बुद्ध ते बाबासाहेब स्त्री उद्धाराचा संस्थात्मक, संवैधानिक प्रयत्न.

शुभांगी जुमळे

जागतिक स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा केंद्रबिंदू म्हणून आंबेडकरी विचारधारा अधिक समुध्द झाली आहे. अनेक वर्षे रूढींनी बंदिस्त भारतीय महिलांना अवकाश प्रदान करण्याचे काम आंबेडकरी विचारतून करण्यात आले आहे. भारतीय स्त्री मग कोणत्याही जाती धर्माची असो तिला स्वतः चे अस्तित्व हक्क प्रदान करण्याचे कार्य आंबेडकरी विचारसरणीतून झाले आहे.

भारतीय संविधानाने हिंदू कोड बील हे समस्त भारतीय स्त्री वर्गाला दिलेले आहे. महिलांना राजकीय व समान हक्काचे स्वातंत्र्य प्राप्त झाले या बिलाचे नऊ भाग, १३९ कलमे सात परिशिष्टे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांना हिंदू कोडं बिल पास होण्यासाठी अनेकांचा तत्कालीन सामाजिक, राजकीय विरोध होता .कारण उच्च वर्णीय स्त्रियां पुरूष संस्कृतीच्या राखणकर्त्यांनी याला मोठ्या प्रमाणात विरोध केला. त्यामुळे हा कायदा पास व्हायला वेळ लागत होता.
त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरानी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला.
पण हिंदू कोडं बिल झाल्यावर समस्त भारतीय स्त्री वर्गाला कायदेशीर अधिकार दिले.
१] हिंदू विवाह कायदा १९५५
२] हिंदू दत्तक व निर्वाह अधिनियम १९५६
३] अज्ञान व पालकत्वाचा अधिनियम १९५५
४] हिंदू उत्तरधिकारी अधिनियम १९५६
५] कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा २००५

भारतीय संविधानाने महिलांच्या सुधारणावादी धोरणाला मूर्तरूप देऊन कायदेशीर हक्क प्रदान केले.
ज्या मनुस्मृतीत स्त्री गुलाम आहे ही मानसिकता बदलून ती स्वतंत्र मानव आहे.तिला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला.
ह्यांची सुरूवात तथागत गौतम बुद्ध ह्यांनी आपल्या संघात भिक्खुणी प्रवेश देऊन स्त्री ला ज्ञानात्मक ज्ञान ग्रहण करण्याचा अधिकार दिला होता.
दुसरीकडे वैदिक धर्म संस्कृती मध्ये मनुस्मृती श्लोकात आपणास दिसून येईल की स्त्री फक्त गुलाम आहे. तिला कश्या प्रकारे वागणूक द्यायची ते मनुस्मृती सांगीतले होते. हा फरक आहे बुध्द कालीन महिला ते वैदिक काळातील महिलांन मध्ये ,त्यामुळे आजही २१ व्या शतकात सुध्दा उच्च कुलीन सर्वण समाजातील स्त्रीला स्त्रित्वाचा हक्क प्रदान करतांना तिला अंधश्रद्धा, कर्मकांडे, पुजापाठ, व्रतवैकल्ये यामध्ये गुरफटुन ठेवले आहे म्हणून मानसिक भावनिक गुलाम करण्याचे सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.त्यांचा परिणाम आजच्या एकवीस व्या शतकात होणारया घटनेत आपल्या दिसून येते. मराठा समाजातील गंडगंज श्रीमंत राजकीय पार्श्वभूमी वैष्णवी हगवणे ही कौटुंबिक हिंसाचार ,पैशाची मागणी सासरी केलेल्या अत्याचाराची बळी पडते.

आज एकविसाव्या शतकात एकीकडे ॥ बेटी बचाव बेटी पढाव॥ हा नारा दिला जातो. तर त्याचं देशातील किती बेटिया आपल्या घरात सुरक्षित नाही ह्यांचे अनेक उदाहरणे आपणास दिसून येईल. बेटिया शिक्षण घेऊन विकल्या पण सुशिक्षित खरंच झाल्या का? आपल्या मनासारखा जोडीदार निवडतात पण आपल्या वर अत्याचार विरोधात आवाज उठवायचा प्रयत्न करतात का? का तर फक्त उच्च वर्णीय समाज, राजकीय पार्श्वभूमी, समाजातील आईवडील सासरची प्रतिष्ठा ह्यासाठी स्वतः हून आपल्या जीवनाचा बळी द्यायला तयार होतात मग ते तिच्या मृत्यू ला जबाबदार तिचा नवरा असो सासरची पैश्याच्या लालची प्रवृत्ती असलेली कुटूंबाची लोकं, सुशिक्षीत, राजकीय पार्श्वभूमी निवडलेल्या जोडीदार लग्नाचा गाजावाजा भव्यमंडप भरमसाठ लग्नाला लावलेला खर्च प्री वेडिगं शूट फक्त समाजातील लोकांना दिखाऊपणा प्रतिष्ठेसाठी प्रत्यक्षात घरातील लेकीसुनाना दिलेली वागणूक किती तफावत असू शकते. ह्यातून होणार मृत्यू खरंच स्त्रीचा शिक्षण क्षेत्रात प्रगती केलेल्या स्त्रीया जिजाऊ, सावित्री माय, रमाई यांचे आर्दश उभे न करता बेलपत्र पिडीला, वडाला धागेदोरे, हळदीकुंकु समारंभ, अनवाणी नवरात्र उपवास, बुवाबाजी आध्यात्मिक मनुवादी मानसिकता स्वतः ला स्त्रीचं त्यांत गुंतल्या जात आहे.

आधुनिक पेहराव, आधुनिक डिजीटल सोशल मिडीया, जीवनशैली स्वतः ला स्वयं घोषित स्त्रीवादी फेमिनीझम बोंबलत बसण्यापेक्षा कायदेशीर आपल्या वर होणार्या अत्याचारा बदल किती महिला निर्भीडपणे बोलतात का? आजही पुरोगामी, उच्च वर्णीय समाजातील स्त्री स्वतः ला पदराआड ठेवते तिला बोलायला सोडा कुटूंबाची प्रतिष्ठा, घर ह्यात गुरफटुन तिच्या वर होणार्या अत्याचारा बदल कुणालाही सांगू देत नाही. उच्च वर्णीय स्ती शिक्षण घेऊन शिकल्या पण वैचारिक प्रगल्भता पाहिजे त्या प्रमाणात स्वतःआणत नाही. तर दुसरीकडे आपणास दिसून येईल की आंबेडकरी वैचारिक विचारसरणी स्त्री मात्र ह्याला तेवढी बळी पडत नाही. गावातील वावरात काम करणारी असो वा उच्च सुशिक्षीत महिला असो जर तिच्या वर अत्याचार झाले तर ती तिच्या परीने त्याच्या विरोध करते.मग व्यसनी नवरा असो सासरची त्रास देणारी कुटूंब असो.समाजातील घटस्फ़ोटीत ,परित्यागा ,एकल पालकत्व महिला, अविवाहित मुली आपल्या वर होणार्या अत्याचार विरोधात रस्त्यावर उतरून यायला मागे पुढे बघत नाही. त्यांना माहिती आहे आपल्या संविधानाने दिलेले कायदेशीर अधिकार समाज, कुटूंब, गरीब श्रीमंत असो त्या आपल्या निर्णयावर ठाम राहतात. आपल्या आयुष्यातील जगण्याच्या पाऊवाटा शोधणारे पाऊल कायदेशीर कारवाई करण्यात मागेपुढे बघत नाही. खमक्या महिला मग वावरात मजुरी करणारी असो किंवा एखाद्या मोठ्या हुद्यावर असो.तिचे आत्मभान प्राप्त करून देण्याचे काम आंबेडकरी विचारतून आले आहे.ह्यामुळे आंबेडकरी विचारतून मार्गक्रमण करणारी स्त्री अश्या प्रकारे बळी पडत नाही. वैज्ञानिक वैचारिक दुष्टीने जगण्यात तिच्या असतो.

तर दुसरीकडे प्रचंड अज्ञान, कर्मकांडे, उच्च सुशिक्षीत उच्च वर्णीय स्त्री शोभेची बाहुली म्हणून समाजात आजही बघतो. सुशिक्षित कायदेशीर माहिती असूनही आपल्या वर होणार्या अत्याचार विरोधात घरच्या सांगू शकत नाही तिला एकचं सागीतले जाते आमच्या प्रतिष्ठेसाठी सगळे सहन कर पण विरोध करू नको.म्हणून त्यांची वैचारिक विचारसरणी आजही सोशीत सोशिक आहे.
म्हणून आंबेडकरी समूहातील स्त्रीने साधलेली प्रगती केवळ पुरूषांच्या भरोवशावर नसून त्यामध्ये आंबेडकरी विचारसरणी स्वतः आत्मसात केल्यात त्यांनी कर्मकांडे, अज्ञान ह्या पासून स्वतः ला दूर ठेवले.फेमिनीझम, पुरोगामी, होण्यापेक्षा मानवतावादी, वैज्ञानिक, वैचारिक दुष्टीकोन त्यांनी तथागत गौतम बुद्ध ह्यांच्या थेरीगाथा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी दिलेल्या संविधानाने दिलेले हक्क विचार हा स्त्री उध्दारचा विचार आहे.समानता, मानवता, अन्यायविरूध्द उभे राहून संर्घष करून लढण्याचा जगण्याचा विचार घेतात.

शुभांगी जुमळे

शुभांगी जुमळे ह्या शिक्षिका असून आंबेडकरी, बौद्ध साहित्याच्या अभ्यासक संशोधक आहेत.

2 Comments

Leave a Reply to मोहन शिरसाट Cancel reply

Your email address will not be published.


*