गाणं भीमाचं दाबणार नाय
अत्याचाराच्या जोरानं
तरी पोरं ही वाजवतील
बाबासाहेबांची रिंगटोन
जीव गेला जरी आमचा
जातीयतेच्या हल्ल्यात
तरी भीमाचा फोटो हा
लाऊ काळजाच्या किल्ल्यात
बाप भीमाला मानलंय हो
इथल्या लहान थोरांनं
तरी पोरं ही वाजवतील
बाबासाहेबांची रिंगटोन..
भीमराया च्या नावावर जरी
झालोत कुर्बान
नसानसा मधून वाजल बाबासाहेबाचं गानं
केलं सोनं ह्या जीवनाचं त्या क्रांतिकारानं
तरी पोरं ही वाजवतील
बाबासाहेबांची रिंगटोन..
पोरं भिमाची मर्दानी
न्हाई माघारी सारनार
अश्या पोकळ धमक्यांना नाही कधीच डरनार
किती निष्पाप मारिले जातीयतेच्या ढोरानं
तरी पोरं ही वाजवतील
बाबासाहेबांची रिंगटोन..
सांगा कुठंवर चालायचं जातीयतेचा संघर्ष
कधी सुनील करणार माझ्या भीमाचा उत्कर्ष
आम्ही बुद्धाचे अनुयायी जातो बुद्ध विचारानं
~ सुनील खरे/ डॉ. उत्कर्ष शिंदे
विडिओ: www.youtube.com
- आंबेडकरी गीतांचे स्वरांकित विद्यापीठ प्रतापसिंगदादा बोदडे - June 10, 2022
- महिला प्रश्न जितका माझ्या आई बहिणीचा आहे तितकाच तो माझ्या बापाचाही आहे - March 8, 2021
- बिजनेस पार्टनर्स हवे आहेत - November 26, 2020
Leave a Reply