लुम्बीनी उद्यानात रंगणार ‘नागसेन फेस्टीवल

डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने नागसेनवनातील आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने ‘नागसेन फेस्टीवल-२०१९’चे आयोजन करण्यात आले आहे़ २९ ते ३१ मार्च दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. महोत्सवामध्ये सामाजिक, शैक्षणिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार असल्याची माहिती आयोजन समितीचे सचिन निकम यांनी दिली.

गेल्या तीन वर्षांपासून नागसेन फेस्टीवलच्या माध्यमातून नागसेनवनातील निगडीत आजी-माजी विद्यार्थी, आंबेडकरी चळवळीत कार्यरत सैनिकांचे नागसेन भूमिशी असलेले नाते अधिक घट्ट करून क्रांतीभूमितून बाबासाहेबांना अपेक्षित असलेला समाजरथ उन्नतीच्या मार्गावर गतिमान करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यंदाचा महोत्सव २९ ते ३१ मार्च दरम्यान सायंकाळी ५.३० ते रात्री १० यावेळेत नागसेनवनातील लुम्बीनी उद्यान येथे होणार आहे.

२९ मार्चला सायंकाळी ६ वाजता यशदाचे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंडे यांच्या हस्ते उद्घाटन, सायंकाळी ६ ते ६.३० यावेळेत भीम गितावरील बासरी वंदन होईल. ‘जागतिक क्षितिजावरील आंबेडकरी चळवळीचा वेध’ विषयावर दुबई हेल्थ अथोरिटी चे डॉ. अनिल बनकर मार्गदर्शन करतील. अध्यक्षस्थानी डॉ.संजय पगारे असतील़ बी. जी रोकडे, माधवराव बोरडे, जनार्धन म्हस्के, विजयकुमार तायडे, पंढरीनाथ कांबळे, प्राचार्य. डॉ. भास्कर साळवी, प्रा. राम गायकवाड, दौलतराव मोरे, केशवराव बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती राहिल़ यावेळी डी. टी. डेंगळे, एस. आर. बोडदे, प्रा.राजेश भोसले पाटील, डॉ.अनिल पांडे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

३० मार्चला आंबेडकरी रॅपचे सादरीकरण होईल. शिवराम जाधव, बाबू अण्णा गारोल, सुरज बनकर, भिक्कन गवळी यांचा विशेष सन्मान करण्यात येईल. तर ‘एल्गार समतेचा’ हे राज्यस्तरीय अभिनव कवी संमेलन सायंकाळी ८ ते १० यावेळेत होईल़ देवानंद पवार, राकेश शिर्के , कुणाल गायकवाड, सुदाम राठोड, उर्मिला खोब्रागडे, विकास जाधव, प्रा.पंजाबराव मोरे, ध. सु जाधव, रमेश डोंगरे, भीमानंद तायडे हे कवी यात सहभागी होणार आहेत.

३१ मार्चला भारतीय संविधानापुढील आव्हाने आणि आंबेडकरी चळवळीची भुमिका या विषयावर प्रो. रतन लाल (दिल्ली) यांचे विशेष व्याख्यान होईल. विजयकुमार गवई अध्यक्षस्थानी असतील. तर डॉ. एम. ए. वाहुळ, डॉ. क्षमा खोब्रागडे, डॉ. श्रीकांत देशमुख, प्राचार्य यु. एम. म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे़ यावेळी डॉ. राहूल म्हस्के, मनोहर उबाळे, डॉ. सुरेश चौथाईवाले यांचा विशेष सत्कार करण्यात येईल. याशिवाय माजी कुलगुरू डॉ. विठ्ठल घुगे यांना ‘नागसेन गौरव पुरस्कार’ अ‍ॅड. माधवराव बोरडे, भिमशाहीर प्रतापसिंग बोदडे, प्रो. रतन लाल यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानंतर मेघानंद जाधव यांची भीमगितांची क्रांतीकारी मैफिल रंगणार आहे़ महोत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सचिन निकम, अविनाश कांबळे, सिद्धार्थ मोकळे, मेघानंद जाधव, प्रा किशोर वाघ, अ‍ॅड. धनंजय बोरडे, अरुण शिरसाठ, अतुल कांबळे, आनंद सुर्यवंशी, कुणाल भालेराव, चिरंजीव मनवर, विवेक सोनवणे, विशाल देहाडे, किरण शेजवळ, हेमंत मोरे, प्रसेनजीत एडके, अविनाश लहाडे, संदीप मोरे, अक्षय शेजुळ, सुशील दिवेकर, विशाल बचके, जितेश चाबुकस्वार यांनी केले आहे.

~~~

सौजन्य: नागसेन फेस्टिवल टीम

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*