आपली लढाई फक्त पक्षापर्यंत मर्यादित नाही, आपली लढाई ही इथल्या ब्राह्मणवादा विरूद्ध आहे

स्वप्नील गंगावणे

आज देशाची परिस्थिती हलाखीची झाली आहे त्यामुळे सगळेच भारत सरकार ला शिव्या घालताना दिसून येत आहे. मोदी सरकारने देश विकला वैगरे, प्रायव्हेटायझेशन, वाढती महागाई, बेरोजगारी म्हणजे अशी प्रत्येक गोष्ट जी भारताच्या भविष्य उभारणीत अडथळा येते ती या मोदी सरकारने नेस्तनाबूत करून ठेवली आहे यात शंका नाही, आणि या मुळे भाजपा उर्वरित पुर्ण देशच या सरकारला शिव्या घालताना दिसून येत आहे. गोव्हरमेंट क्रिटीसायझींग हे व्हायलाच हवं आणि त्यात मोदी सारखा माणूस प्रधानमंत्री असेल, भाजपा सारखी हिंदूत्ववादी सरकार देशाचा कारभार चालवत असेल तर आपण त्यांचे कॉलर पकडून प्रश्न विचारायलाच हवेत.

या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वात जास्त ॲक्टीव्ह तरूण मंडळी दिसून येत आहे आणि ही कौतुकास्पद बाब आहे, यापूर्वी कधीही तरूणांना राजकारणात एवढं सहभागी झालेलं बघितल्या गेलेलं नाही. याचं कारण काय आपण पुढे बघूच, पण सर्वात अगोदर हा लेख ज्यांच्या साठी लिहीला आहे त्यांच्या बद्दल विचार करू.

हा लेख लिहीण्याचं कारण आहे तो आंबेडकरवादी जो मोदी सरकारला ट्रोल करता करता कधी कॉंग्रेसच्या कुशीत जाऊन बसला त्याला कळालं पण नाही. कॉंग्रेसच नाही तर तो इथल्या चक्क लेफ्टीस्ट सवर्णांच्याच कुशीत जाऊन बसला आहे. त्याला प्रत्येक वेळी मोदी ला ट्रोल करताना लेफ्ट सवर्णाची गरज पडते. त्यामध्ये मग कॉंग्रेस, आम आदमी पार्टी, ममता दिदी, कन्हैया कुमार या सर्व राजकारण्यांची), ट्रोलिंग साठी यांना गरज पडते कुणाल काम्रा, आकाश बॅनर्जी, ध्रुव राठी, स्वरा भास्कर, रिचा चढ्ढा या सर्व इंफ्ल्यूएंसर ची), न्युज साठी यांना गरज यांचा मोस्ट फेवरेट रविश कुमार, बरखा दत्त, निधी रजदान, या सर्व पत्रकारांची)

वरती जितके पण नाव मेन्शन केलेत ते सगळे सवर्ण आहेत आणि फक्त सवर्णच नाही तर जातियवादी सवर्ण आहेत ज्यांना प्रत्येक गोष्टीत प्रविलेज आहे, ज्यांनी कधी आयुष्यात जातिवादाचा सामना केलेला नाही, म्हणजे एका सो कॉल्ड उच्च समाजा कडे जी प्रत्येक गोष्टं राहते वर्चस्वाची ती या सगळ्यांकडे आहे.

सर्वात आधी हे समजून घ्या की वर्चस्व कोणत्या समाजाचं आहे. मोदी ला निवडून देण्यात सवर्णच होते आणि आता त्याला शिव्या घालणारे पण सवर्णच आहे, उदा; दोन सवर्ण सरकार चालवण्यासाठी पुढे आले आणि त्या दोन सवर्णांपैकी एक सवर्ण विजयी झाला. यात बहुजन समाज हा फक्त वोट बँक आहे आणि ऑडीयंस. त्या पलिकडे काहीच त्यांची किंमत नाही. सत्ता कोणत्याही पक्षांची राहू द्या पण वर्चस्व एकाच समाजाचं राहीलेलं आहे आणि कायम आहे.

ममता दिदी विजयी झाली आणि तिच्या साठी आनंद साजरा करणारे काही बहुजन समाजातले लोकं दिसलें त्यामुळे मी व्हाट्सअप ला एक स्टेटस ठेवलं की एक ब्राम्हण बाई विजयी झाली आणि तिसऱ्या ठिकाणी बहुजन तरूण का इतके आनंदी दिसून येत आहे, त्या माझ्या स्टेटस ला तिन रिप्लाय आहे जे स्वताला आंबेडकरवादी समजतात. १. अरे भाई तु मोदीला सपोर्ट करतो का ? २. मऊ वाट परवडते असा काहीतरी एक टोमणा होता. ३. एकाचा रिप्लाय असा आला की आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून आपल्याला ममता दिदी चं महत्त्व कळणार नाही म्हणे.

आणि हे तिन्ही मेसेज करणारे स्वतःला आंबेडकरवादी म्हणवून घेतात. महत्वाचं म्हणजे यांनी या विषयाला धरून माझ्या सोबत अरग्युमेंट पण केली तेव्हा खरंच आश्चर्य वाटलं की आपल्या समाजात अजूनही बऱ्याच लोकांचं बेसिक सुद्धा क्लियर नाही. यांच्या सारखें भरपूर लोकं भरलेले असतील बहुजन समाजा मध्ये. त्यामुळे हा लेख लिहीतो आहे, माझा हा लेख एकाही अशा आंबेडकरवाद्या पर्यंत पोहोचला तर खूप झालं

आपली लढाई फक्त पक्षा पर्यंत मर्यादित नाही, आपली लढाई ही इथल्या ब्राम्हणवादा विरूद्ध आहे, इथल्या ब्राह्मण-सवर्ण विरूद्ध आहे, अप्पर कास्ट माईंडसेट विरूद्ध आहे. आणि हा अप्पर कास्ट इथल्या दोन्ही पक्षात आहे भाजप हा पक्ष अप्पर कास्ट लोकांचा आणि कॉंग्रेस, आप, हे पक्ष सुद्धा अप्पर कास्ट लोकच चालवतात. एका अप्पर कास्ट ला हरवण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या अप्पर कास्ट ची गरज पडते आहे.

भाजपा सरकारने ओपनली त्याची आयडॉलॉजी चालवली, ओपनली इथे जातिवाद चालवला म्हणून तुम्हाला दिसून येतंय आणि त्याचा तुम्ही विरोध करत आहात, पण हीच सगळी क्रुती कॉंग्रेस सुद्धा करते पण ती ओपनली नाही करत आणि म्हणून तुम्हाला ती चांगली वाटते.

बायनरी पॉलिटिक्स इतकं बेक्कार आहे ना यातून लवकर लोकं बाहेर नाही निघणार.

मला एक महाज्ञानी समजावून सांगत होता की भाई सध्या आपल्याला देशाचा विचार करायचा आहे आपल्याला कसंही करून मोदी सरकारला खाली पाडायचं आहे. मी त्याला साधे प्रश्न विचारले की दादा तु जे बोलतोय ते खरं आहे पण समज तू देशाच्या हितासाठी लढतो आहे पण तुला इथे माणूस म्हणूनच गणल्या जात नाहीये तर मग काय करायचं ? तुझा फक्त इथे मतदाना पुरताच वापर केल्या जात आहे मग काय करायचं ? भाजपा साठीही तु खालच्या जातिचा दलित आणि कॉंग्रेस साठीही खालच्या जातीचा दलित, दोन्ही पक्ष तुला खालच्या जातिचा म्हणतात, तुझ्या समाजावर अत्याचार करतात, तर मग कोणत्या पक्षाला धरून तु देशाच्या हितासाठी लढतो आहे ?

यांना समजून येत नाही आहे की ते घुमून फिरून एका अप्पर कास्ट आयडॉलॉजीलाच समर्थन करत आहेत. एवढंच यांचं देशाच्या हितासाठी प्रेम ऊतू चाललं तर आंबेडकरवादी विचारधारेच्या पक्षाला समर्थन द्यायला यांना काय होतं ? इतका मोठा पक्ष आहे आपला बहुजन समाज पार्टी त्या पक्षा बद्दल बोलायला यांना लाज वाटते का ? भारतातली पहिली बहुजन समाजातली महिला जी मुख्यमंत्री बनली बहन मायावती तिला सपोर्ट करताना कोणीच नाही दिसत ! एकदा बहुजन समाज पार्टीचा इतिहास वाचा तुमची कॉंग्रेस, आम आदमी पार्टी, ममता दिदी सगळे चिल्लर आहेत बसपा समोर.

आपल्या समाजात इतके बुद्धिवादी लोकं असून यांना नेहमी अप्पर कास्ट लोकांची का गरज पडते समजत नाही ! तुम्ही ज्या ज्या लेफ्टिस्ट लोकांना फोलो करतात त्यांच्या पेक्षा कित्येक पटीने बुद्धिवादी लोकं बहुजन समाजात आहेत. तुम्हाला कन्हैया कुमार आवडतो मला चंद्रशेखर रावण. तुम्हाला रविश कुमार आवडतो मला शंभु कुमार, दिलीप मंडल, सुमित चौहान आंबेडकर चळवळ घेऊन चालवणारे चॅनल्स चे पत्रकार आवडतात. तुम्हाला ममता दिदी आवडते मला बहन मायावती आवडते, जी दबलेल्या समाजातून वरती येते, अशा एका समाजातून ज्यावर नेहमी अन्याय झाला आहे आणि त्या समाजातून वरती येऊन मुख्यमंत्री बनते अशी बहन मायावती मला आवडते.

असे कित्येक उदाहरणे मी देऊ शकतो आणि हे फक्त थोडे फार नाव मेन्शन केले आहेत असे हजारो बहुजन समाजात लोकं आहेत. पण त्यांना आपलेच लोकं सपोर्ट करत नाही, यांना कॉंग्रेस, आप, ममता, कन्हैया, रविश कुमार, हे सगळे अप्पर कास्ट लोकच आवडतात. खुप सविस्तर लिहू वाटत आहे पण आता हाताचे अंगठे दुखत आहेत टाईप करुन नंतर परत कधी लिहिले याच विषयावर.

एक शेवटची गोष्ट;

बहुजन समाजात दोन प्रकारचे विरोध करणारे लोकं आहेत,

१) एक लेफ्टिस्ट ज्याला कॉंग्रेस, आम आदमी पार्टी अशा अप्पर कास्ट लोकांची गरज पडते गोव्हरमेंट क्रिटीसायझींग ला.

२) आणि एक रॅडीकल आंबेडकरवादी ज्याला कोणाचीही गरज पडत नाही, तो फक्त बहुजन समाजातल्या लोकांनाच समर्थन करतो आणि आंबेडकर चळवळीला नेहमी प्राधान्य देतो. तो फक्त बाबासाहेबांचे विचार सोबत घेऊनच गोव्हरमेंट ला क्रिटीसाईझ करतो.

आणि मी फक्त आंबेडकरवादी आहे.

स्वप्नील गंगावणे

लेखक औरंगाबाद येथील रहिवासी असून वित्तीय सेवा संस्थेमध्ये टीम लीडर आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*