योगेश भागवतकर
मित्रांनो, ‘फुले’ हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरलाय.
बरेच लोकं फुले या चित्रपटाची स्तुती करताहेत. चित्रपट तांत्रिक दृष्ट्या खरच अप्रतिम झालाय. पण चित्रपट कोणी केवळ तांत्रिक बाबींसाठी पाहत नसतो त्यात महत्त्वाचे असते कॅरेक्टर्स स्टोरी. त्यातील संवाद… त्या सर्व गोष्टी ज्या आपल्याला प्रभावित करत असतात. आणि ऐतिहासिक चित्रपट असेल, एखाद्या महापुरुषावर चित्रपट असेल तर मग याचे महत्त्व आणखीनच वाढते. नेमका काय प्रभाव चित्रपट सोडतो ? नेमकं काय दाखवू इच्छितो ? त्याचा उद्देश ? सत्याचा विपर्यास करून काही दिशाभूल करणाऱ्या, गैरसमज पसरविणाऱ्या गोष्टी आहेत का ? की काही ऐतिहासिक तथ्यांना आपल्या सोयीनुसार निषप्रभावी करून तर काहींची अतिशोक्ती करून आपले छुपे मनसुबे पेरण्यात आलेत ? हे सगळे बघणे आवश्यक असत.
तसा “फुले” हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला. सेन्सॉर बोर्डाच्या अडथळ्यांपासून ते ब्राह्मण समाजाच्या कथित अपमानाच्या आरोपांपर्यंत, या चित्रपटाने बहुजन समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटवल्या. मात्र, चित्रपट पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते — हा चित्रपट फुले यांच्या क्रांतिकारी कार्य-विचारांना उजाळा देण्याऐवजी त्यांना सूक्ष्मपणे (Subtly) बदनाम करण्याचा प्रयत्न करतो. हा चित्रपट ब्राह्मणवादी मानसिकतेच्या मनसुब्यांना पुढे रेटण्याचा एक सुनियोजित प्रयास आहे. असे माझे ठाम मत आहे., ज्यामध्ये फुले यांना इंग्रजधार्जिणे, कमकुवत आणि वैचारिकदृष्ट्या प्रभावीहिन म्हणून चित्रित केले आहे. हा लेख ‘फुले’ या चित्रपटाचा वैचारिक दृष्टिकोनातून चिकित्सक आढावा घेऊन त्यामागील बहुजन महापुरुषांच्या चरित्रहननाचं बामणी षडयंत्र उघड पाडण्याचा अल्पसा प्रयत्न आहे.

महात्मा जोतिराव फुले हे आधुनिक युगातील शोषित बहुजन समाजाचे सक्षमिकरण करणारे पहिले क्रांतिकारक विचारवंत होते. त्यांनी ब्राह्मणवादी सत्तासंरचनेच्या आर्थिक, सामाजिक आणि धर्म-सांस्कृतिक वर्चस्वाला थेट आव्हान दिले. ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्याचा आसूड’ यांसारख्या त्यांच्या लेखनातून त्यांनी शोषणाच्या व्यवस्थेची मुळे उघडी पाडली. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेतून त्यांनी एकेश्वरवादी सार्वजनिक सत्यधर्माचा पाया रचला, ज्याने हिंदू ब्राह्मणी धर्माच्या सत्तासंरचनेला जोरदार धक्का दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध आणि शिवजयंतीचा प्रारंभ यांसारख्या कार्यातून त्यांनी बहुजन समाजाला ऐतिहासिक प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला. सावित्रीमाई फुले यांच्यासोबत त्यांनी स्त्रीशिक्षण आणि दलित-बहुजनांच्या उद्धारासाठी अथक संघर्ष केला. मात्र, ‘फुले’ चित्रपट या क्रांतिकारी वारशाला पुसट करतो आणि फुले यांची एक वेगळीच प्रतिमा रंगवतो.
‘फुले’ चित्रपटाचा एकूण टोन मरगळलेला आहे. जोतिराव फुले कधीच उल्हासित किंवा प्रेरणादायी दिसत नाहीत. प्रतीक गांधीला जणू काही इन्स्ट्रक्शन मिळाल्यात की “तुला संपूर्ण चित्रपटात चेहरा पाडूनच वावरायचं आहे.” अत्यंत हताश निराश असल्यागत त्यांची अक्टिंग आहे. फुले यांचा परखडपणा, जो ब्राह्मणवादी व्यवस्थेला थेट आव्हान देणारा होता तो चित्रपटात पूर्णपणे गायब आहे. उलट, फुले यांना आगतिक आणि परिस्थितीसमोर हतबल असे चित्रित केले आहे. विशेष म्हणजे फुटकळ रोल असणाऱ्या ब्राह्मणांना मात्र रुबाबदार टवटवीत दाखविले आहे. या चित्रपटातील संवाद अत्यंत बालिश गोंधळात टाकणारे आणि गैरसमज निर्माण करणारे आहेत.
…….. चित्रपटाच्या सुरुवातीला डिस्क्लेमर दाखवला आहे ज्यात म्हटले आहे की हा चित्रपट अत्यंत सखोल अध्ययन करून बनविलेला आहे. आता यांचे हे सखोल अध्ययन बघूया.

प्रसंग पहिला :
भिडे म्हणतो “जोतिबा ब्राह्मण समाज इसके विरोध में है…” त्यावर जोतिबा म्हणतात : “जानता हु और आप ब्राह्मण होते हुए भी हमारी इतनी सहायता कर रहे हैं! ” सुरुवात मध्येच ब्राह्मणांना सुरक्षित करून ठेवले. ब्राह्मणांनी एखादी व्यक्तिगत म्हणा वा व्यवहारिक कारणाने म्हणा केलेली मदत अशी खूप भारी भरीव करून दाखवली जाते. जी या चित्रपटातही आपल्याला पाहायला मिळते.
प्रसंग दुसरा :
एके ठिकाणी जोतिबां म्हणतात “ श्री गणेशासाठी पाच पुरेसे आहेत ”
त्याचप्रमाणे एके ठिकाणी सावित्रीमाई म्हणते “ हिंदू धर्म मे स्त्री को दुर्गा लक्ष्मी सरस्वती कहा गया है… ज्ञान अर्जित करने का अधिकार सिर्फ पुरुषो का होता, तो भगवान सरस्वती मॉ को ज्ञान की देवी नही बनाते ! ” असे बालिश वाक्य आहे. जे फुले यांच्या सत्यशोधकी विचारांच्या अगदी विसंगत आहे. फुले यांनी सर्व ब्राम्हणी हिंदू धर्मग्रंथाना थोतांड म्हटले आहे. एवढेच नव्हे तर फुले यांनी पुराणकथांमधील परशुराम, गणपती, वामन यांसारख्या पात्रांची उघडपणे टर उडवली होती आणि वेदातील पुरुषसूक्ताचे उदाहरण देत “ब्राह्मण मुखातून कसे काय पैदा होतात?, प्रात्यक्षिक दाखवा” असे म्हणत पुण्यातील ब्राह्मणांना जेरीस आणले होते. मात्र, या गोष्टी चित्रपटाच्या तथाकथित “सखोल अध्ययनातून ” सुटल्या असाव्यात.
प्रसंग तिसरा :
एका दृश्यात इंग्रज अधिकारी रीप फुले यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवतो आणि लगेच म्हणतो, “ब्रिटिश कंपनी एक कन्स्ट्रक्शन काम हाती घेत आहे. त्यासाठी कॉन्ट्रॅक्टर म्हणून मी तुमचं नाव सुचवल आहे.” यावर फुले “थँक्यू” म्हणतात आणि घरी गेल्यावर सावित्रीमाई त्यांच्यावर चिडतात. फुले म्हणतात, “इंग्रज कॉन्ट्रॅक्ट देत आहे मी घेत आहे. मला माहित आहे इंग्रज लुटायसाठी आले आहेत.” आणि तिथेच तो विषय क्लोज केला जातो… हे दृश्य असे रचले आहे की फुले इंग्रजांच्या लोभाला जणू बळी पडले आहे. यातून फुले यांच्या स्वायत्त क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वाला संशयास्पद बनविल्या जाते. फुले यांना ब्रिटिश सरकारकडून मिळालेली मदत ही कोणताही गिव्ह-अँड-टेक व्यवहार नव्हता, तर त्यांच्या कार्याची दखल घेणारा प्रशासकीय निर्णय होता. मात्र, चित्रपटात फुले यांचे संपूर्ण कार्य ब्रिटिशांच्या कृपेवर अवलंबून आहे असे अप्रतेक्षपणे भासवले जाते.
प्रसंग चौथा : ऐतिहासिक सत्यांचा विपर्यास-लहुजी साळवे.
पुण्याच्या मुख्य व्यापार लाइन मध्ये कहीं तरुण दौंडी पिटत असतात “ दोस्तों सुनो सुनो सुनो जो युवा देश के स्वतंत्रता संग्राम में भाग लेना चाहते हैं उन्हें जीवन भर व्यायाम शाला की सुविधा मुफ्त मिलेगी। “
” लहू जी साल्वे उन्हें स्वयंम युद्ध कला का प्रशिक्षण देंगे…” आणि “सर्व जातीमध्ये त्यांचा दबदबा आहे.” वगैरे वाक्य. लहुजी साळवे यांचे हे जे चित्रण खरंच ऐतिहासिक तथ्यांना धरून आहे का ? एकीकडे कमरेला झाडू गळ्यात गाडगे बांधलेले अस्पृश्य फिरताना दाखवलेत. आणि एकीकडे लहुजीना ताकदवर तत्कालीन कोणीतरी मोठ्ठ प्रस्थ असल्यागत.
पुढे कहर म्हणजे जोतिराव फुले जेव्हा लहुजी साळवे ना भेटतात आणि गोविंदराव फुले यांचा मुलगा अशी ओळख देताच लहूजी त्यांची गचांडी पकडून त्यांना खाली आदळतात त्यांच्या मांडीवर पाय ठेवून. त्यांना ” अंग्रेजोके दलाल ! उनका साथ दे रहे हो, जो इस देश को गुलाम बनाना चाह रहे है..!! ” म्हणत त्यांचा धिक्कार करतात. या चित्रपटातील हे सर्वात मोठं बामणी कपटकारस्थान आहे. येथे लहुजींच्या माध्यमातून ब्राम्हणी आरोपांचा मारा करण्याचा प्रयत्न झाला आहे. स्वतःच्या मनातील सर्व त्यांनी लहुजी साळवे यांच्या माध्यमातून घडवून आणलं.
या घटनेतून ते सांगू पाहतात की गोविंदराव फुले यांचा मुलगा जोतिराव फुले हे इंग्रजांची दलाली करतात हे जणू सर्वमान्य होतं. त्याला तत्कालीन सर्व मान्यता देण्याचा हा कुटील डाव ! परंतु जोतीरावांवरील हे असले आरोप हे फक्त ब्राह्मनी कंपू पुरतेच मर्यादित होते ते तेव्हाही आणि आजही.
कमाल बघा ही एवढी गोष्ट करण्यासाठी त्यांनी लहुजी साळवे या इतिहासात नगण्य माहिती असलेल्या कॅरेक्टरला कसं खतपाणी दिलय, मोठं केलंय.
पण तत्कालीन ऐतिहासिक सामाजिक परिस्थितीची समज असणाऱ्यांच्या हे लगेच लक्षात येते. लहुजी साळवे हे “मांग” जातीतील होते एक अस्पृश्य जात. भयानक अस्पृश्यता पाळला जाणारा तो काळ, मग लहुजी साळवेला काय अस्पृश्यतेतून सूट दिली होती काय ?
बर अस्पृश्यतेमुळे जिथे अस्पृश्य व्यक्तीची तत्कालीन सवर्ण वर्गाला सावली सुद्धा चालत नव्हती तेथे या अस्पृश्य जातीतील लहुजी साळवेंकळे युद्ध प्रशिक्षण घ्यायला कोण बरं येत असेल ? या एकट्या लहुजी साळवे बाबत असं काय मोठं समाज मन उदार झालं होतं कुणास ठाऊक?
बरं आपल्या जातीला एतेथदेशीय स्वधर्मीय लोकांकडून कुत्र्या माजरांपेक्षाही हिन वागणुक मिळत असताना आणि नैसर्गिक मानवी अधिकारही नाकारले असताना त्यासाठी काही करण्याऐवजी या लहुजीला इंग्रजांशी लढण्याचा कंड कसा काय ऊठला असेल बरं ?!
बरं लहुजी असे म्हणतात ” ये अंग्रेज बहुत धूर्त प्राणी है… जरूर इसमे ऊनकी कोई चाल होगी! “
म्हणजे फुलेंना नाही कळत पण त्या अडाणी लहुजी साळवेला कळतंय बरं का ?
बरं यांनी ” सत्यशोधक ” या मराठी चित्रपटात सुद्धा हेच काम केलेलं. म्हणजे हे पुण्याच्या बामानंकडून वापरण्यात आलेले सूत्र हिंदी भाषिक बामनांपर्यंत बरोबर पोहोचवण्यात आलं. काय साली देवाण घेवाण आहे यांच्यात !!
सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाशी असा खेळ करणे ही बामणी विकृतीच नाही का ? माहित नाही पुढे अजून काय काय करून घ्यायच आहे या कॅरेक्टर कडून त्यांना ते तेच जाणो.
चित्रपटात फुले यांच्या अनेक महत्त्वाच्या कार्यांना पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. ‘शेतकऱ्याचा आसूड’ हे फुले यांचे सर्वोच्च लेखन, ज्यामध्ये त्यांनी संस्कृती आणि अर्थकारणाच्या आधारे शोषणाची समग्र चिकित्सा केली, याचा चित्रपटात उल्लेखही नाही. जोतिराव फुलेंच्या जीवनातील आणि सत्यशोधक समाजाच्या स्थापनेतील बहुजन सहकाऱ्यांचे योगदान दाखवण्याऐवजी सुरुवातीचे ब्राह्मण सहकारीच सतत झळकतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध आणि जयंतीचा प्रारंभ, सावित्रीमाईंच्या ‘काव्यफुले’ या कवितासंग्रहाचा उल्लेख नाही. हिंदू ब्राह्मणी धर्माची चिकित्सा जी फुले यांच्या विचारांचा गाभा होती, ती चित्रपटात नावालाही नाही.
प्रसंग पाचवा:
चित्रपटात ब्राह्मणवादी संवादही ठळक आहेत. एक दृश्यात ब्राह्मण म्हणतात, “अंग्रेजी भाषा का प्रचार सीधा संस्कृत पे वार है… हमे संस्कृत को बचाना होगा!” आणि लगेच, “विनायक जी ज्योतिबा तो केवल दिया जला रहा है.. उस दिए मे तो तेल इग्रज सरकार भर रही है.” हे संवाद ब्राह्मणवादी आरोपांना बळ देतात, पण फुले यांचे सत्य विचार मात्र दडपले जातात, कारण ते आजच्या ब्राह्मणांच्या “भावना दुखावतील.”
प्रसंग पाचवा:
सावित्रीमाईंच्या तोंडी एक वाक्य आहे, “भारत मे पहली बार किसी को महात्मा की उपाधि मिली है जो ब्राह्मण नही है.” हा काय मूर्खपणा आहे ? जोतिरावांनपूर्वी कोणत्या ब्राह्मणाला ‘महात्मा’ ही पदवी मिळाली होती ? हे वाक्य फुले यांच्या महात्मा या पदाची गरिमा कमी करण्याचा प्रयत्न आहे. आणि यांनी सखोल अध्ययन केलं म्हणे!
सेन्सॉर बोर्ड आणि सस्ती पब्लिसिटी :
चित्रपटाला रिलीजपूर्वी सेन्सॉर बोर्डाकडून आलेले अडथळे आणि काही अल्पबुद्धी ब्राह्मणी संघटनांचा विरोध हाँ सस्त्या पब्लिसिटीचा भाग होता. प्रतिष्ठित ब्राह्मणी व्यक्ती / संघटना याच्या विरोधात आल्या नाहीत, यातून या विरोधामागील उथळ हेतू उघड होतो. या नाटकी विरोधाला बहुजन समाजाने तीव्र प्रतिक्रिया देत चित्रपटाला कोणत्याही कट्सशिवाय प्रदर्शित करण्याची मागणी केली.
ज्याला ॲड.प्रकाश आंबेडकर यांनीही पाठिंबा दिला. मात्र, चित्रपट पाहिल्यावर असे वाटते की हा वाद निर्माण करून चित्रपटाला प्रसिद्धी मिळवण्याचाच डाव होता.
निष्कर्ष:
‘फुले’ हा चित्रपट महात्मा ज्योतिराव फुले यांच्या क्रांतिकारी वारशाचा अपमान करणारा आहे. फुले यांना त्यांच्या शाळेत घुसून काही ब्राह्मण मारहाण करताना दाखविले आहे. फुले हे शरीरयष्टीने धिप्पाड आणि लढाऊ वृत्तीचे होते असले पाच सहा बामण त्यांनी सहज अगदी जागीच बदडून काढले असते. सोबत फुलेंवर मारकरी येतात तेव्हा तो सीन थोडक्यात आटपोवला गेला . इथे त्या महादेवनला आपली सिनेमॅटिक लिबर्टी वापरता येण्याची बुद्धी सुचू नये. येथे तर लिबर्टीचीही गरज नव्हती. फुले अगदी वास्तविक जीवनातील सुपर हिरो आहेत. इतकं सिनेमॅटिक मटेरियल फुलेंच्या जीवनात भरून आहे. पण चित्रपटाचा उद्देश तो नसावाच तर ते कसं दाखवणार!?.
आणखी हास्यास्पद विचीत्रपणा म्हणजे..
फुले हे माळी जातीतील असूनही बामणांना त्यांच्या सावलीचा विटाळ दाखवला जातो, पण अस्पृश्य लहुजी साळवेंचा नाही. मुक्ता साळवे ही मुलगी तिच्या “महार मागांच्या दशेविषयी” या क्रांतिकारी वैचारिक निबंधासाठी प्रसिद्ध आहे. पण या चित्रपटात तिला एव्हढ छोटस बाळ दाखवलं की त्या लिखानावरच शंका यावी. निबंधातील चार ओळी सुद्धा स्पष्टपणे दाखविल्या नाही. तत्कालीन एका किशोरवयीन दलित मुलीच विचार विश्व दाखवताना किती रोमांचक प्रसंग उभा झाला असता. पण दोन अर्धवट ओळींवर तुमची बोळवण केली. एवढ्या छोट्याशा कृतीला सुद्धा ते घाबरले. यावरून लक्षात येते की ब्राम्हणी हितसंबंधांच अतिशय कटाक्षाने काळजी घेत, आजच्या ब्राह्मणी व्यवस्थेला या चित्रपटातून जरा देखील धक्का लागणार नाही एक ठिणगी सुद्धा त्याच्या विरोधात भडकणार नाही याची पुरेपूर काळजी या चित्रपटात कटाक्षाने घेतली आहे. चित्रपट निर्माते “सखोल अध्ययनाचा दावा करतात, पण असे वाटते की पुण्यातील चार सनातनी ब्राह्मणांनी स्क्रिप्ट लिहिली आणि तथाकथित पुरोगामी ब्राह्मण अनंत महादेवन या दिग्दर्शकाने ती हिंदीत जशीच्या तशी ट्रान्सलेट करून वापरली.
एक प्रकारे म्हणू शकतो की हा चित्रपट आजच्या ब्राह्मणी परस्पेक्टिव्हणे बनविला आहे. त्यातून क्रांतीबा फुलेंचे क्रांती तत्त्वच गहाळ आहे.
बघा ऐतिहासिक महापुरुषांच “जीवनचरित्र” त्यावरील चित्रपट हे समाजशास्त्रीय प्रात्यक्षिक असते, लोकशिक्षण असते. शोषित वर्गासाठी ती एक मोठी पुंजी असते.
पण शोषक वर्गच जर पुढे येऊन ते आपल्या पुढे मांडत असेल तर त्यांचा हेतू तपासला पाहिजे. केवळ भावनिक होऊन चित्रपट बघण्या एवजी त्यांना शंखेने बघितले पाहिजे. फुले चित्रपट पाहून तर हे खूपच गरजेचे वाटते. बहुजन समाजाने फुले यांच्या विचारांना समोर आणून चित्रपट निर्मितीचा कपटी हेतू हाणून पाडला पाहिजे आणि असल्या कलाकृती पासून सावध राहिले पाहिजे.
योगेश भागवतकर
लेखक अमरावती येथील रहिवासी असून शिक्षण BA(English literature)असून वर्धा येथे सरकारी सेवेत कार्यरत आहे. त्यांचा संपर्क क्रमांक. ९६३७९७५८२३.

Leave a Reply