गणेश उषा चव्हाण
आम्ही लहान होतो तेव्हा समाज मंदिरात आठवड्यातून एकदा, महिन्यातून एखादा दिवसं सर्व जेष्ठ, तरुण मंडळी मिळून बुद्ध बाबासाहेंबांची गीतं, पोवाडा कबिरांचे दोहे म्हणायचे…
त्यात आमच्या गंगावणे आज्जी विशेष आघाडीवर असायच्या.
लहान पिढीला बुद्ध, बाबासाहेब यांची ओळखं यांच्या गाण्यातुन, पोवाड्यांतून व्हायची.
गाडीच्या गाडीवाना, दलितांच्या राणा ..!
जरा जोरानं हाक तुझी गाडी गाडी रं…..
मला जायचं पहिल्या आघाडी …..,
आज्जींच्या आवाजातलं हे गाणं अंगावर काटा आणायचं
जिस नगर में पिपल की छाॅव है …
वही मेरें भीमजी का गाॅंव है ….
शेखर आप्पांच्या खड्या जादूई आवाजातलं हे गाणं म्हणजे, अगदी माहोल दणाणून टाकयचं. ह्याच आवाजामुळे आप्पा कायम स्मरणात राहतील. 🙏🏼💐
विश्वास दाजींचा आवाज या सर्वांवर कळस चढवायचा आणि सगळे असे मंत्रमुद्ध व्हायचे की जणू…
अमृताची गोडी आज आलिया अभंगा ….!!
यांना साथ असायची ती प्रकाश आणि राजूनानाच्या जोडीची.
या गड्यांनाचा ढोलकी वगैरे बाबतीत कुणीच हात धरू शकत नाही.
ही पिढी कडक आणि आॅलराऊंडर होती.
त्यावेळेस जवळपास गावोगावी प्रत्येक समाजमंदिरात किंवा बुद्धविहारात हेच चित्र दिसायचं.
जेव्हा ही जबाबदारी आमच्यावर पडली तेव्हा,आम्ही दर बुधवारी घरोघरी बुद्धपुजा घेवुन बुद्ध बाबसाहेब आमच्या परिने घराघरात पोचवू लागलो.
समाज मंदिरात वेगवेगळ्या पुस्तकांच वाचन आणि त्यावर चर्चासत्र घेवू लागलो.. ग्रंथालय काढले …
पण आधीच्या पिढीची सर आम्हाला काही आली नाही. आणि येणारही नाहीं. पुढे शिक्षण आणि करिअरच्या नादात या सगळ्या गोष्टी मागे पडल्या आणि मोठी पोकळी निर्माण झाली.
दहा एक दिवसांपूर्वी गावाला धावता दौरा झाला तेव्हा, बुध्दविहारातलं असं काही चित्र पाहून, बुद्ध बाबासाहेब आपल्या पुढच्या पिढीला देण्याची लिगसी, जबाबदारी पार पाडली जात आहे हे पाहून मन सुखावलं. ..!!
आज धार्मिक सांप्रदायिकतेचा वाढता दहशतवाद पाहून हा वारसा जपणं खुपच गरजेचं आहे.
विशाल खरात, जयवंत फणसे, गणेश कांबळे यांनी हि धुरा पुन्हा सांभाळायचं काम केलयं त्यांना मानाचा जयभीम..
शो मस्ट गो ऑन …
गणेश उषा चव्हाण
लेखक आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आहेत.
- शो मस्ट गो ऑन… - February 5, 2021
Leave a Reply