आंबेडकरी असर्शन (assertion) च्या विकृतीकरणाच कानडी ब्राह्मणी षडयंत्र: ‘आ कराला रात्री’

योगेश भागवतकर

काय झालंय की मागे दोनएक वर्षा पूर्वी एक हिंदी डब केलेला कन्नड चित्रपट बघण्यात आला होता.आणि तो बघत असताना त्यात बरंच काही खटकल होत.अगदी चीड आणणार! आता तो पुन्हा आठवण्याच कारण असय की नुकतीच समाजमाध्यमांवर सुमित्रा भावे यांच्या “कासव” चित्रपटावर बरीच चर्चा झडतेय ती रोहित वेमुला यांच्या प्रतिकात्मक रुपात वापरल्या गेलेल्या फोटोच्या गैरवापरावरून . सवर्ण लेखक ,दिग्दर्शक आपल्या साहित्य , कलाकृतीतून कशाप्रकारे अतिशय चलाखीने आणि अतिशय सुष्मपणे ब्राह्मणी वर्चस्ववादी व्यवस्थेला पोषक असा नरेटिव्ज उभा करीत असतात. ते एव्हाना या निमित्याने स्पष्ट झालेलेच आहे.

त्याचाच एक घृणास्पद प्रकार म्हणजे कन्नड मधील “आ कराला रात्री ” हा चित्रपट जो दयाल पदमनाभन यांनी दिग्दर्शित केलाय लेखक आहेत मोहन हबू व नवीन क्रिष्णा जो २०१८ ला प्रदर्शित झालेला. जो हिंदीमध्ये” घातक रात” या नावाने डब केला गेलाय. हा चित्रपट बऱ्यापैकी हिट झालाय, त्याला कर्नाटक राज्याचा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार सुद्धा मिळालाय! विशेष म्हणजेचर्चा होतेय ती चित्रपटाच्या कथेची, आता कथा तशी पाहाल तर अशी काहीएक  युनिक वैगरे नाही आहे. खरेतर ती एक प्राचीन लोककथा आहे. एक बोधपर कथा जी जगभरात वेगवेगळ्या भाषेत व प्रांतात लिहिल्या व चित्रित केली गेली आहे. तुम्ही ती एका दूरदर्शन मालिकेत वा एका रशियन कादंबरीत किंवा “परिणती” या राजस्थानी बॅकग्राऊंडवर चित्रित केल्या गेलेल्या चित्रपटात बघितल्याचे असू शकते. जी एक मेसेज कंडक्ट करते की अतिलोभ हा माणसाला कसा उद्धवस्त करू शकतो. आता या कथेबद्दल एव्हढं सांगण्याचा उद्देश एव्हढाच कि तिचा कोण्या एका जात, धर्म ,प्रांताशी वा कोण्या एका विशिष्ट समुदायाशी काडीमात्र संबंध नाही, कथा ही युनिव्हर्सल आहे. पण आपल्या येथे बामणी सवर्ण मेंदू कसा काम करतो ते आपण ही कथा या चित्रपटाच्या अनुषंगाने कशी चित्रित केली गेली आहे ते थोडक्यात पाहूया…


त्यात अस दाखवलंय की (गावाकुसाबाहेर )एक गरीब कुटुंब आहे  जे आपल्या हलाखीच्या परिस्थितीने त्रस्त आहे. कुटुंबात बाप आई आणि तरुण मुलगी आहे जे कर्जा मध्ये डुबलेले असतात बाप दारुडा आणि आळशी असतो ,मुलगी अगदी तुसळया स्वभाची असते,(देवाधर्माच्या बाबतीत अश्रद्ध , शंकेखोर तथाकथित ब्राम्हनी दैवी संकेताना फटकारून वागणारी)  वाईट नजर ठेवणारी आणि लागट बोलणारी, आईही स्वार्थाला बळी पडलेली. (आई गावातील स्त्रियांचे बाळंतपण करणारी “आया” वा “दायी” असते) तसा एक प्रसंग चित्रपटात दाखविलेला. जाणीवपूर्वक विशिष्ट दुर्गुणांनी युक्त अशी बांधणी केलेले ते पात्र, तर त्यांच्या घरी एक सुशिक्षित श्रीमंत ज्याच्याकडे भरपूर पेटी भरून पैसे आणि दागिने असतात असा तरुण येतो. तो त्यांच्याकडे थांबतो त्यांच कर्ज वैगरे फेडून त्यांना मदत करन्याला ही तो स्वतःहून पुढाकार घेतो. ती मुलगी त्याला सेक्शुली आकर्षित  करण्याचा प्रयत्नही करते , त्याच्याकडील पैसा पाहून यांची नियत फिरते आणि ते त्याच्या हत्येचा कट रचतात आणि शेवटी त्याची हत्या करतात.आणि शेवटी चित्रपटाचा सस्पेन्स असा की तो मुलगा त्यांचाच असतो जो की लहानपणी घरून पळून गेलेला असतो आणि प्रगती केलेला एक मोठा व्यक्ती बनून परत आलेला असतो आपल्या कुटुंबाला सरप्राइज करावं म्हणून ओळख लपवून ठेवतो. तर हे शेवटी त्या कुटुंबाला कळते पण वेळ निघून गेलेली असते स्वार्थापाई स्वतःच्याच मुलाचा खून केलेला असतो आणि ते सर्व मग मिळून जळून सामूहिक आत्महत्या करतात….

आता यात आक्षेपार्ह असे चीड आणणारे काय आहे ? तर वर सांगितल्या प्रमाणे ही कथा वैश्विक होती. या कथेचा कोणत्याही जात, धर्म,प्रांत वा कोण्याही एका विशिष्ट समुदायाशी प्रत्यक्ष अप्रत्येक्ष संबंध नव्हता. तो आता या चित्रपटाने जोडलाय, आणि त्यासाठी दिग्दर्शकाने आणि स्क्रिप्ट राइटर ने केलेला प्रयत्न ,घेतलेले कष्ट वाखाणण्याजोगे आहे. चित्रपटाची सुरुवातच एका मंदिरात सुरू असलेल्या एका महाराजांच्या प्रवचनातून होते..जिथे तो महाराज सर्वसामान्य लोभ मोह मत्सर या मानवी विकारांवर नैतिक शिकवण देत असतो ,एरवी एव्हढ्या पुरतेच काही ते मर्यादित नसते पण असो येथे ते महत्त्वच नाही , तर ज्यात ती आई आणि मुलगीही बसलेली असते त्यांच्यात कुजबुज होते आई प्रवचनावर लक्ष द्यायचे बोलते तर मुलगी त्या बाबत नकारात्मक बोलून त्या महाराजीची टिंगल करते. दुसरा प्रसंग  दाखविलाय तो दारावर आलेल्या जोतिष्याचा ,जो त्यांना धनलाभ होण्याविषयी काहीशी रहस्यमयी अशी बडबड करतो पण बाप व मुलगी त्याच्यावर कमालीचे खेकसतात व त्याला हुसकावून लावतात. तिसरी गोष्ट ही की त्या मुलाची तर त्याचा प्रवेशच नदीपात्रात योगासन करताना दाखविला आहे. मंदिरात जाणारा सश्रद्ध असा दाखविला आहे. अन्यही काही पात्र आणि घटना आहेत ते मला येथे महत्वाचे वाटत नाही.म्हणून त्यांचा उल्लेख टाळतोय.आता या तिन्ही बाबी वा घटना म्हणू त्या का ? व कशा पद्धतीने दर्शविल्या गेल्या आहेत ते बघूया, आपल्या येथील लोकसमाज हा  दीर्घकालीन ब्राह्मणी जातीय विषमतावादी धर्मसंस्कृतीच्या वर्चस्वाखाली राहिला आहे. बामन सवर्णांनी आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी सर्व संसाधनांवर मालकी हक्क निर्माण करण्यासाठी, आणि बहुसंख्याकांचे उपजत मानवी अधिकार नाकारण्यासाठी  धर्मसंस्कृतीचा येथेच वापर केला, आपलं हे पितळ उघडे पडू नये म्हणून  त्यांनी जनमानसात नितीतत्वाविषयक काही धारणा सेट केल्या, देवधर्माला मानणारा , शंका न घेणारा, डोळे झाकून श्रद्धा ठेवणारा , ज्योतिषी वैगरे तत्सम पाखंड असलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणारा म्हणजे सुसंस्कृत ,सभ्य ,आदर्श वैगरे … आता या यांच्या ब्राह्मणी व्यवस्थेला सुरुंग लावण्याचं काम कोणी प्रामुख्याने केलं आहे तर ते महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी, ब्राह्मणीधर्मव्यवस्थेची पोलखोलकरून त्यांचा दांभिकपणा समोर आणून वैश्विक अशी मानवी मूल्य ,आणि नितीतत्व या मातीत रुजविण्याच काम बाबासाहेबांनी केलं आणि एक नवीन दृष्टिकोन त्यांना मानणाऱ्या त्यांच्या अनुयायी वर्गात निर्माण झाला,  त्यात ब्राम्हणी आदर्शाच्या धारणा नाकारल्या गेल्या आणि एक विशिष्ट प्रकारचा attitude त्याच्या वागण्या बोलण्यात निर्माण झाला . जो बहुसंख्य ब्राह्मणी मानसिकतेच्या आवरणाखाली जगणार्याच्या दृष्टीने असभ्य ,असंस्कृत मानल्या जातो. 

हा एक धागा पकडून दिग्दर्शकाने त्या कथेतील गरीब कुटुंबाला दलित कुटुंब दर्शविण्यासाठी वरील घटनांचा वापर चलाखीने केलेला आहे. जो चित्रपट निर्मात्यांच्या विकृत जातीय मानसिकतेतून त्या कथेचा भाग झालेला आहे.मी जो वर कथेचा सार सांगताना कंसात जी वाक्य घातली आहेत ती व चित्रपटातील सुरुवातीच्या घटना या मूळ लोककथेचा भाग नाही. जस की गावकुसबाहेरील घर, आईच ‘दायी’, ‘आया’ असणे जे मुख्यत्वे करून दलित स्त्रियाच गावगाड्यातील निश्चित अस काम होत व अजूनही आहे. बर तुम्हाला गरीब कुटुंबच दाखवायचं होत तर एखादं ब्राम्हण कुटुंबही दाखवता आलं असतंच की ,एरव्ही तुम्हीच मोठ्या हिरीरीने “बामन सुद्धा गरीब असतात” हे सांगत असतातच ना ! तर हा सर्व अट्टाहास कशासाठी तर ते गरीब कुटुंब  केवळ एक  “दलित कुटुंब” दाखविण्यासाठी! तर एव्हढ्यावरच दिग्दर्शक समाधानी नाही तर ज्या प्रकारे कथेची मांडणी आणि पात्र दिग्दर्शकाने उभे केले त्यात ते त्या कुटुंबाला दलित कुटुंब  दर्शविण्यात कमालीचे यशस्वी झाले असताना काय कमी राहू नये म्हणून की काय दिग्दर्शकाणे निर्लज्जपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या  फोटोचा वापर केला. जो त्यांच्या घरातील भिंतीवर एकमेव फोटो होता . जो बरोबर चित्रपटातील एका उत्कट प्रसंगीच हायलाइट करण्यात आला आणि शेवटी तर अधिकच ठळकपणे,स्पष्टपणे जेव्हा दर्शकांच्या भावना शिगेला पोहचल्या असतात. आणि तेव्हाच नेमका तो फोटो सर्व लक्ष स्वतःकडे खेचून घेतो ! हे काही चुकीने अनवधानाने घडलंय काय? हा कमालीचा नीचपणा नाही काय? कोण म्हणेल ही ब्राम्हणी विकृती नाही म्हणून ?

एरव्ही तुम्हाला बाबासाहेबांचा फोटो दाखवायला सुतक पडलेलं असत ! बर बाबासाहेबांचा फोटो दाखविला नसता तर चित्रपटावर त्याच्या कथानकावर काही फरक पडला असता का? तर  असा काहीच प्रकार नव्हता ,एक सर्वसामान्य लोककथेचा अश्या विकृतपद्धतीने वापर  करून दिग्दर्शकाचा चित्रपट निर्मितीचा अंतस्थहेतु स्पष्ट होतो. तो ब्राम्हनी वर्चस्वाला आव्हान बनलेल्या आंबेडकरी असर्शन ला बदनाम करणे, त्यांना विकृत ठरविणे.कला साहित्य चित्रपट या क्षेत्रात सुद्धा बामनसवर्ण किती नीचपणे काम करतो याच “आ कराला रात्री ” हा चित्रपट उत्कृष्ट उदाहरण आहे.जातीव्यवस्था ही मृत वस्तू नाही, तीची वास्तविकता नाकारणे तीच जिवंत आणि प्रभावी असणे नाकारणे हे प्रस्थापित बामनसवर्णांच्या  सोयीच असत , म्हणून कोणी हे सुद्धा नाकारले की या चित्रपटात अस काहीही नाही , तुम्हीच त्यात जात शोधताय . तर आता हे काही नवीन राहिलेलं नाही कासव चित्रपटाची आंबेडकरी दृष्टीने जेव्हा समीक्षा झाली तेव्हा सुद्धा हेच झालं!…

जय भीम

योगेश भागवतकर

लेखक अमरावती येथील रहिवासी असून शिक्षण BA(English literature)असून वर्धा येथे सरकारी सेवेत कार्यरत आहे.

2 Comments

  1. I expect things like these from savarna fat cats. It is not new at all. Assertion of marginalized will always hurt their belly.

Leave a Reply

Your email address will not be published.


*