कोणाच्या फायद्याचा हो हा बजेट?

बोधी रामटेके सध्याच्या सरकारचा तिसरा अर्थसंकल्प विधानसभेत सादर झाला त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यासाठी नवीन विमानतळ उभारणीचा व सोबतच जिल्ह्याला समृद्धी महामार्गाशी जोडण्याची घोषणा करण्यात आली आहे. नक्कीच आनंदाची बाब आहे. ज्यांनी रेल्वे कशी असते हे ही बघितलं नाही त्या आमच्या लोकांना किमान दुरून का होईना आकाशात विमान उडताना तरी बघायला मिळेल. […]

आदिवासी नावाचा शो-पीस!!!

बोधी रामटेके आदिवासी नावाचा शो-पीस!! आदिवासींच्या प्रश्नांना हात न लावता त्यांच्या कला, संस्कृतीला स्वतःचे पोट भरण्याचे व मनोरंजनाचे साधन म्हणून पाहणाऱ्या व्यवस्थेने ती मर्यादा आता पूर्णपणे ओलांडली आहे. खालील फोटो पाहून लक्षात येत नसेल तर त्याबद्दची अधिक माहिती देतो व घटनेच्या व्हिडिओ ची लिंक शेअर करतो. छत्तीसगड राज्य काँग्रेस सरकारने […]

भारतीय न्यायव्यवस्था शोषिताभिमुख होण्यासाठी संवैधानिक तरतूद ३२(३) च्या अंमलबजावणीची गरज

बोधी रामटेके “संविधानातील कुठले अनुच्छेद खूप महत्त्वाचे आहे असं जर मला विचारले, की ज्याच्याशिवाय संविधानाला अर्थच राहणार नाही तेव्हा मी अनुच्छेद ३२ शिवाय दुसऱ्या कुठल्याच अनुच्छेदाचा उल्लेख करणार नाही. हे अनुच्छेद संविधानाचा आत्मा आहे”, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते. संविधानातील अनुच्छेद ३२ मध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन […]

राम वन गमन पथ : आदिवासी संस्कृतीवरील घाला!

बोधी रामटेके साक्षरता दर कमी, कुपोषणाचे प्रमाण अधिक, शैक्षणिक व वैद्यकीय पायाभूत सुविधांचा अभाव व अश्या अनेक समस्या असलेल्या एकाद्या गरीब राज्यासाठी प्राधान्यक्रम काय असू शकतो?राज्यात असलेल्या समस्यांवर मात करण्यासाठी राज्यात चांगली व विधायक धोरणे अत्यंत लोकशाही पद्धतीने तयार करणे आणि अंमलात आणणे हा एक उद्देश त्या राज्याचा असू शकतो. […]

आदिवासींनी फक्त काय शासनासाठी ३३% जंगल राखण्यासाठीच काम करायचं का?

बोधी रामटेके देशातील जाती आधारित सामाजिक व्यवस्थेत जात व्यवस्थेच्या बाहेर असून देखील आदिवासी हा एक सुद्धा मोठा शोषित वर्ग राहिलेला आहे. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षात त्यांच्या संविधानिक गरजांची पूर्तता झालेली दिसत नाही. भारतातील आदिवासींची एक वेगळी जीवनशैली, संस्कृती आहे आणि ती जपली सुद्धा पाहिजे या मताचा मी आहे. परंतु संस्कृती जपण्याच्या […]

भीमा कोरेगाव चित्रपटाच्या निमित्ताने सद्सद्विवेकबुद्धी चा वापर अपेक्षित

बोधी रामटेके भीमा कोरेगावची लढाई ही कुठल्याही विशिष्ट जातीविरुद्धची लढाई नव्हती. हजारो वर्षे जाती व्यवस्थेच्या बंधनात अडकवून ठेवणाऱ्या विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधातील ही लढाई होती. जातीय अन्याय,अत्याचार, विषमतेच्या वागणुकी विरोधात माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारासाठीचा हा मोठा बंड होता. मुळात ही लढाई मराठा विरुद्ध महार अशी कधीच नव्हती आणि इतिहासात सुद्धा असा […]

गोष्ट स्वातंत्र्याच्या ७० वर्षा नंतरची!! (भामरागड तालुक्यातील अनुभव)

बोधी रामटेके रोशनी ला झालेल्या असाह्य वेदना आणि जयाने गमावलेला जीव या दोन्ही घटना मन हेलावून टाकणाऱ्या होत्या आणि त्यातूनच त्या दोघींच्या व त्यांच्या कुटुंबाबद्दल निर्माण झालेली काळजी मला अनेक किलोमीटरचा खडतर प्रवास करत त्यांच्या घरा पर्यंत घेऊन गेली. घटना आहे जुलै महिन्यातली. रोशनी ही नऊ महिन्यांची गरोदर होती. घरी […]