निलेश कुमार
मास्तर जमलं तर माफ करा
माझ्या चड्डीला ठिगळ असच आसल
या व्यवस्थेने आमच्या नशिबाला
गरिबीच ठिगळ लावलय
मास्तर जमल तर माफ करा
माझी भाषा तुम्हाला
आर्वाच्य वाटत असल
आहो !
आत्ता कुठं आम्ही शिक्षणाच्या प्रवाहात
प्रवाहीत झालोत
त्यामुळं मास्तर जमलं तर माफ करा
वह्या पुस्तकाला नाहीच लावू शकत
कव्हर खाकी
घरच्या शेणाच्या सारवणानं
माझी धोपटीच होते
महिन्या भरात रंगीत
मास्तर जमलं तर माफ करा
स्वातंत्र्यदिनी नाहीच घालू शकत मी
नवा गणवेश
माझ्या बा’ला नाही मिळालं
अजून आर्थिक विवंचनेतून स्वातंत्र्य
स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर ही
त्यामुळं मास्तर जमलं तर माफ करा
निलेश कुमार
लेखक समाजशास्त्र विषयाचे अध्ययन तसेच अध्यापनाचे काम करतात.
अप्रतिम!अत्यंत मार्मिक लिखाण निलेशकुमार… भीमाच्या लेखणीतून सावित्रीने दिलेल्या सामर्थ्याचे प्रभावी दर्शन घडते.
तुझ्या शब्दात तुझ्यातला संघर्ष घावतो…🌱
अप्रतिम!अत्यंत मार्मिक लिखाण निलेशकुमार… भीमाच्या लेखणीतून सावित्रीने दिलेल्या सामर्थ्याचे प्रभावी दर्शन घडते.
“तुझ्या शब्दात तुझ्यातला संघर्ष घावतो…”🌱
खूप छान निलेश 👌
धन्यवाद ज्ञानेश्वर जी.
अत्यंत मार्मिक कविता आहे सर,मला गर्व वाटतोय तुमचा विद्यार्थी असल्याचा(salute to your writing)
मास्टर जमल तर माफ करा
आम्हाला आहे फक्त धरती मातेचा-निसर्गाचा-सत्याचा संग म्हणून लागेल हो मास्तर जरा येळ.
मास्तर दुसऱ्या बाबी समजायला कारण बाकी हाय लई येगळ-येगळ मास्तर तुमीचं सांगा आता मी काय करू!!!
सत्य-साधं-सरळ राहू की काय करू !!!
कविवर्य निलेशकुमार सत्य परिस्थितीवर लिखाण📖🖋️✨👏🏻
काय माहित स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे उलटली आहे पण एकीकडे अत्यंत श्रीमंती अन् एकीकडे अत्यंत गरिबी आपल्यास पहावयास मिळते…खेड्यातील अत्यंत हुशार मुलं असून देखील त्यांना शहरात शिकण्यासाठी जाता येत नाही किंवा त्याला सरकारी योजनांविषयी काहीच माहिती नसते, कारण आर्थिक गरिबी त्यातल्या त्यात आई वडील अशिक्षित असतात,या कारणांमुळे कितीतरी मुलांचं कार्यक्षेत्र हे खेड्यांपर्यंत च किव्हा फारच जमलं तर तालुक्याच्या ठिकाणापर्यंत मजल मारू शकतात ही मुलं, आणि नंतर तीच गरिबी तोच मागासलेपणा कायम सुरू असतो ….“कवींनी कविता आजच्या परिस्थितीला धरून लिहिलेली आहे आणि वास्तव परिस्थिती मांडली आहे…!”