नागसेन गौरव पुरस्कार माजी कुलगुरू.डॉ विठ्ठल घुगे यांना जाहीर

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने नागसेनवनातील माजी विद्यार्थ्यांस देण्यात येणार ‘नागसेन गौरव पुरस्कार’ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा मिलिंद महाविद्यालयाचे 1955 च्या बॅच चे माजी विद्यार्थी डॉ.विठ्ठलराव घुगे यांना जाहीर करण्यात आला आहे.

मागील तीन वर्षांपासून पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने “नागसेन फेस्टिव्हल चे आयोजन करण्यात येते यंदा दि.29,30,31 मार्च रोजी हा महोत्सव होत असून दि.31 मार्च रोजी समारोप प्रसंगी समारंभ पूर्वक हा पुरस्कार डॉ.घुगे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

डॉ.घुगे हे 1955 साली जिंतूर येथील केहाळ या गावातून महाविद्यालयीन शिक्षणासाठी मिलिंद महाविद्यालयात शिक्षणासाठी आले होते त्यांनी मिलिंद मधून एम.ए अर्थशास्त्र चे शिक्षण घेतले त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी उस्मानिया विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून दिली तसेच त्यावेळचा प्रतिष्ठित ‘मिस्टर मिलिंद’ हा सन्मानही त्यांना देण्यात आला होता. आज प्रख्यात अर्थ तज्ञ म्हणून ते ओळखले जातात.

1994 साली मराठवाडा विद्यापीठाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला त्यावेळी डॉ.घुगे हे विद्यापीठाचे कुलगुरू होते शासनाकडून नामांतर जाहीर होताच विद्यापीठाच्या मुख्य कामानिवरील नाव बदलण्यासाठी त्यांनी तात्काळ पुढाकार घेतला होता.

डॉ.घुगे यांनी लिहलेले अर्थशास्त्राशी निगडित अनेक पुस्तके आज विद्यार्थ्यांना संदर्भ ग्रंथ म्हणून प्राधान्याने सुचविले जातात बाबासाहेबांच्या देखरेखीखाली घडलेल्या विद्यार्थ्यांपैकी ते एक असल्याने या वर्षीच्या नागसेन गौरव पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला असून दि.31 मार्च रोजी सायंकाळी 8 वाजता नागसेन फेस्टिव्हल-2019 च्या समारोप प्रसंगी लुम्बीनी उद्यान, मिलिंद महाविद्यालय,नागसेनवन,औरंगाबाद येथे शिक्षण महर्षी.माधवराव बोरडे,जेष्ठ भीमशाहिर प्रतापसिंग बोदडे दादा व हिंदू कॉलेज दिल्लीचे प्रो.रतन लाल यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

~~~

आपला
सचिन निकम
निमंत्रक
नागसेन फेस्टिव्हल
मो.9270049458

सौजन्य: नागसेन फेस्टिवल

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*