मथुराबाई,भविष्य आणि आठाणे
सातवीत असेन..गावाच्या मध्यात पांढ-या मातीची गढी..वर पाटील राह्यचे.लोहार,कुंभार,सोनार-बाम्हणादी सर्वांची ठरीव साच्यात सभोवती जमीनीवर घरं ! रामोशी आणि सिताराम हे एकाच ‘सितारामोशी’ या शब्दातून सहज उमगायचं. चौकात लाकडी खांबावर चौकोनी काचांच्या फ्रेममध्ये दिवा लावला जाई..खुटकंदील तो !! दिवाबत्ती,दवंडी आणि रवण (रात्रीची गस्त) इ.सितारामोश्याची कामं! रघुनाथ-इसा वारकाच्या खोपटासमोर त्यांच्याच उसण्या वस्त-याने केवळ […]