“दलित” ही तुमची ओळख कशी असू शकते?

स्वप्नील गंगावणे

शब्द ‘दलित’

आंबेडकर चळवळ राहीली बाजूला आणि त्या चळवळी मध्ये कोण खरं कोण खोट हेच जास्त प्रमाणात दिसल्या जातंय. सोशल मीडिया आणि आता खऱ्या आयुष्यात सुद्धा हा मुद्दा खुप चर्चेचा विषय आहे, आपण दलित शब्द वापरला पाहिजे किंवा नाही. आणि वापरला तर का वापरावा ? आणि नाही वापरावा तर का नाही वापरावा ? हे दोन प्रश्न अगोदर कळायला हवे.

दलित शब्दाचा अर्थ सांगून त्याला वापरायचं ज्ञान इथे लोक सांगताना दिसतात. दलित म्हणजे तुटलेला, इथल्या समाज व्यवस्थेत शोषणाचा शिकार झालेला, इंग्लिश मध्ये ब्रोकन. इथपर्यंत समजवल्या जातं की बाबासाहेबांनी सुद्धा दलित शब्द वापरलेला आहे, दलित शब्द वापरल्या जावा म्हणून हे उदाहरणे देणं जरा पण पटण्यासारखे नाही.

दलित म्हणजे तुम्ही ब्रोकन आणि त्या ब्रोकननेस ची व्याख्या करतो दलित शब्द, आणि ती व्याख्या तुमच्यावर थोपणारे आहेत प्रस्थापित लोकं ज्यांनी तुम्हाला घोषित करून टाकलेलं आहे की तुम्ही खालच्या जातीचे, तुम्ही दलित, तुम्ही अछूत, तुम्ही मागासलेले.. हे सगळं थोपलय इथल्या प्रस्थापित वर्गाने.. एकाप्रकारे ही ओळख तुम्हाला लादण्यात आली आहे, प्रस्थापित वर्गा द्वारे.

ती ओळख लादण्यात आली तो भाग वेगळा. आणि आता त्या ओळखेला अभिमानाने काही लोकं वापरताना दिसत आहेत. जो अत्याचार तुमच्यावर झाला गुलामगिरी पेक्षा भयानक. तो अत्याचार करणारे तेच लोकं आहेत ज्यांनी तुम्हाला ही ओळख दिली. दलित हा शब्द क्रांती च्या अर्थाने माझ्या मते दलित पँथर पासून पुढे आला. दलित पँथर ही संघटना इतकी प्रभावी होती की त्या संघटनेकडून दलित या शब्दाला जास्त पब्लिसिटी मिळाली. असं मला वाटतं.

आणि ज्या संघटनेचे संस्थापक खुद राजा भाऊ ढाले जेव्हा दलित शब्दाचा विरोध करतात ते काहितरी अभ्यास करूनच करत असतील. आणि आताचं नविन नविन ज्ञान प्राप्त झालेलं यंग ब्लड दलित शब्द का वापरावा हे ज्ञान पाजळत असतात, राजा भाऊ ढाले यांनी दलित या शब्दाला विरोध केला आहे आणि त्या काळी आम्ही का दलित पँथर हा डोमेन वापरला आम्हालाच ठावूक नाही. त्याकाळी अन्याय अत्याचार इतका होता की तत्पर एखाद्या संघटनेची गरज होती, आणि जेव्हा दलित पँथर हे नाव संघटनेला देण्यात आलं तेव्हा त्या शब्दाचा इतका अभ्यासही कोणी केला नव्हता. दलित पँथर ही संघटना कोणत्याही आगाऊ सूचना वैगरे देऊन स्थापित नाही झालेली. ती एका रात्रीतून जणू घटना घडते त्या प्रकारे ही दलित पँथर संघटना स्थापन झालेली आहे.

आता कोणी म्हणेल की ब्लॅक पँथर सुद्धा नाव आहे आणि त्यांनी सुद्धा ब्लॅक हा शब्द वापरला आहे. ते ब्लॅक आहेत म्हणून ! खरं आहे आणि ते जन्मतः ब्लॅक आहेत म्हणून ते ब्लॅक आहेत, ती त्यांची ओळख आहे.. ते स्वतः ब्लॅक आहेत. त्यांना कोणी ब्लॅक बनवलं नाही. आणि म्हणून ते स्वताची ओळख जगाला दाखवण्यासाठी ब्लॅक हा शब्द शंभर टक्के वापरू शकता.

पण जेव्हा मुद्दा येतो दलित या शब्दा बद्दल. तर आपण जन्मतः दलित असतो का ? नैसर्गिक द्रुष्ट्या आपण दलित आहोत का ? का आपल्या अंगावर असं काही निशाण आहे ज्यामुळे आपण दलित आहोत असं दिसून येतं ?

दलित पँथर या संघटनेत ‘दलित’ हा शब्द जर वापरल्या गेला नसता तर आज हा शब्द एवढा प्रचलित ही नसता.

दलित तुम्हाला बनवल्या गेलंय. दलित म्हणजेच ब्रोकन हे जन्मतः कोणीच नसतं, आपण माणूस म्हणून जन्माला आलोय तर का स्वतःला दलित म्हणवून तुच्छ लेखायचं ? हा मान्य आहे आपल्यावर अन्याय होतात आणि जाती मुळेच होतात. पण तुम्ही जो पर्यंत स्वतः ला दलित (ब्रोकन) पिछडे, अच्छूत, वैगरे असे शब्द वापरायला बंद नाही करणार तोपर्यंत हे असंच राहणार. तुम्ही अभिमानाने स्वःताला तुटलेले, अच्छूत ब्ला ब्ला सांगताहेत तर कसं चालायचं ?

तुम्ही खुद स्वतःला दलित म्हणवून घेण्यात लाजत नाही, तर समोरचा तुम्हाला दलित म्हणेलच ! उलटं तुम्ही इथल्या प्रस्थापितांना सांगत फिरत आहात की मला दलित म्हणा. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःला दलित म्हणत राहशाल तो पर्यंत इथल्या प्रस्थापित वर्गाला हिम्मत मिळत जाईल तुम्हाला दलित म्हणण्याची. आणि खरा अन्याय तुमच्या वरती इथूनच सुरू होतो.

दलित ही ओळख तुमची कशी असू शकते बरं ? तुमचं माणूसपण क्लेम करणं दुरच राहिलं आणि स्वतःला दलित म्हणवून घेण्यातच तुम्ही समाधानी आहात. एका बाजूला म्हणायचं आम्ही माणसं आहोत जसे सगळे आहेत. आणि एका बाजूला म्हणायचं आम्ही दलित आहोत म्हणजे (दबलेले, खचलेले,ब्रोकन )

दलित म्हणून घेण्यात तुम्ही स्वतःला माणूसपणातून वेगळे करता आहात.

राहीला प्रश्न स्वतंत्र मताचा तर तो तुम्हाला आहे तुम्ही स्वतःला जे म्हणवून घ्यायचं ते घ्या, पण तुमच्या आयडेंटिटी मध्ये पुर्ण समाजाला शामील करून घेऊ नका. समोर जायचं सोडून आपण परत मागं जायचं कार्य करत आहोत स्वतःला दलित म्हणून. हे जे प्रस्थापित लोकं म्हणतात ना की तुम्ही (सो कॉल्ड दलित) नाही सुधरत हा याचाच परिणाम आहे, तुम्ही स्वतःला माणूस समजायला तयार नाहीत तर अत्याचार करणारा का तुम्हाला माणूस समजेल ?

ब्राम्हण स्वतःला ब्राम्हण म्हणून उच्च सांगतो, देव सांगतो. आणि आपला समाज सुद्धा तेच काम करत आहे, स्वतःला दलित सांगून ब्रोकन सांगतोय, दबलेला सांगतोय.. नो डाउट आपण इथल्या व्यवस्थेत दबलेलो आहोत. पण आपण जन्मतः दबलेलो नाही, आपल्याला दाबण्यात आलं आहे, आपण स्वतःला इथे दाबून नाही घेतलेलं.. तर प्रस्थापितांनी आपल्याला दाबलय.

जो पर्यंत दलित शब्द राहील.. तोपर्यंत इथला प्रस्थापित समाज माज दाखवत जाईल.. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला साधारण माणसा सारखं माणूसपण क्लेम कराल तेव्हा तुम्हाला विरोध करण्यात येईल. म्हणजे तुम्ही दलित तो पर्यंत ब्राम्हण खुश.. आणि दलित बोलण्यात ब्राम्हण तुम्हाला फुल सपोर्ट करेल.. पण जेव्हा तुम्ही माणूसपण क्लेम कराल पुर्ण हक्क मागाल तेव्हा मात्र ब्राम्हण वाकडं तोंड करेल.

बाबासाहेबांचे विचार खाली एकदा वाचा

IT IS YOUR CLAIM TO EQUALITY WHICH HURTS THEM. THEY WANT TO MAINTAIN THE STATUS QUO. IF YOU CONTINUE TO ACCEPT YOUR LOWLY STATUS UNGRUDGINGLY, CONTINUE TO REMAIN DIRTY, FILTHY, BACKWARD, IGNORANT, POOR AND DISUNITED,  THEY WILL ALLOW YOU TO LIVE IN PEACE. THE MOMENT YOU START TO RAISE YOUR LEVEL, THE CONFLICT STARTS.

स्वप्नील गंगावणे

लेखक औरंगाबाद येथील रहिवासी असून वित्तीय सेवा संस्थेमध्ये टीम लीडर आहेत.

5 Comments

  1. सुंदर लेख, दलित हा शब्द का वापरावा यावर बोलायलाच हव , बाबासाहेबांनी माणसात आणला तर माणूस,प्रबुद्ध ,बुद्ध आंबेडकरी ओळख कधीही योग्यच la.

  2. Dalit word was began to political use, it is to highlight the history of those who had been historically oppressed or denied for justice of equality.
    it is clearly Conspiracy and conversion to feel mentally untouchable in so called civilise world.

  3. दलित, अस्पृश्य, शूद्र, अतिशूद्र अशाप्रकारची विशेषण ब्राम्हण वर्गाकडून आपल्याला देण्यात आलीत. भारतात जे लोक समाज प्रबोधन करत आहेत त्यांनी केवळ प्रचाराचा भाग म्हणून की, इतिहासात आम्हाला अशाप्रकारे संबोधलं जात होत ह्या अर्थाने वरील शब्दांचा वापर केला वा करत असेल तर त्यात गैर काय आहे?
    राजा ढाले यांनी ‘दलित’ शब्दाचा विरोध केल्याचं मध्यंतरी वाचलं परंतु दलित शब्दाचा अर्थ काय? हा‌शब्द आपण का म्हणून वापरणे योग्य नाही? अशाप्रकारची कोणतीही माहीती मा. ढाले यांनी दिलेली नाही.
    बामसेफ आणि अश्या काही संघटना जे स्वत:ची ‘मुळनिवासी’ अशी ओळख सांगतात त्यांनी ह्या शब्दाचा वापर टाळला आहे‌. त्यांच्यामतज ‘दलित’ हा शब्द अल्पसंख्यांक आहे आणि अल्पसंख्याक शब्दांचा वापर करून आपण बहुसंख्य होऊ‌ शकत नाही. त्यांची व्याख्या ‌बरोबर देखील असेल. परंतु त्यांना हा शब्द किती चुकीचा आहे अद्याप पटवून देता आलेले नाही. मी ह्या‌ मताचा आहे की, आपण संवैधानिक देशात वावरत आहोत. आपण अशा प्रकारची ओळख जमेल तेवढ्या लवकर सोडून द्यायला हवी. पण केवळ दलित नाही तर शूद्र,अतिशूद्र,अस्पृश्य, वंचित इत्यादी.

  4. RTI चेच बऱ्यापैकी लोकं ह्या गोष्टीला बळी पडले आहेत, खास करून महाराष्ट्र/विदर्भा बाहेरचे.असो.

Leave a Reply

Your email address will not be published.


*