आंबेडकरी थॉट लीडरशिप आणि डी-कास्ट प्रिवीलेज -एक विवेचन

बोधी रामटेके

दलितांनी आपल्या चळवळीचे नेतृत्व आणि आपल्या हक्काचा स्पेस दलितेत्तर जातींतील ‘सिम्बॉलिक’ आंबेडकरवाद्यांकडे इतक्या सहजासहजी देऊ नये. ते नेतृत्व उच्च शिक्षणाच्या कामासंदर्भातील असो किंवा कुठलेही का असेना. अनेक उदारहणे समोर दिसतात ज्यात ही लीडरशिप दलितांसाठी धोक्याची ठरत असल्याचे वाटते.

दलितेत्तर जातींमधून सिम्बॉलिक आंबेडकरवाद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसते. मी यात दलित असणे म्हणजेच आंबेडकरवादी होणे असा काही निकष लावत नाही. आंबेडकरवादी होणे ही एक Social Commitment आहे जी ते Symbolic आंबेडकरवद्यांकडे पूर्णपणे दिसत नाही. ही लोक नावापुर्ती आंबेडकरवादी ओळख वापरून दलितांना भावनिक करत, स्वतःच्या संस्थात्मक किंवा इतर वैयक्तिक फायद्यासाठी त्यांना माध्यम बनवून स्ट्रॅटेजिकली वापर करतांना दिसतात.

ते दलित नाहीत म्हणून त्यांचा विरोध आहे असे नाही. पण ज्यांची फुले, शाहू, आंबेडकरी School of Thoughts मद्ये वैचारिक जडणघडण होत नाही त्यांना त्या विचारांशी तडजोड करण्यास त्यांना अनेकदा गैर वाटत नाही. हेच लोक पुढे दलितांचा ‘मसीहा’ बनू पाहतात कारण समाज भावनिक असल्याने त्यांना अशी संधी लवकरच दिसते.

खरंतर आंबेडकरी विचारांवर कुण्या एका समाजाची मक्तेदारी नाही. पण तों विचार स्विकारल्यानंतर किंवा त्याबद्दलची Commitment दाखवील्यानंतर लोक स्वतःची Positioning ‘दलित‘ म्हणून करू लागतात, किंवा यां पुढे जाऊन दलितांचेच प्रतिनिधित्व करू पाहतात, जे पूर्णपणे चुकीचे आहे. इतर मध्यम जातींचे देखील गंभीर प्रश्न आहेत, त्यांचा देखील अन्यायचा एक इतिहास आहे पण त्या समूहातील लोकांनी काम करतांना त्यांची Identity Openly सांगावी. फक्त नावासाठी आंबेडकरवादी म्हणवून घेत समाजाची दिशाभूल करू नये.

उच्च वर्णीयांसोबतच इतर मध्यम स्तरावरील जातीतील लोकं स्वतःहून ‘दलित‘ ही Identity क्लेम करण्याचा प्रयत्न करतांना दिसतात किंवा ’Decaste‘ होण्याचा बाता करता. ही Identity मुळात इथल्या व्यवस्थेला भिडण्यासाठी अजिबात घेतलेली नसते. या Identity चा वापर करून त्याचे भांडवल करत त्यांना अनेक फायदे मिळू शकतात हे त्यांना माहित आहे. सोशल मीडियावर तर अश्या लोकांची मोठी वाढ होतांना दिसत आहे. दलित असल्याचे दाखवून त्यांनी मोठे फंडिंग, Resources गोळा केले आहेत आणि या identity ला स्वतःचे पोट भरण्याचे साधन बनवले आहे. ज्यांचा चळवळीचा काही एक संबंध नाही, समज देखील नाही, शोषणाचा काही इतिहास नाही असे देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘शोषितांचे हिरो’ होऊन बसले आहेत आणि त्यांना पाठबळ देण्यात आपली मंडळी देखील मागे राहिलेली नाही. कलेच्या नावाखाली तर सोशल मीडियावर मोठे प्रस्थ निर्माण केले आहे. ती लोकं अगदी नियोजितपणे आपल्यातील Influence करता येणाऱ्या काही ‘so called Social Media Celebrities’ ला पकडतात आणि त्यांच्या माध्यमातून आपले हित साधतात. उच्च वर्णीयांचे पाठबळ असलेल्या काही दलितेत्तरांना तर फार कमी दिवसातच दलितांच्या क्रांतिकारकाच्या भूमिकेत प्रोजेक्ट केले जाते आणि आपणही कुठलीही चिकित्सा न करता, मग ती उच्च वर्णीयांची असो की इतर कुणाचीही, ती लीडरशिप आपली म्हणून स्वीकारतो.

यातच ‘Decaste’ सारख्या संज्ञा दलितांना मूर्ख बनविण्यासाठी तयार केल्या जातात. जातीच्या Privileges वर जगणारे कसे काय Decaste होऊ शकतात? दलितांनी Decaste होतो म्हटल्याने त्याचे शोषण थांबत नाही तसेच, उच्च वर्णीयांणी तसे म्हटल्यांनी त्यांचे Privileges गळून पडत नाही. Decaste म्हणवून घेतल्याने पॉवर डायनॅमिक्स बदलत नाहीत. त्यांची Positioning जातीय उतरंडीत ही तिथेच असते. Decaste होणारा उच्च वर्णीय क्रांतिकारी होऊ शकतो, पण दलित नाही. व्यक्तीगतरित्या Decaste झाल्याने काहीही फरक पडत नाही, कारण ही जात ही समस्या वैयक्तिक नाही, ती व्यवस्थात्मक आहे. उच्चवर्णीयांसाठी ही संकल्पना symbolic gesture असू शकते, पण दलितांसाठी हा Survival चा प्रश्न आहे.

या Decaste मंडळीसोबतच स्वतःच्या Dalit असण्याला ग्लोरिफाय आणि त्याचे भांडवल करणारे देखील तितकेच जबाबदार आहेत. विदेशात जाऊन, तिथल्या मोठ्या फंडिंग घेऊन जेव्हा खरी प्रतिनिधित्व दाखविण्याची, आपले प्रश्न मांडण्याची वेळ असते तेव्हा मात्र याच दलित Identity च्या भोवताल ते बोलत बसतात. आम्ही म्हणजेच जणू काही संपूर्ण समाज असेच भासवत तिथे प्रतिनिधित्व करतात. Panel मध्ये संपूर्ण शोषितवर्गातील मंडळी असेल तर, ठणकावून बोट दाखवत त्यांच्यावर सरसकट टीका करण्याऐवजी, समाजाकडे परत येऊन रडगाणं करतात की कसे तिथे देखील आमचे कसे शोषण झाले. बोलायची संधीचा सोडून, समाजापुढे येऊन भावनिक होऊन काही अर्थ नाही.

‘जात‘ हा मुळे प्रश्न आहे, जात ही ब्राह्मण संस्था आहे सांगण्याऐवजी, Intersectionality सारख्या गोष्टींच्या भानगडीत Gender, Dalit Feminism, Climate करत ब्राम्हणावरचा, आणि शोषणकर्त्यावरचा संपूर्ण फोकस दलितांवर आणून ठेवला जातो. दलित म्हणून होणारे शोषण आणि शोषणकर्त्यांची त्यात असलेली जबाबदारी पूर्णपणे दुर्लक्षित केली जाते. जातीला विकून मोठे झालेल्यांनी जातीची दिशाभूल करणे योग्य नाही.

समाजाचे खोटे, symbolic चित्रण करून, समाजालाच Commodify करून टाकातांना मागे राहिलेल्या समाजाचा विचार करावा. आपण कुणाच्या experiences चे भडवणं करत आहोत याचे तरी भान असणे गरजेचे आहे. Intellectual क्लास म्हणून बाबासाहेबांनी आपल्यावर मागे राहिलेल्या समाजाला दिशादर्शनाची जबाबदारी सोपावली असतांना, असले प्रकार त्याचं क्लास कडून होणे फार मोठी शोकांतिका आहे.

या परिस्थितीत दलितांनी स्वतःचा Self Determinism प्रोटेक्ट केला पाहिजे. स्वतःच्या identity वर, संसाधनांवर, आणि वर्तमान- भविष्यात घडणाऱ्या इतरही बाबींवर समाजाचे नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. हे प्रोटेक्ट करणे म्हणजे, जातीच्या Indetity ला चिकटून राहणे, त्याला ग्लोरिफाय करणे किंवा Casteless Society निर्माण करण्यात आपणच बाधा आणणे असे नाही तर त्या Identity चा वापर करत त्याचे भांडवल करणाऱ्यांवर, आपला स्पेस हिसकावून घेणाऱ्यांवर अंकुश ठेवणे होय. पण असे न होता, आपलीच Intellectual समजणारी, किंवा अनेक वर्षांपासून विदेशात बसून समाजाचे उधारकर्ते म्हणवून घेणारे, अनेकदा तर उच्च वर्णीयांच्या मागे Validation साठी पळणारी मंडळी, शोषणकर्त्या जातींसाठी ही खुली Space निर्माण करून देत आहे. हे थांबले पाहिजे. यासाठी समाजाअंतर्गत प्रभावी काम होणे, सगळ्यांनी एकसंघ होणे गरजेचे आहे.

आपण फार भावनिक आहोत. अन्यायाचा मोठा इतिहास असताना देखील इतक्या सहजासहजी कोणाचीही लीडरशिप मान्य करण्याची प्रवृत्ती बंद केली पाहिजे. किमान थोडं तरी चिकित्सक राहून माणसं तपासली पाहिजे. तुम्ही दलित, शोषित म्हणून परत तुम्हालाच समता, न्याय, वैज्ञानिक दृष्टीकोणाचे धडे देऊ पाहत असलेले स्वतःच्या आयुष्यातील- घरातील विषमतेच्या रुढी, कर्मकांडांना आव्हान देण्याचे धाडस करतात का हे देखील बघा. नुसतं ‘जय भीम’ बोलण्याने, माणसं आंबेडकरवादी होत नसतात. अश्या लोकांकडून आपल्या संसाधनांचा आणि श्रमांचा मोठ्या प्रमाणात वापर करून उच्च वर्णीयांना पोषक वातावरण निर्माण केला जातो. त्यांना लवकर ओळखणे आणि खरंतर ‘आंबेडकरवादी कोणाला म्हणावे’ याचे निकष, आणि याची स्पष्ट परिभाषा देखील समाजाने आखाणे गरजेचे आहे. नाही तर आंबेडकरवादी म्हणवून घेत स्वतःचे फायदे करणारी अशीच मोठी फळी तयार होत राहील, समाजाचे प्रश्न मात्र जैसे थे राहतील.

बोधी रामटेके

लेखक कायद्याचे अभ्यासक असून Erasmus Mundus ह्या प्रतिष्ठित जागतिक स्कॉलरशिप चे फेलो आहेत.

8 Comments

  1. बोधी,
    जय भीम नमो बुद्धाय 💐🙏
    So called Ambedkarite बाबत योग्य विश्लेषण केलेत. Go ahead.

  2. Brilliant article, Bodhi. Very well written and very much needed as a wake up call for all our people in India and abroad! Do keep writing……

  3. प्रिय बोधी,
    खुप सुंदर विश्लेषण केलस. खरं तर बहिष्कृत लोकांमध्ये चळवळीचे कार्यकर्ते हे भावनिक मुद्दे घेऊनच मोठे केले जाते. बाकी अभ्यासात्मक विश्लेषण चा अभाव सतत दिसून येतो. असला प्रश्न दलित नावाचा!हे नाव वापरून विदेशी फंड गोळा करून त्याचा वापर चाकोरीबंद केला जातो. गरजू अभ्यासक मंडळीला त्याचा फायदा होताना दिसत नाही. किंवा ती योजना त्यांचा पर्यंत पोहचत नाही, विशेषतः योजना घेणाऱ्यांना माहिती असते की समाजातील अभ्यासात्मक मंडळी कोण आहे ते.

  4. Very much eye-opening for everyone who belongs to bahujan identity. Thanks for your thought provocative and deliberative writing dear. Jai Bhim.

  5. उत्तम आणि मुद्देसुद मांडणी.आंबेडकरवादी कोणाला म्हणावे’ याचे निकष ठरवावे लागतील.v

  6. I really like this article. It makes me think about how some NGOs use the stories of marginalised people to get funding, but don’t actually give them leadership roles.

Leave a Reply to khagesh Cancel reply

Your email address will not be published.


*