वैष्णवी सुनील बगाडे
जातीच्या नावाखाली मुडदे पाडायचे ,
आणि त्याला ऑनर किलिंगच नाव द्यायच!
खरचं का तुमच्या जातीचा एवढा गर्व आहे तुम्हाला?
नाही दिसत का तुम्हाला तुमच्या मुलाबाळांच प्रेम!
जाती, धर्मापुढे नाही दिसत का तुम्हाला त्यांच सुख?
त्यात त्यांचा काय गुन्हा,
तुम्हीच तर केले त्यांना तुमच्या जातीच चिन्ह !
प्रेम करणाऱ्यांना कुठे माहीत असती जात…
तुम्हीच लावता त्यांच्या पाठी जातीचा घाट !
अजून किती कराल खून जातीच्या नावाखाली…
पण प्रेम करणारे कधीही घाबरणार नाहीत…
लक्षात ठेवा तुम्ही कितीही माजवा जातीचा अहंकार…
पण तुमच्यापेक्षा वरच्या जातीतला कोणीतरी घेईल तुमच्या पोराचा बळी!
तेव्हा कळेल जात हा खेळ फक्त चढाओढीचा…
पण त्यात तुम्ही बळी दिला आपल्या निष्पाप पोरा- पोरींचा
जात हा खेळ फक्त चढाओढीचा आणि मालकी गाजवण्याचा !
वैष्णवी सुनील बगाडे
लेखिका पुणे येथील रहिवासी असून त्यांचं शिक्षण MA (Medieval History), JNU असे आहे.

Extraordinary writing