अश्वघोष बोधिसागर
अंधाऱ्या खोलीत होती पाखरे बंदिस्त
संपूर्ण व्यवस्थेने केली कवाडे बंद
या मिट्ट काळोखात येती ना आशेची किरणं
असे अज्ञानतेने केले घात अनंत !!
लागता चाहूल प्रखर प्रकाशाची
विरोधकांनी केली दारे घट्ट बंद
तरी झगडून आले कवडस्यातूनी आशेची किरणं
सर्वास मग उमगले “अरेच्या! हा तर सूर्योदय !!”
पाखरांना झाली सत्याची जाणीव
उमजू लागली दृष्टी
घेऊन उंच भरारी अवकाशी
समजू लागली सृष्टि !!
ऊब घेउनी मायेची-ज्ञानाची
तेजोमय झाली पाखरे
बाळगुणी बळ निश्चयाचे
गाठू लागली शिखरे !!
पुढे प्रवासात येणार वादळे भ्रमाची
पुन्हा डोकावणार संकट विळख्याची
तरी न सोडता कास सत्य,प्रज्ञा,मैत्रीची
वाटचाल असावी सूर्याच्या दिशेने पाखरांची !!
अश्वघोष बोधिसागर
कवी/लेखक हे नागपूर येथे इन्वेस्टमेंट कन्सल्टंट आहेत आणि चळवळीतील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात ते कार्य करत आलेले आहेत.
- निळी पाखरे (धम्मचक्र प्रवर्तन दिन) - October 17, 2021
अप्रतिम !!!
अप्रतिम !!!