“भुरा” चे लेखक शरद बाविस्कर यांचा बहुजन विद्यार्थ्यांना महत्वाचा संदेश!

राम वाडीभष्मे

सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा -शरद बाविस्कर

सरांशी जे.एन.यु भेटीतील चर्चा

आपल्या सारख्या सामान्य विद्यार्थी हे सांस्कृतिक व भौतिकवादामुळे मागे असतात. त्यासोबतच ही व्यवस्था सुद्धा त्यांना येथून बाहेर पडू देत नाही. त्यामुळे येथून बाहेर पडून स्वतःला या स्पर्धेच्या युगात सिद्ध करणे आवश्यक आहे. ह्याकरिता सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा, असा मोलाचा संदेश त्यांनी या चर्चेतून दिला.

‘भुरा आत्मकथन’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक तसेच जे.एन.यु. येथे ‘फ्रेंच तत्त्वज्ञानाचे’ प्राध्यापक शरद बाविस्कर सरांची एक छोटीशी भेट घेण्याचा आम्हाला योग मिळाला. या दरम्यान प्राध्यापक शरद बाविस्कर सरांनी ग्रामीण भागातील व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अडचणींना कसे सामोरे जावे लागतो, त्यांच्या संघर्ष कसा असतो. या विषयावर चर्चा करत असताना ते बोलले.

पुढे ते म्हणाले की, ग्रामीण भागातील आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी आजच्या घडीला शैक्षणिक क्षेत्र असो वा कोणतेही क्षेत्र असो या स्पर्धेच्या युगात काटकसरीने अभ्यास करून आत्मविश्वासाने नेहमी एक पाऊल समोर राहून जीवनातील प्रत्येक अडचणींचा सामना करावा. स्वतःमध्ये नेहमी कोणत्याही बाबीला समोर जाण्याचे आत्मविश्वास ठेवावे. नैराश्य येऊ देता कामा नाही.

पत्रकारिता हे क्षेत्र दृश्यात्मकतेला जास्त महत्त्व देत असते. त्यामध्ये आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला आपली क्षमता आणि आपला आत्मविश्वास दाखवावे लागते. त्यासाठी आपली बोलीभाषा आपला पेहराव हेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यासाठी आपली भाषाशैली स्पष्ट असावी आणि बोलीभाषेवरही प्रभुत्व असायला हवे. बोलीभाषेचा न्यूनगंड मनात नसावा. आपली पहली भाषा म्हणजे आपली बोलू भाषा मग ती, झाडीबोली, वऱ्हाडी किंवा खान्देशी, अहिराणी का असोना बोलण्यात कमी पणा येऊ देऊ नये. पण बोलीभाषे सोबतच आजच्या काळात एकतरी परदेशी भाषा अवगत असणे गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी भरपूर पुस्तक वाचायला पाहिजे तसेच दैनंदिन जीवनातील घडामोडींचा सराव करायला पाहिजे. असा संदेश त्यांनी या भेटीच्या माध्यमातून दिला.

ते म्हणाले, भुराच्या अभिप्रायाचं विश्लेषण केल्यावर लक्षात येते की, सगळ्यात जास्त अभिप्राय विदर्भातून आले असून त्याखालोखाल पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि सगळ्यात शेवटी खानदेश विभागातून आलेत. मी खानदेशचा आहे, असं नाही की खानदेशात पुस्तक पोहचलं नाही? परंतु आमच्याकडे वाचायला वेळ नसतो. अशी खंत ही यावेळी त्यांनी व्यक्त केली.
सोबतच खानदेशच्या विद्यार्थ्यांनीकडे पुस्तक पाहून वाटतं की, आता खानदेशमध्ये देखील वाचायला सुरुवात झाली आहे.

‘भुरा’ पुस्तकाला मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने आता पाचवी आवृत्ती सुद्धा संपण्यात आली आहे. येत्या ऑगस्ट महिन्या नंतर महाराष्ट्रात, विद्यार्थ्यांना शैक्षणीक मार्गदर्शन व ‘भुरा’ पुस्तकावर परिसंवाद कार्यक्रम होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

(भुरा हे पुस्तक घेण्यासाठी येथे क्लिक करावे.)

राम वाडीभष्मे

लेखक मुक्त पत्रकार असून सामाजिक कार्यकर्ते आहेत.

2 Comments

  1. बऱ्याच लोकांना वाटते की इदर्भात फक्त वऱ्हाडी बोलतात; आपण झाडीचाही उल्लेख केला. पश्चिम विदर्भात वऱ्हाडी आणि पूर्व विदर्भात/झाडीपट्टीत झाडीबोली. जय विदर्भ.

Leave a Reply

Your email address will not be published.


*