शाकयाई
हिंदू धर्माचा अट्टाहास: छट पूजा, बिहार मधील हिंदू धर्मानुसार सर्वात मोठा आणि पवित्र सण मानल्या जातो. या सणामध्ये सूर्याच्या पूजे सोबत दोन दिवस पानी सुद्धा न पिता उपवास करावा लागतो आणि छट मातेची पूजा करावी लागते. या सणाची प्रचलित महत्ता आहे की जो कुणी हे व्रत करणार उगवत्या आणि डुबत्या सूर्याची नदीच्या काठावर पाण्यात उभे राहून पूजा करणार त्याची मनोकामना पूर्ण होणार.
प्रत्येक गोष्ट ही सामान्य वर्गातील लोक (People from General category of Hindu religion) आणि मागासवर्गीय (OBC, ST, SC) लोक मोठ्या रिती-रिवाजणे कार्य पूर्ण करतात या सणासाठी सगळे घर साफ केले जाते, नगर निगम , नगर पालिके द्वारा सगळे रस्ते स्वच्छ केले जातात. जागो जागचा कचरा उचला जातो. लाऊड स्पीकर मध्ये छट पूजे ची गाणी वाजवली जातात. सगळी कडे प्रसन्न वातावरण, श्रद्धेचे वातावरण पसरले असते.
मग या सगळ्या मध्ये जातीयता येते कुठून? तर ती स्पष्ट रूपाने पाहायला मिळते ती नदीच्या काठावर (घाट). जी सामान्य-वर्गातील(उच्च जातीय) लोक आहेत त्यांना नेहमीच स्वच्छ , नेहमी वापरात असलेला घाट मिळतो आणि मागासवर्गीय लोकाना नेहमीच वापरात नसलेला, बुजलेला स्मशानाच्या बाजूचा अस्वछ पाण्याचा घाट मिळतो. कुणी कुणाच्या घाटावर जात नाही. कुणी कुणाच्या पूजेत दखल घालत नाही. हे सगळे उघड असते आणि तरी ही मागासवर्गीय स्वता: ला हिंदू धर्माचे पाईक मानतात. एवढी उघड विटाळची जातीयता होत असतानाही स्वता:ला हिंदू म्हणवून घेतात आणि त्यातच गर्व पण मानतात. अश्या धर्माचे कर्मकांड करतात जो धर्म यांना कधी च स्वीकारत नाही आणि कधी स्वीकारणार पण नाही.
स्वत:चे अस्तित्व उघड करण्याची भीती : प्रियंका (बदलेले नाव) बिहार मधल्या दरभांगा जिल्हयातील होतकरू मुलगी शिक्षणात हुशार आणि दिसायला पण देखणी बँकेमध्ये पी ओ होण्याचे स्वप्न म्हणून वाणिज्य शाखेत दाखला घेतला. बोलता बोलता सोशल मिडीया वर फ्रेंड बनू म्हणून नाव विचारले तर आडनाव तिने “झा” सांगितले. आतुरते पोटी विचारणा केली की तुझ्या सखा भाऊ पासवान हे त्याच्या नावा मागे लावतो आणि तू “झा”?? “झा” हे नाव बिहार मध्ये फक्त आणि फक्त मेथिली ब्राह्मण लोकच लावतात मग तू का आपल नाव बदलवून ठेवल आहेस ? त्या वर तिचे उत्तर मिळाले की ती शिक्षणात हुशार आहे, पाहायला पण देखणी आहे त्या मुळे तिच्या कॉलेच्या मुली तिला सामान्य वर्गातील (हिंदू धर्मातील) समजतात. आणि तिला त्यांच्या हा समज टिकवून ठेवायचा आहे अन्यथा तिला तथाकथित सवर्ण मुली सोबत राहता येणार नाही, त्या तिला त्यांच्या समूहातील सामावून घेणार नाहीत.
स्वत:ला स्वत:च्या सामाजिक अस्तित्वाची लाज वाटावी अशी परिस्थिति ह्या हिंदू धर्मा मुळे २१ व्या शतकात ही पाहायला मिळत आहे. आपल्या पूर्वजांनी हिंदूधर्मातील शास्त्रा मूळे शूद्र म्हणून नाही नाही ते अत्याचार सहन केले. डॉ. भीमराव आंबेडकरांना अन्याय, अपमान सहन करून शूद्र समजणाऱ्या ह्या समाजाला तथाकथित सवर्णांसोबत जीवन जगण्याचा समान हक्क प्राप्त करून दिला. आणि तरीही आपल्यालाच आपल्या अस्तित्वाची लाज वाटावी. मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार करत आलेल्या, आपल्या हक्काची, आपल्या संसाधनाची लूट करत आलेल्या, शोषण आणि पिळवणूक या ना त्या मार्गाने करत आलेल्या आणि आजही अत्याचार ,शोषण करणाऱ्या समाजाला स्वत:ची लाज वाटत नाही पण ज्यांनी त्यांचे अत्याचार सहन केलेत, आणि आज ही अत्याचार, भेदभाव सहन करीत आहे त्यांनाच आपल्या अस्तित्वाची लाज वाटावी का ?
आम्हीं मागासवर्गीय (OBC, ST, SC) आहोत कारण आमच्यावर पिढ्या न पिढ्या अन्याय अत्याच्यार होत आलेले आहेत, शोषण होत आलेले आहे. सन्मानाने माणूस म्हणून जगण्याचा आमचा अधिकार हिंदू धर्मातील अमुक तमुक शास्त्रात लिहिलेले आहे म्हणून हिरावून घेतल्या गेला आहे . आमचे मनुष्य म्हणून जगण्याचे मूलभूत अधिकार हिरावून घेतले गेलेत आहेत, आणि आता जेव्हा सन्मानाने जगण्याची, बरोबरीने जगण्याची वेळ आली तरी आम्हालाच आमच्या अस्तित्वाची लाज वाटावी का ?
आजही सामान्य वर्गातील हिंदू धर्माचे लोक मागासवर्गीयना शूद्र च समजतात भारतीय घटनेच्या भीती पोटी असो किंवा “आम्ही जातीयता मानत नाही” या दीखाऊ पणामुळे असो त्यांनी जातीयता, विटाळ शुवाशुत याचे मापडण बदलवून, या ना त्या मार्गाने वर्णवेवस्था जीवंत ठेवलेली आहे.
आपण जेंव्हा हिंदू धर्मातील सामान्य वर्गाला सवर्ण , उच्चवर्णीय, उच्चजाती चा म्हणतो तेंव्हा आपण आपल्या बोलण्यातूनच त्यांच्या शास्त्रीय वर्ण व्यवस्थेचा संदर्भ देतो आणि त्यांच्या सामोर आपली जागा ठरवतो, आपल्या ही आपल्या बोलण्याचे भान ठेवणे अति आवशक आहे
आजही हिंदू समाजातील लोकानी मागासवर्गीयांवर हिंदू धर्माचा पगडा एवढा मजबूत करून ठेवला आहे की त्याला तोडण्यासाठी मागासवर्गीयांना हिम्मत होत नाही. त्यांच्या मनाला आणि मेंदूला देवी देवतांच्या भीती ने, पाप पुण्याच्या भीती ने , स्वर्ग नरकाच्या भीती ने, देवी देवतांच्या श्रापा च्या भीती ने मोठया मजबुतीने पकडून ठेवलेली आहे.
जर असे भिणारे मन आणि मेंदू ज्या मागासवर्गीयांचे असेल ते मागासवर्गीय आपल्या मुलाना पण तीच भीती आपल्या पुढील पिढीला हस्तांतरीत करणार, आपण अश्या गुलाम , भित्र्या मना कडून आणि भित्र्या मेंदू कडून ज्ञानाची आणि स्व जागरूकतेच्या हस्तांतरची अपेक्षा कशी करू शकणार.. आणखी कीती वेळ लागणार आहे आपल्याला या गुलामीतून निघण्यासाठी , आपण कधी पर्यन्त मुखोटे चढवणार आहोत कधी पर्यन्त ब्रम्हा, विष्णू शंकर, सरस्वती दुर्गा या नावाने भिणार आहोत.
बिहार मध्ये मागास्वर्गीयाचा शिक्षणाचे स्तर खूप खालावला आहे, गरीब हा खूप गरीब आहे आणि श्रीमंत हा खूप श्रीमंत आहे. जे कुणी श्रीमंत आहे ते जास्तीत जास्त सामान्य वर्गाती लोकच आहेत. आर्थिक दारिद्र्य आणि शिक्षांचे दारिद्र्य मागासवर्गीय समाजात असल्या मुळे २१ व्या शतकात हि अशी उघड जातीयता पाहायला मिळते.
परतुं हे चित्र केवळ बिहारचे नसून संपूर्ण भारतात या ना त्या मार्गाने ही जातीयता बाहेर तोंड काहाडत असते. भारतातील विकसित राज्य मानल्या जाणारे ते दक्षिण भारतातील रोहित वेमुला असो, वा महाराष्ट्रातील भोंतमंगे किंवा डॉक्टर पायल तडवी असो . जर या राज्याची ही स्थिति आहे तर मागासलेल्या राज्यातील स्थिति एकूण आश्चर्य वाटावं असं काहीच नाही
ही स्थिति बदलण्यासाठी मागासवर्गीयांना (OBC, ST, SC) स्व-जागरूकता येणे ,आपल्या गरीब स्थिति तून बाहेर पडण्याची हिम्मत येणे आणि शिक्षणाचे खरे महत्व समजणे अति आवश्यक आहे.
“शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा” हा जो मार्ग बाबासाहेबांनी सांगितलेला आहे त्याला आपल्याला आचरणात आणने अति आवश्यक आहे, नाही तर आपल्या पिढ्या नू पिढ्या, त्यांच्या मेंदूने आणि मनाने हिंदू धर्माचे गुलामच बनून राहतील आणि गुलामगिरीच हस्तांतरित करतील
शाकयाई
लेखिका या गेल्या ७ वर्षापासून बिहार राज्यातील समाज कल्याण विभागात, बिहार सरकार , पटना मध्ये कार्यरत आहेत.
- बिहार राज्यातील जातीयतेचा अनुभव… - June 14, 2021
मागासलेले बौध्द आजही स्वतः ला कमी लेखतात ही गोष्ट भयाण आहे , मागासलेले मुद्दाम वापरला आहे कारण बौद्ध आजही गावकुसाबाहेर असणाऱ्या बौद्ध वाड्यात राहण्याचे समाधान मानून चौकटीत राहण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
जय भीम ,
वरील लेखामध्ये मागासवर्गीय असा उल्लेख केला गेला आहे, तो फक्त बौध्द समाजातील लोकानसाठी नाही अश्या मागासवर्गीय समाजासाठी जो ओबीसी, एसटी, एससी ईत्यादी मध्ये येतो, आणि स्वतःला हिंदू म्हणवून घेतो.
Talk about those who went into cities and got into good position. Your comment is biased towards one side, Mr Satpute.
लेख माहोल लिहिला मॅडम तुम्ही. पण शूद्र हा सवर्ण आहे व सोबतच हिंदु धर्माचा भाग आहे. म्हणूनच त्यांच शोषण त्या क्रिमी लेयर अट पर्यंत मर्यादित आहे. एकदा 8 लाख वार्षिक उत्पन्न आलं, ते गेले जनरल. आणि जनरल कॅटेगरी म्हणजेच सवर्ण (आणखी हे सुद्धा की त्यांना अट्रोसिटी कवच नाही). अस्पृश्य हा अवर्ण आहे व हिंदु धर्माचा भाग नाही. भारतात ज्यांच्यावर अन्याय होतो ते अस्पृश्य आहेत. बाबासाहेबांनी अस्पृश्य लोकांना गाव सोडून शहरात यायला सांगितलं, जे जे आले ते ते शिकले-सुधरले. फक्त अनुसूचित घटकांचा (मातंग, चर्मकार, बौद्ध इ.) विचार केला गेला पाहिजे. बहुजन शब्द फक्त राजकारण पुरतं जवळ केला पाहिजे.
Ya Aruna wrote nicely but not so meaningful.Just posting my view on that.
“Caste is a state of mind. It is a disease of mind. The teachings of the Hindu religion are the root cause of this disease. We practice casteism and we observe Untouchability because we are enjoined to do so by the Hindu religion. A bitter thing cannot be made sweet. The taste of anything can be changed. But poison cannot be changed into nectar”