थेरीगाथेतील स्रियांचा मानवतावादी माणूसपणाचा शोध घेणारा स्त्रिवादी प्रवाह हा जास्त विद्रोही आहे.

शुभांगी जुमळे

प्राचीन काळात उत्तर वैदिक धर्म संस्कृतीनुसार मातृसत्ता पूर्णतः अस्त होऊन स्त्रिला अंत्यत खालच्या दर्जाची वागणूक तत्कालीन परिस्थितीत दिली जात होती.यज्ञ, त्याग,कर्मकांडे, व्रतवैकल्ये ह्यातं स्त्रियांना गुरफटलेल्या गेले होते. स्त्री ही भोगवस्तू म्हणून धर्माच्या नावाने आपले जीवन जगत होती. त्यानंतर अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत गौतम बुद्ध ह्यांनी मानवतावादी वैज्ञानिक दृष्टिकोन ह्यांवर आधारीत वैचारिक विचारसरणी असलेला बौध्द धर्माची स्थापना केली.
बौद्ध धम्मात भिक्षुणीच्या संघाची स्थापना करण्यामागे महाप्रजापती गौतमी ह्यांचा फार मोठा वाटा होता. महाप्रजापती गौतमी आपल्या सोबत पाचशे महिलांना घेऊन भिक्षुणी होण्याच्या निर्धाराने तथागत गौतम बुद्ध यांच्या कडे आली. महाप्रजापती गौतमी यांचा निर्धार बघून तथागत गौतम बुद्ध ह्यांनी स्रियांना बौद्ध संघात प्रवेश दिला. बौद्ध धम्मात कुठलाही भेद न ठेवता स्त्रि पुरूषांना समान वागणूक दिली जात होती. तथागत गौतम बुद्ध ह्यांनी स्त्रियांना संघात दिलेला प्रवेश उमेदवाराला काही प्रश्न विचारून त्यांचे व्यवस्थित उत्तर मिळाल्यावर त्यांना मग प्रवेश संघात दिला जात होता.

बौद्ध धम्मात उपासक उपासिका हा कुठल्याही प्रकारे भेदभाव न करता समाजातील तळागाळातील प्रत्येक व्यक्ती ला प्रत्येक महिलेला त्याच्या इच्छित मनाप्रमाणे प्रवेश केल्यानंतर स्रियांच्या सर्वोच्च ज्ञान मिळवण्यासाठी म्हणजे अर्हतपद करणाचा मार्ग इथून मोकळा झाला. स्रिला माणूस म्हणून जगण्याचा सर्वप्रथम अधिकार दिला .भिक्षुणी संघाची स्थापना करण्यात आली. भिक्षुणी संघाची स्थापना हे थेरीगाथेतील तळ (पाया) आहे. बौद्ध कालीन थेरीगाथा पाली भाषेत असुनही बौध्द कालीन स्रियांनी लिहीलेला पहिला ग्रंथ आहे.

थेरीगाथेत सोळा भागात त्रेहात्तर प्रकरण आहे. त्रेहात्तर प्रकरणात पाचशे बावीस गाथा, कवने आहे. भिक्षुणी झाल्यानंतर थेरी पटचरितेचे मार्गदर्शन केले की या सर्व भिक्षुणीना पटाचारा असा एक गट करून एकाच प्रकरणात समाविष्ट केले. थेरीगाथा भारतीय इतिहासात बौध्द कालीन महिलांना स्रियांचे भिक्षुणी होण्याआधी गृहस्थी जीवन त्यातील परिणाम आणि अनुभव भिक्षुणी होण्याआधी गृहस्थी जीवन थेरीगाथेत विविध प्रांत, वर्ण, आर्थिक परिस्थिती सामाजिक स्तर स्रियांच्या गाथेतून दुखः मुक्ती ते स्त्रि जीवनाचे सर्दभं ते स्थान काय होते ते दिसून येते. महाप्रजापती गौतमी आपल्या सोबत यशोधरा ह्यांना पहिल्या भिक्षुणी संघात सोबत होत्या.

थेरीगाथेतील यशोधराची भद्रा कात्यायना नावाने दिलेली ओळख मी पणा पासून मुक्ती थेरी यशोधरा ते भद्रा कात्यायनी हा तिचा प्रवास थक्क करणारा असाच होता.दुसरीकडे उदाहरण द्यायचे झाले तर सौंदर्यवती गणिका आम्रपाली तिलाही इतर सगळ्या महिलांसारखा संघात प्रवेश केल्यानंतर सर्वात सुंदर स्त्रि म्हणून स्रियांच्या सौदर्य ते गाथेत सौंदयवती शरीर वृद्ध काळात कसे होते ह्यांचे वर्णन आम्रपाली आपल्या गाथेतून सांगते.
सौदर्यप्राप्त शरीराचा गर्व स्त्री बाळगते.ते शरीर म्हातरवयात रोगार्थी माहेरघर म्हातारपणात कसे बनते याच यथार्थ वर्णन तिच्या गाथेतून सांगते केवळ उच्च कुलीन स्त्री नाही तर समाजातील सर्व स्तरातील महिलांना कुठल्याही प्रकारे भेदभाव न करता संघात प्रवेश दिला जात होता.बौध्द संघात पुष्पदासी, परक्रयिता, रामदासी, क्रातरिका गाणिकाना बौद्ध धम्मात प्रवेश दिल्यानंतर समाजातील सगळ्या व्यक्तीला सन्मानाने वागविले जात होते.संघात स्रियांच्या बरोबरीत पुरूषांची संख्या होती.थेरीगाथेतून दिसणारी स्त्री तिचा मुक्ती चा स्रिवाद भिक्षुणी होण्यापूर्वीच जीवन जगत होती – कष्टमय परिस्थिती यातनादायी अपमानास्पद समाजातील लोकांची वागणूक – ते भिक्षुणी संघात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यात झालेला अमुलाग्र बदल अनुभूती स्रिला मानवतावादी जगण्याचा अधिकार दिला समानतेचा अर्थ बौध्द कालीन महिलांना संघात हा तेव्हा दिल्या गेला होता.

आय बी होर्नर या पाश्चिमात्य देशातील संशोधकांने आपल्या Women under primitive Buddhism या संशोधन पर ग्रंथात लिहले की, “During the Buddhist period there was a change women came to enjoy more equality and greater respect and authority than ever hitherto accorded to them“.
स्रियांचा दर्जा जो वैदिक काळात लयास गेला होता, तो सुधारणा करण्यात बौद्ध तत्वज्ञानाचा फार मोठा वाटा आहे. भारतीय इतिहासात एकूणच मानवता, सहिष्णुता आणि मानव जातीय आदर यामुळे स्त्रीचा दर्जा उंचावला होता. तर दुसरीकडे बौद्ध काळ हा स्त्री स्वातंत्र्याचा सुर्वणकाळ होता.तथागत गौतम बुद्ध ह्यांनी स्रियांच्या मानवतावादी सामाजिक ते धार्मिक संपूर्ण स्वातंत्र्य दिले होते.
Chatsumarn Shatsena यांनी A Study of Early Buddhist Institute of Bhikkunis Based on the Patimokkha या ग्रंथात म्हटलं आहे,
Women in the Buddhistic period enjoyed more freedom and priviledge comparatively to any other time both socially and spiritually“.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “The rise and fall of the Hindu women and who was responsible for it,’, या लेखात स्पष्ट पणे नमूद केले को बौध्द कालीन स्रियांचा विकास होऊन आत्मविश्वास आत्मसन्मानासाठी समानता स्रियांचा उन्नतीचा काळ होता.म्हणून स्रिवादी प्रवाहापेक्षा थेरीगाथेतील स्रियांचा मानवतावादी माणूसपणाचा शोध घेणारा स्त्री सक्षमीकरण स्रिवाद प्रवाह जास्त विद्रोही होता.अश्या प्रकारे आजच्या फेमिनीझम ते स्त्रिवादी संकल्पनेच्या आधीचा बौध्द कालीन स्रियांचा स्रीवादी दृष्टिकोन ते त्यांचे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार, थेरीगाथेतील स्रियांचे आत्मभान सन्मान जगलेल्या स्रियांनी थेरीगाथेत लिहले आहे. तो खरा त्या काळातील स्रिवादी माणूसपणाचा शोध घेणारा स्त्रीसक्षमीकरण ते सन्मानचा विद्रोही साहित्यिक थेरीगाथेतील प्रवाह होता.

शुभांगी जुमळे ह्या शिक्षिका असून आंबेडकरी, बौद्ध साहित्याच्या अभ्यासक संशोधक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*