दिसून न येणारी जात…

सोनल शहाजी सावंत

2022 च्या अर्ध्यात आपण आलो आहोत. म्हणायला प्रगतीच्या वाटेवर आहोत, बाबासाहेबांनी शहरांकडे चला असा संदेश दिला आणि आपल्या समाजातल्या बर्‍याच कुटुंबांतील पहिली पिढी शहरात स्थिरावली. या कुटुंबांमधली उच्च शिक्षण घेणारी पहिली पिढी ‘कदाचित’ आमची असू शकते.

लॉक डाऊन च्या काळात जशी कोरोनाची लाट आली होती तशी अजून एक लाट आली होती ती म्हणजे लग्नांची! माझ्या संपर्कातल्या जवळ जवळ 80% मित्र मैत्रिणींची लग्न या दोन लाटांमध्ये झाली. त्यातून वाचलेले आम्ही या सगळ्या पेक्षा काहीतरी वेगळ करू म्हणुन बराच वेळ self analysis मध्ये घालवला. प्रेमात असलेल्या बर्‍याच मित्र मैत्रिणींची लग्न वेगळ्या कोणाशी तरी होताना बघून सुरुवातीला मला धक्का बसलेला. पण त्यांच्याशी बोलल्यावर मला एक गोष्ट सामायिक जाणवली ती म्हणजे ‘जात’.

‘जात’ मग ती कोणतीही असो ती आपल्या स्वप्नां पुढे आडवी येतेय ही गोष्ट तेव्हा जास्तच प्रकर्षाने जाणवली. अगदी माझ्या एका जवळच्या मैत्रिणींचा किस्सा सांगते, तिची जात ‘हिंदू महार’ आणि त्याची ‘हिंदू गवळी’! जाती व्यवस्थेच्या उतरंडीत त्याच्या जातीच नेमक स्थान मला माहीत नाही पण तिच्यापेक्षा तो नक्किच वरच्या जातीतला होता हे कळलं कारण, नातं तोडताना त्याचे शब्द होते, ‘तुझ्याशी लग्न केल तर आमच्या गावातले माझ्या कुटुंबाला वाळीत टाकतील.!’

अरेंज मॅरेज करायच नाही हे जेव्हा मी ठरवलं तेव्हा मी या डेट कल्चर ला अनुभवायला सुरुवात केली.
प्रेम करण हा हक्क प्रत्येक मनुष्याचा आहे. त्यात खरंतर जात, धर्म, लिंग या बायनरीज आल्या नाही पाहिजे.

पण Being a Girl from backword or Dalit community या विषयी मी अजून खोलात जायचा प्रयत्न केला

खरतर आमच्या पैकी कित्येक कुटुंबात अजून कोणी प्रेम विवाह हा केलाच नाहिये आणि केला तरी तो ‘जात-धर्म’ बघून मगच केलाय हे प्रकर्षाने मला जाणवायला लागल.

विद्यापीठात आणि ‘पेठेत’ अभ्यास करताना जेव्हा कुठे आपले विचार जुळत असलेले कपल्स मी पहायची, तेव्हा त्यात एक जण करिअर च्या शर्यतीत यशस्वी झाला तर बहुतांश वेळा या प्रेम प्रकरणाला तिलांजली वाहिलेली दिसायला लागली. ज्यात बर्‍याचदा ‘मुलीला दुखावल्याच’ मी पाहिल.
Reverse pattern मध्ये पेठेत पोस्ट निघालेली मुलगी आणि आणि तिला तिच्या संघर्षाच्या काळात साथ देणारा मुलगा हे फार विरळच. पुन्हा यात दलित किंवा मायनॉरिटी मधून येणारी मुलगी, त्यात ती Aspirant ते Post Holder असा प्रवास पुर्ण करणारी तर अजून विरळच!

या सगळ्यातून बाहेर पडून मग मी झगमगणारं, सर्रास TV आणि सोशल मीडिया वर दिसणारं Dating apps through काही वेगळा अनुभव मिळतोय काही वेगळा अनुभव मिळतोय का ही पहायच ठरवल.
सध्या जोमात सुरू असलेल्या Tinder, Bumble या apps वरची दुनिया अजून फारच वेगळी आहे!
इथे आढळणारी जनता जवळपास elite, so called सुसंस्कृत आणि मुख्यतः उच्च जातीय आहेत. डेट कल्चर मध्ये एक दोन भेटीत तुम्हाला व्यक्ती आवडली की मग तुम्ही तुमच नातं ठरवता.( पुन्हा यात कॅज्युअल, सिरियस, नॉट फॉर मॅरेज असे खूप प्रकार आहेत.)
परंतु इथे लोक त्याचसाठी आलेले असल्याने बोलताना सुरुवातीलाच तुमचे विचार जुळले की भेटायच की नाही हे ठरवुन पुढच्या गोष्टी आपल्या हातात असतात.

परंतु इथेही ब्राह्मण किंवा उच्च वर्णीय लोकच जास्त असल्याने ‘तुमच्यात-आमच्यात’ असेच संवाद जास्त व्हायला लागले. Westernization च्या नादाला लागून, स्वतःला मॉडर्न म्हणवून अजूनही जेव्हा ‘जातीतच’ सर्व अडकलेल दिसत, तेव्हा ‘हे असं का?’ हे सुद्धा कोणाला विचारावं वाटत नाही.

मी शहरात राहिल्यामुळे मला कदाचित तितकी मोकळीक मिळाली किंवा मी माझ्या अभ्यासाच्या/ विचारांच्या जोरावर मिळवली आहे असं म्हणता येईल. इथून जेव्हा मी पुन्हा गावाकडे जाते आणि माझ्या समवयस्क मैत्रिणींना पाहते तेव्हा, ज्यांचे आई-वडील चांगले कमावणारे आहेत केवळ त्याच उच्च शिक्षण घेत आहेत अस दिसत. परंतु उच्च शिक्षण घेऊनही जोडीदार निवडीचा हक्क त्यांना खरच आहे का? हा प्रश्न मला नेहमी पडतो.

माझ्या नात्यातल्या, आजूबाजूच्या गावाकडच्या म्हणजे अजूनही मुख्य प्रवाहात नसलेल्या मुलींना मी बघते तर त्यांची वयाच्या 15-16 व्या वर्षी किंवा फार फार तर 18-19 व्या वर्षीच लग्न 1-2 वर्षात मुलं होऊन पंचविशीच्या आत तर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून मोकळ्या झालेल्या दिसतात.
लग्न कधी करावं, मुलं कधी होऊ द्यावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरी 15-16 व्या वर्षी लग्न होणार्‍या मुलींच लग्नाच कारण ही एकतर गरीब परिस्थिती किंवा मग तीच तिच्या आवडीच्या मुलाशी असलेल प्रेम प्रकरण घरी कळलं आणि यातून मग जबरदस्ती लग्न लावुन दिल हेच आहे. यात कितीतरी टॅलेंटेड, Caliber असणार्‍या मुली, घरात रमून, आहे ती परिस्थिती स्विकारून, मन मारून? जगताना दिसतात. कोणाला विरोध करायची आणि केला तरी परिणामांना समोर जाण्याची तयारी फारच कमी मुलींमध्ये दिसते. अरेंज मॅरेज वाईट आहे किंवा ती पद्धत चुकीची आहे अस माझ बिलकुल म्हणणं नाही. परंतु करियर आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल साधताना आपला जोडीदार आपण निवडण्याचा तरी हक्क या सर्व मुली उपभोगतात का?

एकीकडे आजकाल लव मॅरेज खूप कॉमन आहे हो! आणि आम्ही जात पात मानत नाही अस म्हणणारे ‘प्रेमाचा’ वापर ‘मानसिक आणि शारीरिक गरजेपोटी’ करून ‘जात वेगळी आहे च कारण देऊन मोकळे होतात’ तेव्हा खरच, secularism ची टिमकी वाजवणाऱ्यांना ‘ही जात दिसत नाही का?’ असा प्रश्न विचारावा वाटतो.

सोनल शहाजी सावंत

लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे Gender, Culture and Development च्या विद्यार्थिनी आहेत. त्या स्त्री/मुलींच्या प्रश्नांबाबत लिहिणाऱ्या उदयोन्मुख लेखिका आहेत. तसेच त्यांचे कविता लेखन कुठल्याही ठराविक बंधन/पठडी /मर्यादे पलीकडे असण्याचा प्रयत्न असतो.

5 Comments

  1. “हिंदू महार” नवीन शब्द दिसत आहे. विदर्भात साडेबारा असते. पूना, बॉम्बे इकडं अलग चित्र दिसत आहे. खरं सांगू त विदर्भातले
    बौद्ध लोकं जास्त हुशार आहेत.

  2. How beautifully you have expressed the plight of youngsters and highlighted the stark reality of caste discrimination that happens even today.. Caste system is still prevalent in most parts of India. Falling in love is a wonderful feeling which cannot be planned or premeditated. The sad truth is this is never going to change. I was under the impression that people who are educated, well read and broad minded would never resort to this. However they were the ones who till date possesses the same mentality. I applaud you sonal for writing on such a delicate topic with finesse. It takes immense courage to do so. So proud of you.

  3. इकडे विदर्भ आणि मुंबई पुण्यातल्या काही संबंध नाही दादा! मूळ article च्या मुद्द्याकडे लक्ष दे. बाकी कास्ट सर्टिफिकेट वर जशी जात मांडली जाते तशीच मी ती इकडे अधोरेखित केलीय.

  4. बाबासाहेब जन्माला येऊन….
    बाबासाहेबानी आयुष्यभर संघर्ष करून…
    एवढा मोठा काळ लोटल्या नंतर सुद्धा खरंच जात आमचा पाठलाग सोडतच नाही..

Leave a Reply

Your email address will not be published.


*