योगेश भागवतकर
समाजचित्र उभे करताना “ तंगलान ” चित्रपट दिग्दर्शक…पा रंजीतने भारतीय समाजाचे , त्यातील जातव्यवस्थेचे किती सखोल अध्ययन करून ठेवलेय याची “तंगलान” चित्रपट पाहतांना प्रचिती येते. तंगलांमध्ये एक विशेष प्रसंग दाखवलां आहे. ज्यामध्ये अस्पृश्यता लादल्या गेलेल्यां गावातील एक व्यक्ती सर्व मुलांना एकत्र जमवून त्यानेच उभारलेल्या एका छोट्याशा देवालयात बोलावतो, देवाचे नाव घ्यायला सांगतो, गोमांस सोडायला सांगतो, जानवे घालायला देतो.

हा व्यक्ती विशेष आहे कारण याला आपली सामाजिक पत, जातीचा दर्जा, व्यवस्थेतील स्थान याच भान आहे आणि सोबतच तथाकथित उच्च जातीयांच्या समाज सांस्कृतिक स्थानाचं, दर्जाच, त्यांना असलेल्या विशेष अधिकारांच आकर्षणही आहे. या आकर्षणाने त्याला तथाकथित उच्चतेचे जे ब्राह्मणी मापदंड आहेत, ज्या ब्राह्मणी नैतिकतेच्या, पवित्रापवित्रतेच्या धारणा आहेत त्या मान्य करण्यास बाध्य केलेले आहे. सामाजिक दर्जा उंचावण्याच्या त्याच्या या लालसेने त्याच्या विवेकबुद्धीचां घात मात्र केला आहे. कारण येथे योग्यायोग्य, चूक बरोबर, सत्यासत्य असा फरक न करता केवळ ब्राह्मणी क्रियाकल्पांना प्रमाण मानून त्यांचं आंधळं अनुकरण करण्याला तो महत्त्व देतोय. अशाने त्याची खालावलेली सामाजिक पत, जातीचा दर्जा उंचावेल तो सुद्धा ब्राह्मणी अनुकरण करून ब्राह्मण तत्सम मान-सन्मानाचा उच्च दर्जा प्राप्त करू शकेल असा त्याचा भाबडा स्वार्थीसमज असतो. त्यासाठी तो स्वतःबरोबर इतरांनाही तसं करण्यास प्रेरित करतो. वेळप्रसंगी प्रस्थापितांकडून त्याला त्यासाठी धुत्कारल्याही जातं तरीही तो बधत नाही. अपमानित होऊनही त्याचं त्या गोष्टींचं आकर्षण जात नाही. त्याच्या विवेक बुद्धीचा पूर्णतःऱ्हास झाल्याचं हे द्योतक आहे. असे व्यक्ती त्यात आणि तेथेच लीळबिळीत राहतात, अश्या मेंदूनमध्ये प्रस्थापितांच सर्व काही नाकारून बंड करण्याचं नवमूल्य निर्मितीच, नव व्यवस्थेच्या उभारणीच, पर्याय उभा करण्याचं असं काही सुचणे, चेतने, धगधगणे कठीण होऊन बसते. अनुकरणप्रिययतेतून हे स्वतःबरोबर आपल्या जात-जमातींचा सुद्धा घात करतात व परिवर्तनाच्या वाटेवरील एक मोठे अडकाठी बनून बसतात.
ब्राह्मणी नीतितत्वाला बळी पडून अशी अनुकरणप्रियता सर्वच शोषित जातींयांमध्ये, आणि त्यांच्यातील व्यक्तिविशेषशानं मध्ये आपल्याला आजही पाहायला मिळते विशेष म्हणजे आर्थिक उन्नती झाली कि याचं प्रमाण वाढते खास करून अनुसूचित जाती-जमाती, भटके विमुक्त व इतर वंचित जातींमध्येतर विशेषच कारण या धर्मसमाज व्यवस्थेने त्यांना मानसंमानाच्या जीवना पासून लांब ठेवले, त्यांची उत्पन्नाची साधने सुद्धा त्यांचं अवमूल्यन करणारी अशीच निश्चित करून ठेवली, तशा प्रकारचे सामाजिक नियम व बंधने लादले गेले परंतु “ फुले-आंबेडकरी ” चळवळीच्या अथक प्रयत्नाने आणि आता संविधानिक व्यवस्थेने त्यांना बरीच मोकळीक मिळाली असता त्यामुळे ते आता तो मानसन्मान मिळवण्यासाठी, रोजच्या दैनंदिन सार्वजनिक जीवनात बरोबरीची, सन्मानाची वागणूक मिळवण्यासाठी पुढे सरसावले आहेत. आता त्यांच्याकडे मार्ग आहे. मानहानीकारक व शोषणासकारक असलेल्या सर्व गोष्टींना झुगारून देत या अन्यायी व्यवस्थेला पर्याय उभा करण्याचा किंवा असे जे पर्याय निर्माण झालेत त्यांना पाठबळ देण्याचा, त्यात सामील होण्याचा पण बहुसख्य शोषित वंचित जातीतील लोक या चित्रपटात दाखवलेल्या त्या विशेष पात्रा सारखे आहेत. त्यांना वाटतं व्यवस्थेच्या शीर्षस्थानी बसलेल्या लोकांचा अंधानुकरण करून आपल्याला ते साध्य होणार आहे.
बघा ब्राह्मणी नीती तत्त्व नेहमीच दुहेरी पद्धतीने काम करत आले आहेत. एकीकडे ते तुम्हाला सांगतात की आम्ही असेच मेहनत घेतो आम्ही अध्ययन अध्यापन करतो पूजा पाठ करतो त्याचे विविध कठोर असे नियम पालन करतो, मांस भक्षण वगैरे टाळतो विशिष्ट असे दैनंदिन कर्म आम्ही करतो जे तुमच्याकडून होणे शक्य नाही, आमच्यात विशिष्ट असे सत्वगुण आहेत, मेरिट वैगरे… त्यामुळे आम्हाला उच्च असण्याचा ब्राह्मण असण्याचा अधिकार आहे. दुसरीकडे जाती वर्ण जन्मजात असल्याच सांगतो, आम्ही जन्मजात श्रेष्ठ असल्याचे सांगतो. त्याला आधार म्हणून पुराण कथा प्रसूत करतो, हे सर्व ईश्वर निर्मित आहे असा दावा ठोकतो. पण काळानुरूप वर्ण जाती व्यवस्थेवर जेव्हाही प्रश्नचिन्ह उभे केले जाते तेव्हा हे लोक तोंड वर करून वर्णव्यवस्था हे कर्मावर आधारित असल्याचं हिरीरीने सांगतात. मग वेळोवेळी कर्माचं परीक्षण करून वर्णजाती बहाल/वाटप करण्यासाठी अश्या एखाद्या संस्थेच प्रावधान हिंदू ब्राम्हणी धर्मात आहे का ? किती लोकांचा आजपर्यंत वर्णजाती बदल घडून आणलाय? वास्तुस्थितीला धरून असे तार्किक प्रश्न विचारले की याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नसतं. मग पुढे हे अशी थाप सोडतात की या जन्मातील चांगला कर्माचे फळ पुढच्या जन्मात उच्च जातीत जन्म म्हणून मिळतो वैगरे.. थापाहान्यात आणि शब्द फिरविण्यात शोषक जातीवर्णाचे लोकं हे पटाईत असतात. त्यात त्यानां लाज ना शरम !!
सांगायचा मुद्दा हाच आहे की जी गोष्ट मुळातच चुकीची आहे. सर्व आपण माणसांसारखे माणसचं असताना कोणाचं श्रेष्ठ असणं पवित्र असणं व्वा कोणाचं नीच अपवित्र असणं हेच शक्य नसताना. तुमच्या राहण्याचा दर्जा हा तुमच्याकडे असलेल्या संसाधनांवर निर्भर असताना, तुमच्या विकास हा तुम्हाला प्राप्त होणाऱ्या अनुकूल परिस्थिती, संधी व सामाजिक भांडवलावर अवलंबून असताना हे वास्तविक घटक लक्षात न घेता काहीतरी काल्पनिक बनाव करून मुळात ज्या धर्माची मूलतत्त्वच शोषणाचा पुरस्कार करतात अशी व्यवस्था राबवण्यासाठी तस समाजराजकीय तत्त्वज्ञान उभ करतात, त्याला ईश्वरी म्हणून प्रसारित करतात, त्याला धर्मसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनवून ठेवतात. ज्याचा मूळ मोटिव्हच शोषणाची व्यवस्था लागू करणे आहे. अशांच अनुकरण करून तुमची सामाजिक पत तर उंचावणार नाही उलट ज्या धर्म संस्कृतीने तुमचं जगणं कलंकित केलं, तुमचा अनन्वित छळ केला, पिढ्यान पिढ्यांच माणूसपण हिरावून घेतलं तुम्ही त्याच व्यवस्थेचा पाया तुमच्या आंधळ्या अनुकरणातून अधिकाधिक मजबूत करीत असतात.
आज राजकीय गरज म्हणून तात्पुरतं त्यांच्या धर्मग्रंथातील पात्रांशी तुमचा संबंध जोडून तुमचा गुणगौरव केला जाईल, थोडा बहुत फायदाही करून देतील पण तो दीर्घकाळ टिकणारा नसेल, प्रतिकुल परिस्थितीत तो आपली स्ट्रॅटेजी बदलतो कधीकाळी तुमचा स्पर्श न चालणाऱ्यां त्यांना अचानक तुमच्या मुठीत हिंदुत्व दिसू शकते, अचानक तुम्ही धर्म रक्षक म्हणून पुढे केले जाऊ शकता, तुमच्यावर स्तुती सुमने उधळली जाऊ शकतात, तुम्हीच “खरे हिंदू” म्हणून गोजाराले जाऊ शकता जे सध्या त्यांनी सुरू केलय कधीचच. मध्यंतरी धर्मग्रंथातील काल्पनिक पात्रांचा एनकेन प्रकारे अनुसूचित जाती-जमातीयांशी संबंध जोडून जातीय अस्मिता निर्मितीचं काम जोमाने करण्यात आले. गौरव करण्यासारखं, अभिमान बाळगण्यासारखं काहीतरी मिळतेय म्हणून त्यांच्यातील बऱ्याच चेकाळुन गेलेल्यानी लक्षात ठेवायला हवय की या शोषणाच्या अन्यायी व्यवस्थेला मुळातून उखडून फेकण्यासाठी जे राबत आहे. ज्या धर्मसंस्थेवर ज्या समाजसांस्कृतीक घटकांवर ही शोषणाची व्यवस्था उभी आहे त्यांना पर्याय देऊ पाहणाऱ्या या क्रांतिकारी बुद्ध-आंबेडकरी प्रवाहापासून तुम्हाला दूर ठेवणे त्यांचा मुख्य हेतू आहे.
तुम्हाला खरं आत्मभान देणार, तुम्हाला स्वबुद्धीवर विश्वास ठेऊन स्वाभिमानानं जगायला शिकवणारं, तुम्हालां शोषणमुक्त जीवनाकडे घेऊन जाणारं, समाज-सांस्कृतिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनिवणारं , तुमचा स्वाभिमान जागवणारं असलं काही त्यांना नको असतं, तुम्हाला तुमच्या सर्व संभाव्य क्षमतांनिशी विकसित होण्याच्या अशा सर्व प्रेरणाना अशा सर्व समाज-सांस्कृतीक राजकारणाला, अशा व्यवस्था निर्मितीला मात्र त्याचा कडाडून विरोध असतो.
“त्यासाठीच तर तुमचा बुद्ध त्यांनी मातीत घातला असतो.” त्यांना असलेल्या अनुकूल परिस्थितीत ते तुमच्याशी कशे वागले हे सर्वात आधी पडताळून बघितले पाहिजे. ज्यांनी शेकडो वर्ष तुमच्या बाबत साधी माणुसकी दाखविली नाही. आज तुमच्या बाबत एवढे उधार का होत आहेत? असा प्रश्न प्रत्येकाला पडला पाहिजे!..
आता त्यांचा सर्वात नजिकचा आणि सर्वात अनुकूल काळ म्हणजे पेशवाई आता तोच बघून घ्या, या पेशवाई मध्ये म्हणे सोनार जतियांनी ब्राह्मणांसारखे धोतर नेसण्याचा प्रकार केला म्हणून पेशव्यांनी रीतसर आदेश काढून त्यांचे कुल्ले छाटल्याचे उदाहरणे आहे. हा अगदी अलीकडील इतिहास आहे. ही सोनार लोकांची गत… तेथे पूर्वास्पृष्य आदिवासी भटके किस झाड की पत्ती म्हणायचं! हे असलं स्वार्थापोटी म्हणा वा गुणगौरव होतो म्हनुण चेकाळून जाऊन म्हणा किंवा त्यांच्या समाजराजाकीय स्थानाला प्रभावित होऊन म्हणा “अंधानुकरण” म्हणजे ढूंगनाचे सोडून डोक्यास गुंडाळण्यासारखा प्रकार आहे. हे शोशित वंचित जात समुदायांनी पक्क लक्षात ठेवायला पाहिजे.
योगेश भागवतकर
लेखक अमरावती येथील रहिवासी असून शिक्षण BA(English literature)असून वर्धा येथे सरकारी सेवेत कार्यरत आहे. त्यांचा संपर्क क्रमांक. ९६३७९७५८२३.

Leave a Reply