तथाकथित शुद्ध प्रमाण मराठी भाषेचा जनमानसावरील ताबा

प्रज्ञा सिध्दार्थ जाधव

प्रमाण भाषेचा लहानपणापासून असलेला ताबा आजही ‘माझ्याप्रमाणे कोणी शब्द वापरले नाही तर’ ते लगेच अधोरेखित करतो.

आजही कोणी ‘अहो’च्या ऐवजी ‘आवो’ लिहिलं तरी मनात कुठेतरी खटकतं, ‘माणूस’ न लिहिता कोणी ‘मानूस’ लिहिलं की मनात अधोरेखित होतं. ‘कळलं’ ऐवजी ‘कडल’ किंवा ‘मनापासून’ ला ‘मणापासून’ लिहिणारे पाहिले की वेगळं फील येतं.

आधी वाटायचं मी बोलतेय, लिहितेय तसंच सर्वांनी लिहावं बाकी बोलताना ज्याने त्याने आपली शैली वापरावी.
पण आता तसं वाटत नाही. माझे विचार चुकत होते.

प्रत्येकाची भाषाशैली अथवा बोलण्याची, लिहिण्याची पद्धत वेगळी असते हे समजायला खूप वेळ लागला मला. हे लवकर समजलं असतं तर आतापर्यंत मी लिखाणातल्या काहींच्या काढलेल्या चुकांचा पश्चात्ताप करण्याची आता वेळ आली नसती.

पण आता समजलंय की भाषेत कोणाला बांधून ठेवणं किती चुकीचं आहे.

मी प्रयत्न करतेय की ज्याचं त्याचं लिखाण मी जसं च्या तसं वाचावं, कोणतीही चूक न काढता. वेळ लागेल so called शुद्ध भाषेचा मनावरचा ताबा कमी करायला पण एक दिवस नक्कीच यशस्वी होईन.

बाकी मराठी भाषा दिनाच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा 💐

प्रज्ञा सिध्दार्थ जाधव

लेखिका नवी मुंबई येथील रहिवासी असून MNC मध्ये Senior Analyst ह्या पदावर कार्यरत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*