ॲड मिलिंद बी गायकवाड
मराठी भाषा दिन आहे तर .७० च्या दशकातच आपल्या पोराना विंग्रजी शाळेत शिक्षण देवुन अमेरिकेत ग्रीनकार्ड होल्डर बनविणार्य सर्व वांद्रे कर ‘साहित्य सहवास’ मधील मराठी च्या सुपुत्र सारस्वताना साष्टांग प्रणीपात ….!
तसेच जो परेंत मराठी सावरकरी दुर्बोध भाषांतर आणी साडेतीन टक्केच्या मुठींतुन बाहेर पडून बोली भाषेतील सुलभ पण स्वीकारत नाही .. तो परेंत तिला हवी ती उंची गाठता येणार नाहीच!
म्हणे मेकॉले प्रणीत काळे इंग्रज जसे अपेक्षित होते तेच मला पार चंद्रपुर मधिल मनुष्य सदशिव पेठी मराठी विदर्भात बोलल्यावर भास होतो ..! तरी सुद्दा सुबोधता यावी ह्या साठीचे शुभ चिंतन ..!
आमच्या 90 च्या दशकात सर्वात जास्त मुलं दहावीला मराठी विषयात नापास होत असत… प्रशासकीय मंडळाने शोध घेतला असताना त्यांना आढळले. की शहरात बसून पेपर तपासणारी ही मुद्राराक्षस मंडळी इकडची वेलांटी तिकडे झाल्यावर इकड चा उकार तिकडे झाल्यावर अर्धा गुण कापीत… त्याने खान्देश विदर्भ.. मराठवाडा..सांगली साताऱ्यातील मुलं बळी पडत..
जिथे दहा कोस पार भाषा बदलते.. अहिराणी.नगरी..कोकणी..मालवणी. विदर्भी कारवारी.. अश्या अनेक उप बोली भाषा असून… अहिराणी सारख्या भाषेच्या बाग्लानि भिलाऊ.. खाल्यांगी वारल्यांगी महरावू सारख्या उप भाषा आहेत.. तिथल्या दुर्गम आदिवासी पाड्यात ही सर्व एलियन ल्यान्गवेज असे..त्याने दहावी बोर्डाच्या परीक्षेत त्यांची कत्तल झाल्यागत मार्क्स ची चाळण होत असे… बहुजन पोर पुढे येऊ नयेत म्हणून केलेल्या अनेक षडयंत्रांपैकी हे एक होते.. ही बाब ध्यानी आल्यानेच… शुध्द लेखनाचे गुण केवळ निबंध लिखाणात तपासता येतील असा माध्यमिक बोर्डाला नियम बनवावा लागला होता…
भाषेचा अभिमान निर्माण होणे साठी तुमची माझी भाषा एक असून आपण सर्व एक आहोत ही भावना निर्माण होणे गरजेचं आहे.. म्हणून मराठी भाषा प्रचार आणी प्रसार नाही झाला ह्याला ही मंडळी जवाबदार आहेत..
ॲड मिलिंद बी गायकवाड
- त्यांची यत्ता कुठली? - July 15, 2021
- या वेळेस सुद्धा जयंती घरीच साजरी करुया - March 28, 2021
- माय मराठी आणि सदाशिव पेठी षडयंत्र - February 27, 2021
Leave a Reply