माणगाव परिषदेचे शतकमहोत्सवी वर्ष

सचिन गरुड

माणगाव परिषदेचे हे शतकमहोत्सवी वर्ष आहे.जातीव्यवस्थेच्या तत्कालीन आत्यंतिक शोषित पीडित अस्पृश्य जातीसमूहाच्या उत्थानासाठी राजर्षी शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली जैन मध्यम, शेतकरी मराठा जातींच्या म्होरक्यांनी ही परिषद संगठीत केली होती. आप्पासाहेब पाटलांसारखे जैन मध्यमजातीय सत्यशोधक चळवळीचे ध्येयवादी कार्यकर्ते होते. त्या प्रभावातून ते जातीव्यवस्था विरोधी बनले होते. जैनधर्म हा अवैदिक व वर्णजातीविरोधी धर्म होता.

दक्षिणेत ब्राहमणीधर्माने शेकडो जैनधर्मीयांच्या कत्तली केल्या. नंतर जैनधर्म जातीग्रस्त बनला. राजर्षी शाहूंच्या सत्यशोधक चळवळीनी दक्षिण महाराष्ट्रातील जैन शेतकरी व व्यापारी जातीस्तराला जातीअंताच्या लढाईत उभे केले.

आप्पासाहेब पाटील, अण्णासाहेब लठ्ठे, भाऊराव पाटील आदी जैन सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीचे कार्यकर्ते बनले. माझ्या कित्येक जैन मित्रांना भाऊराव पाटील हे जैन होते, हेच माहित नव्हते इतके सत्यशोधक म्हणून ते सर्वत्र परिचित झाले की त्यांची जातीधर्माची पूर्वओळखच लोकांमधून पुसली गेली होती. आमच्या जैन बांधवांना हे माहित नाही की त्यांचा जैनधर्म हा बौध्द धर्माच्याबरोबरीने कट्टर जातीविषमता विरोधक राहिला.

अमितशहासारखे जैन बनीये जैन बांधवांना त्याहिंदुत्ववादाच्या दावणीला बांधत आहे की, ज्या प्राचीन हिंदुत्व ब्राह्मणी प्रवाहाशी प्राणांतिक वैर स्वीकारुन जैनांनी लढा दिला होता. जैन नेते मांसाहारविरोधाच्या नावाखाली मुस्लिम व दलितविरोधी बनवून ब्राह्मणीहिंदुत्ववादी संस्कृतीकारण व उच्चजातीय सत्ताकारण पुढे नेत आहेत आणि ज्या जैनधर्मी प्रवाहात जन्मले आहेत त्या जैनवारश्याची कत्तल करीत आहेत.
माणगाव परिषद ही जैन लिंगायत व मराठा शेतकरी बहुजन जातींना जातीव्यवस्था विरोधी लढा देण्यासाठी दलित कनिष्ठ जातींची दोस्तशक्ती म्हणून उभी राहण्यासाठी ऐतिहासिक पुकारा करीत आहे.

~~~

प्रा. सचिन गरुड: हे इतिहासतज्ञ, लेखक आणि आंबेडकरी कार्यकर्ते आहेत. ते क. भा. पा. कॉलेज, इस्लामपूर, सांगली येथे साहाय्यक प्राध्यापक व इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. यांच्याशी “garudsachin38@gmail.com” या ई-मेल आयडी वर संपर्क साधता येईल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*