शेतकरी आंदोलन आणि आरएसएस चे बेगडी देशप्रेम

के. राम भाऊ

सध्या भारतात शेतकरी कायद्याविरोधी शेतकरी आंदोलनामुळे अख्खा देश ढवळुन निघत आहे. शेतकरी बांधवांनी देखील BJP सरकारला न जुमानता फार निर्धाराने हा लढा सर्व संकटं आली असताना देखील चालू ठेवला आहे.

जगातील प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवरच अवलंबुन आहे.जरी एखादा राष्ट्रात औद्योगिक क्षेत्र सर्वात जास्त व त्याचे उत्पादनही शेतीपेक्षा जास्त असलेले तरी त्या राष्ट्राला जगवणारे क्षेत्र म्हणजे शेती होय आणि त्यामुळे प्रत्येक राष्ट्राची अर्थव्यवस्था ही कृषी अर्थव्यवस्थेच्या साह्याशिवाय चालुच शकत नाही,हा अर्थशास्राच्या “व्यवाहारिक अर्थशास्रा”चा सिध्दांत आहे!भारतासारख्या अखंडप्राय व लोकसंख्येने हिमालया एवढी उंची गाठणार्या देशाची अर्थव्यवस्था सुध्दा कृषी असुन आत्मा आहे!जरी भारतात औद्योगिक क्षेत्रात क्रांती झाली असली तरी ती क्रांती होण्यासाठी देखिल कृषी अर्थव्यवस्थाच साह्यभुत आहे!

आज पंजाब हरियाणा व उत्तर भारतातील बहुजन शेतकरी आपल्या जगण्यासाठी व जीवंत राहण्यासाठी आपला प्राण तळ हातावर ठेवुन आंदोलन करत आहेत,पण ब्राम्हणी आरएसएस, भाजप व त्यांची गुलाम पिल्लावळ या जगाच्या पोशिंद्याला मात्र “खलिस्तानी उग्रवादी उपद्रवी आतंकवादी” असे लेबल लावुन बदनाम करताना दिसत आहेत.यात ब्राम्हणी आरएसएस व तिच्या सर्व पिल्लावली आणि इतरही ब्राम्हणी संघटना पक्ष नेते व कार्यकर्ते यात मोठ्या प्रमाणात सामिल आहेत.शेती कायदा रद्द होवु नये,
आंदोलन संपवले जावे म्हणुन हे सर्व ब्राम्हणी “फुट सोल्जर्स” सध्या शेतकर्यांना “देशद्रोही” म्हणुन प्रमाणपत्र वाटत स्वत: धुतल्या तांदळासारखे “देशभक्त” असल्याचे दाखवत आहेत!

पण वास्तवात जर पाहिले तर आरएसएस ही ब्राम्हणी संघटना आतंकवादी असुन तिचे कार्यकर्ते देखिल आतंकवादी असल्याचे जगजाहिर झाले आहे.देशभक्तीच्या बाबतीत पाहिले तर इंग्रज राजवटीत ब्रिटिशांना विरोध करु नका असा आपल्या स्वंयसेवकांना संदेश देणारी आरएसएस आहे.एव्हाना भारताच्या तिरंगा ध्वजाचा अपमान करणारी हिच ब्राम्हणी संघटना आघाडीवर आहे.

२६ जानेवारी २०२१ ला दिल्लीतील लाल किल्यावरील आंदोलनात शेतकर्यांनी तिरंगा ध्वजापेशा उंच झेंडा लावला,तिरंगा काढुन शीख धर्मिय झेंडा लावला असा अक्रास्ताळी बनाव आरएसएस व पिल्लावळींनी केला,पण याच आरएसएसने बेकायदेशिररित्या काही वर्षापुर्वी याच ठिकाणी संघाचा कार्यक्रम घेवुन आरएसएसचा ध्वज फडकवला होता हे मात्र आरएसएस व तिचे आतंकवादी संघोटे सोईस्कररित्या दुर्लक्ष करुन शेतकर्यांची बदनामी करत आहेत.

आजपर्यत आरएसएसने नागपुर येथिल रेशिम बाग या संघाच्या आतंकवादी मुख्यालयात भारताचा ध्वज तिरंगा फडकवल्याचा पुरावा नाही.उलट जेव्हा राष्ट्र सण उत्सव असतात तेव्हा संघचालक मात्र तेथुन फरार असतात.आज भारतातील प्रत्येक पक्ष संघटना संस्था आदी ठिकाणी तिरंगा फडकवला जातो किंवा ध्वज तेथे नेहमी फडकताना दिसतो पण याला अपवाद ब्राम्हणी आरएसएस आहे.रेशिम बागेत चुकुनही तिरंगा पाहण्यास मिळत नाही!हि ब्राम्हणी आतंकवादी आरएसएस ची देशभक्ती आहे जी संघी भक्तांसाठी आतंकवादी “चालुगीरी” आहे!

ब्राम्हणी आतंकवादी आरएसएस किती देशभक्त आहे हे आपल्याला २००१ च्या केस नं १७६ वरुन पाहयला मिळते!२६ जानेवारी २००१ रोजी नागपुरमधील तीन तरुणांनी तिरंगा ध्वज आरएसएसच्या रेशिम बागेतील कार्यालयावर फडकवण्यासाठी प्रवेश करुन इमारतीवर चढले होते.त्यांनी तेथिल संघाचा भगवा ध्वज काढुन तिरंगा लावण्याचा प्रयत्न करत असताने संघी ब्राम्हण पदाधिकार्यांनी त्यांना मज्जाव केला आणि त्या तिघांवर तात्काळ गुन्हा दाखल केला,पण तिरंगा ध्वज फडकु दिला नाही.हा ब्राम्हणी आरएसएसचा देशभक्तीपणा की आतंकीपणा आहे हे सिध्द होते!जर आरएसएस देशभक्त संघटन असते तर तिरंगा नक्किच फडकवला असता व अशी वेळ आली नसती.पण आरएसएस ही ब्राम्हणांची ब्राम्हणांसाठी आतंकवादी संघटना आहे हे आता लपुन राहात नाही.याच प्रकरणात मात्र ते तरुण निर्दोष सुटतात,पण आरएसएस अजुनही तिरंगा फडकवत नाही आणि वरुन इतरांना देशद्रोही असण्याचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आग्रेसर आहे.

आज भारतात अनुसुचित जाती जमाती/SC/ST आपल्या न्याय हक्काधिकारासाठी रस्त्यावर उतरला तर तो “नक्शलवादी” ठरवला जातो.मुस्लिम रस्त्यावर आला तर “आतंकवादी”!आमचा ओबीसी बांधव रस्त्यावर आला तर “समाज कंटक”! आता या जगाचा आणि देशाचा पोशिंदा असणारा शीख धार्मिक गटाचा समुदाय रस्त्यावर आला तर तो “आतंकवादी खलिस्तानी उग्रवादी” ठरवला जावुन देशद्रोही होत आहे!म्हणजे आम्ही आतंकवादी ब्राम्हणांच्या गुलामीत गप्प राहिले तर “देशभक्त” आणि त्यांच्या विरोधात गेलो की, “देशद्रोही आतंकवादी” हे समीकरण भारतातील आतंकवादी ब्राम्हण व आरएसएस ने ठरवुन टाकले आहे.

ब्राम्हणी आरएसएस किती धुतल्या तांदळासारखी आहे हे आता लपत नाही.जागतिक पातळीवर आरएसएस आतंकवादी संघटना असल्याचे मानले जात आहे त्यामुळे विविध राष्ट्र त्याबाबद चिंता व्यक्त करत आहेत!

आज आम्हा बहुजन शेतकर्यांना देशद्रोह्याच प्रमाणपत्र वाटणारी आरएसएस जेव्हा ब्राम्हणांनी भारतीय संविधान असणारी पुस्तिका जाळली होती तेव्हा कुठे बिळात जावुन बसली होती?हे भारतीय बहुजन समाजाला चांगलेच माहित आहे!तेव्हा या भारतात आतंकवादी देशभक्त देशद्रोही उपद्रवी कोण आहेत हे ब्राम्हणांनी आम्हाला सांगण्याची गरज नाही!

के. राम भाऊ

लेखक मूळ बीड येथील रहिवासी असून कामानिमित्त हैदराबाद येथे असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*