Outlook च्या लिस्टची फसवेगिरी!

जे एस विनय

नुकतच काही दिवसांअगोदर  “आऊटलुक” मासिकाने  “ 50 Dalits remaking India” अर्थात  “५० दलित जे भारताला पुन्हा घडवत आहेत  ” असा एक अंक प्रसिद्ध केला तेव्हा अलीकडेच बरेच वादंग झाले. [१]

अनेक जाती-विरोधी(anti-caste) कार्यकर्त्यांनी या विषयावर प्रश्न उपस्थित केले. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच त्यावर बंदी घातली असल्याने काहीजण “दलित” या शब्दाच्या अधिक वापराबद्दल बोलत होते. राहुल प्रधान [२], दिशा पिंकी शेख [३], कडूबाई खरात [३] या नामवन्त व्यक्तींनी नंतर ते दलित नसून आंबेडकरवादी असल्याची वक्तव्ये दिली व खुलासा केला.

बहुजन, आंबेडकरी, अनुसूचित जाती, बौद्ध (याद्यात सर्व बौद्ध धर्माचे नसले तरी), मुलनिवासी इत्यादी दलित जागी पर्यायी शब्द वापरायला सोशल मिडियामधील काही लोकांनी सुचवले.

तथापि, मी येथे काही मूलभूत मुद्द्यांकडे लक्ष वेधू इच्छित आहे.

१. यादी आता का प्रकाशित होत आहे?

यादी प्रसिद्ध होण्याचे काही विशिष्ट कारण आहे का ? सूरज येंगडे  सारखे लोकही या यादीचे प्रसिद्धी करीत आहेत. ही यादी प्रकाशित करून कोणाचा फायदा होतो? स्वतः ब्राह्मण सवर्ण जातीचे असलेले व्यासपीठ म्हणून आऊटलुकने स्वतः च्या जात स्थानाच भान ठेवून दलितांना प्रमाणित करणारे लेख छापणे हे कितपत नीतिमय आणि योग्य आहे याचा विचार करू नये का ?

२. हे कोण प्रकाशित करीत आहे?

आऊटलुक हे प्रामुख्याने एक उच्च जातीचे प्रकाशन गृह आहे. संचालक मंडळाचे किंवा कर्मचार्‍यांचे आढावा घेतला असे दिसून येते की आऊटलुक यांच्या कंपनी मधेच किती दलित व इतर शोषित समाजातील लोक कार्यरत आहेत [४]. त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्यांची यादी त्यांच्या website वर पण उपलब्ध आहे. यादी बघून स्पष्ट होईल कि ९५% पेक्षा जास्त लोक ब्राह्मण सवर्ण समाजातले आहेत.   

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रसिद्ध शब्दांची आठवण करुन देतो:

“ब्राह्मण विद्वान गृहस्थांनी ऐतिहासिक संशोधनाच्या बाबतीत हातचलाखीचे प्रकार केलेले आहेत हे उघड आहे. तसे करण्यामागे ब्राह्मण विद्वान गृहस्थांचे ह्या ऐतिहासिक वाङ्मयाचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी दुहेरी हेतू आहेत. यातला पहिला हेतू असा की,आपल्या बापजाद्यांनी निर्मिलेल्या या तथाकथित वाङ्मयाचे सर्वतोपरी रक्षण करणे,प्रसंगी सत्याचा बळी द्यावा लागला तरी बेहत्तर!…आणि सर्वार्थाने ब्राह्मणांच्या हक्काधिकारांना बळ देणाऱ्या, त्यांच्या हितसंबंधांची जोपासना करणाऱ्या ह्या वाङ्मयाच्या श्रेष्ठत्वाला तसूभरही बाधा निर्माण होईल असे कुठलेही कृत्य या विद्वानांच्या हातून घडू नये याची काळजी घेणे, हा दुसरा हेतू. ही कार्यपद्धती अखंडपणे चालू ठेवण्यातच आपले हित आहे, शिवाय आपल्या पूर्वजांचे माहात्म्य सतत गात राहून त्यांचे श्रेष्ठत्व अबाधित राखण्यासंबंधीचीच जाणीव या ब्राह्मण पंडितांच्या मनात अष्टौप्रहर जागृत असते. त्यामुळे आपल्या ज्ञातिबांधवांना विपरित ठरेल, असे कुठेही ऐतिहासिक सत्यशोधन करण्याच्या किंवा ते इतरांना समजून सांगण्याच्या भानगडीत ते सहसा पडत नाहीत. म्हणूनच ऐतिहासिक संशोधनाच्या क्षेत्रांत काही ठराविक गोष्टी,घटना,प्रसंगांचा काळ निश्चित करणे किंवा वंशावळींचा अभ्यास करणे ह्या पलीकडे या विद्वान ब्राह्मण गृहस्थांचे असे कुठलेही अनन्यसाधारण योगदान आढळत नाही.”

३ . भारत घडवणारे फक्त ५० दलित आहेत काय?

आऊटलूक ला अस म्हणायच आहे काय की जे २० कोटि भारतातले दलित आहेत ( जर भारतात १३० कोटि पैकी १५% दलित आहेत अस गृहीत धरल ), त्यांच्यातून हे फक्त ५० दलित देश बद्लावत आहेत? इतर लाखो करोडो दलितांचे काय ? सरासरी मजूर, शिक्षक, कामगार, दैनंदिन मजुरी मजूर, फळ विक्रेते, नर्स, डॉक्टर इत्यादी (सर्व दलित)  आहेत त्यांचे काय जे अत्यंत कमी पगारात अधिक श्रमाचा काम करत आहेत ?

४)  शोषित विभागांमध्ये विभागणी का निर्माण करायची आहे?

सरासरी वाचक मग सूचीतील लोकांच्या गुणांवर अधिक चर्चा करेल काय? काहीजण वैयक्तिक तपशीलांपर्यंत प्रत्येक ५० नावे अभ्यासण्याचा प्रयत्न करतील. काहीजण म्हणतील की हे अमुक व्यक्ति  यादीमध्ये का नाही? तो दूसरा यादीमध्ये का आहे?

हे  म्हणजे “गुणवत्तेच्या” चर्चेसारखे आहे. अशी भावना निर्माण करते की कोणीतरी चांगले आहे, लायक आहे आणि इतर दलितांमध्ये ती गुणवत्ता (मेरिट) नाही..

५. दलितांबद्दलच का ?

दलित व्हॅक्यूममध्ये असतो काय ? एखादी व्यक्ती दलित आहे हे का तर कारण कोणी तरी ब्राह्मण आहे आणि त्यांच्याकडे उत्पादनाचे सर्व साधन आहेत. आऊटलुक शीर्ष अश्या ५० ब्राह्मण सवर्णांबद्दल का लिहित नाही की  ज्यांच्यामुळे दलितांकडे पुरेसे स्रोत नाहीत किंवा त्यांच्यामुळे दलित ही व्यवस्था निर्माण झाली आहे ? जाती समजून घेण्यासाठी दलित नेहमीच मुख्य केंद्र का असावे?

जात = दलित हे समीकरण का चालवले जात आहे? केवळ जाती समजून घेण्यासाठी दलित नेहमीच अभ्यासाचा मुद्दा का असावेत? शोषक ब्राह्मण सवर्ण जाती देखील ह्याच जात व्यवस्थेच्या लाभार्थी आहेत, मग त्यांच्यावर अभ्यास का केला जात नाही?

६. एसटी, ओबीसी, पसमांदा(मुस्लिम समुदायातील शोषित वर्ग) , इतर उपेक्षित समुदाय जसे भटके विमुक्त यांचं काय?

उद्या हा पाया रचला गेला आहे, जिथे उद्या इतर उपेक्षित लोकदेखील विचारतील की फक्त देशाची पुनर्निर्मिती करणारे दलित आहेत काय? ते त्यांची नावे विचारू शकतात तसेच दलित समाजाबद्दल वैरभाव निर्माण करू शकतात. तसेच त्यांचा शोषणाचा प्रश्न असाच निकाली काढला जाणार आहे का? तर ही चालबाजी ओळखली पाहिजे.

म्हणूनच, सर्व विभागातील सर्व लोकांनी आता याद्या तसेच भविष्यकाळात विरोध केला पाहिजे आणि त्यांच्या भयंकर अजेंडामध्ये ब्राह्मण सवर्ण प्रकाशन संस्था यांना आव्हान दिले पाहिजे. खर तर शोषक ब्राह्मण सवर्ण जातींची लिस्ट दर आठवड्याला निघू शकते ज्यांच्यामुळे एससी एसटी ओबीसी यांचे हक्क मारले जातात, परंतु Outlook अशी कुठली यादी प्रसिद्ध करणार नाही, कारण शेवटी प्रश्न जाती हितसंबंधांचा आहे.

जे एस विनय

लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात काम करतात तसेच जातविरोधी परिवर्तनाच्या चळवळीत सक्रिय आहेत .

References:

  1. https://www.outlookindia.com/videos/cover-story-50-dalits-remaking-india/3777 
  2.  https://m.facebook.com/story.php?story_fbid=1865995680243790&id=100005001281062
  3. https://www.youtube.com/watch?v=_i5xwpSHalw
  4. https://www.outlookindia.com/pages/aboutus
  5. Dr.Babasaheb Ambedkar in ‘Who were the Shudras’.

1 Comment

  1. अनु जा./अनु ज. यांच्या बद्दल किती तरी वेळा चर्चा होत असेल, ‘अभ्यास’ होत असेल, अपमान होत असेल पण यांच्या पेक्षा ब्राह्मण स्टडीज सेंटर असनं खरतर गरजेच आहे. ह्या जमाती बद्दलचा कितीही अभ्यास कमी पडेल. पण शेवटी काहीही झाल्यास शोषक वर्ग म्हणजे सवर्ण/ओबीसी अधोरेखित होत नाही आणि त्याला कारणही बरेच आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.


*