतावादी, संविधानवादी, लोकशाहीवादी समूहांनी विविध प्रकारे या भ्याड जातीयवादी हल्ल्याचा निषेध केला. दि. ३ जानेवारी २०१८ रोजी आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या इतिहासातील कडकडीत बंद पाळला. २६ मार्चला निघालेला एल्गार मोर्चा आणि त्याला जमलेल्या लाखो लोकांनी भिडे आणि एकबोटेला अटक करावी म्हणून मागणी केली. परंतु दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भिडे व एकबोटेला क्लिनचीट दिली. यावरून हे सरकार भिडे व एकबोटे सारख्या मानुवाद्यांची तळी उचलणारे, दलितांच्या विरोधी व सनातन विचारांचे व अनियंत्रित हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे आहे.

या हल्ल्यात जे लाखो लोकं जखमी झाले त्यातील कोणाच्याही तक्रारीवर सरकारने ठोस कृती केल्याचे दिसून येत नाही. सणसवाडीतील आठवले यांच्या राहत्या घरावर हल्ला करून ते जाळून टाकण्यात आले. त्यांचे फाब्रीकेशनचे वर्कशॉप घरासहित जळून टाकले. त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या केसमध्ये प्रत्यक्ष पाहिलेल्या हल्लेखोरांची नवे असूनही ठोस कारवाही झाली नाही. आयु. अमित भोंगाडे या यवतमाळला राहणाऱ्या व बी. कॉमच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या समता सैनिक दलाच्या सैनिकाला जबर दुखापत झाली. त्यांच्या गाडीवर झालेल्या दगड हल्ल्यात त्यांच्या डोक्याला मार लागला. दोन महिने ससून हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या अमितला आजही बोलताना त्रास होतो. पण त्याच्या केसमध्ये पोलिस प्रशासनाने कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही. याउलट राहुल फटांगळे याच्या मृत्यूला जबाबदार धरत ४ दलित तरुणांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातील श्रीगोंधाचे ३ अत्यंत गरीब कुटुंबातले तरुण दि. १० जानेवारी २०१८ पासून आजपर्यंत जेल मधे आहेत. त्यांच्या विरोधात कुठलाही ठोस पुरावा नसताना त्यांना जामीन नाकारला जात आहे. या व आशा बऱ्याच केसेसमधे पोलिस प्रशासन जातीयवादी भूमिका घेत असताना सरकार चौकशी आयोगाचा फार्स पुढे करत आहे. हे अत्यंत संतापजनक आहे. त्यामुळे सरकार व प्रशासनाच्या या जातीयवादी भूमिकेविरोधात आम्ही दि. १४ नोव्हेंबर २०१८ पासून कलेक्टर कचेरी पुणे येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करत आहोत. तरी या आंदोलनात सर्व आंबेडकरी जनतेने सहभागी व्हावे ही विनंती. आपण तन मन धनाने या आंदोलनाला सहकार्य करावे.

प्रमुख मागण्या

  • आयु. अमित भोंगाडे यांच्या तक्रारीमध्ये भा. द. वि. ३०७ व अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याचे कलम ३ यांचा अंतर्भाव करण्यात यावा.
  • आयु. अमित भोंगाडे यांना आर्थिक मोबदला व शासकीय नोकरी देण्यात यावी.
  • आयु. रमाताई आठवले यांना सरकारने त्वरित घर बांधून द्यावे व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करावी
  • राहुल फटांगळे प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार तरुणांची सुटका व्हावी यासाठी पोलिसांनी त्यांचे म्हणणे लवकर कोर्टात सदर करावे.
  • दादा कुचेकर या सामाजिक कार्यकर्ता्या जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या किसन वाडकर व त्याच्या सहकाऱ्यांना तत्काळ अँट्रोसिटी कायद्याअंतर्गत अटक करावी
  • ३ जानेवारी२०१८ च्या महाराष्ट्र बंद मधे सहभागी झालेल्या निरपराध कार्यकर्त्यांवरच्या खोट्या केसेस महाराष्ट्र शासनाने त्वरित मागे घ्याव्यात.
  • महाराष्ट्रा मध्ये गेल्या १५ वर्षात दलित अन्याय अत्याचाराच्या किती घटना घडल्या व त्या केसेस मध्ये कायदेशीर किती कारवाई केली याची श्वेत पत्रिका महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध करावी.

 

दलितांवरील अन्याय-अत्याचाराविरोधात व्यापक जन आंदोलन

 आकाश साबळे                                                           अशोक आठवले

 ९८९०८५२७७८                                                             ७५१७७५५७१४

 

~~~

साभार: महिपाल महामत्ता

विडिओ सौजन्य: संघर्ष आपटे

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*