अण्णाभाऊ साठे कथा स्पर्धा – 2021

‘अण्णाभाऊ साठे कथा स्पर्धा – 2021’

कथा हा एक लोकप्रिय साहित्यप्रकार आहे. एका छोट्याशा कथेतून लेखक खूप काही सांगत असतो. मराठी साहित्य समृद्ध व्हायचं असेल तर लिहिणाऱ्यांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे.
भीमाच्या लेखण्या (राऊंड टेबल इंडिया) नवीन लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘अण्णाभाऊ साठे कथा स्पर्धा – 2021’ चे आयोजन करत आहे. तुम्ही स्वतः लिहिलेल्या कथा खाली दिलेल्या ईमेल वर किंवा व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवू शकता. कथा तुमच्या बोलीभाषेत लिहिलेली, कोणत्याही शैलीतील चालेल. विषयांचे बंधन नाही. अट एकच, कथा अप्रकाशित असावी आणि स्वतः लिहिलेली असावी.

ज्येष्ठ लेखक आणि अभ्यासकांकडून या कथा वाचल्या जातील. प्रथम तीन क्रमांक आणि उत्तेजनार्थ क्रमांकाच्या कथांना आकर्षक बक्षिसे दिली जातील. यामध्ये रोख रक्कम स्वरूपात व गिफ्ट स्वरूपात बक्षिसे असतील.

निवडक कथा राऊंड टेबल इंडिया मराठी वेबसाईटवर प्रकाशित केल्या जातील. निवडक सर्वोत्कृष्ट कथांचा कथासंग्रह प्रकाशित करण्यात येईल.

महत्त्वाच्या सूचना :
१) कथा word file मध्ये टाईप केलेली असावी. किंवा अशा हस्ताक्षरात कथा लिहून त्याचे फोटो किंवा फोटोची पीडीएफ फाईल पाठवावी.
२) शब्दमर्यादा : कमीत कमी १ पान जास्तीत जास्त ३ हजार शब्द
३) आपल्या कथा २० ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत पाठवू शकता.
४) कथा कुठे पाठवायची :
ईमेल : marathi.katha2021rti@gmail.com किंवा
WhatsApp : 8291416283

वेळोवेळीच्या सूचना माहितीसाठी भीमाच्या लेखण्या आणि अण्णाभाऊ साठे मराठी कथा स्पर्धा – 2021 या दोन फेसबुक पेजेसला फॉलो करा.

अधिक माहितीसाठी संपर्क : 8888569335

2 Comments

    • कथेला विषयाचं बंधन नाही.

Leave a Reply to Aditya Gaikwad Cancel reply

Your email address will not be published.


*