संविधान दिनी चंद्रपुरात ओबीसी जनगणनेच्या मागणीचा भव्य मोर्चा

ऍड शंकरराव सागोरे

भारतीय राजकारणातील बहुसंख्य समुदायाची मानसिक मुक्तता होण्यासाठी वैज्ञानिक विचार स्वीकारले पाहिजेत.भारतात बहुसंख्य समुदाय हा मागासवर्गीय म्हणजे वर्णव्यवस्थेतील शूद्र समाज ज्याचा नेहमी उल्लेख 85% असा अलीकडच्या काळात होत असतो.

हा 85% समूदाय शूद्र असूनही एकदूसऱ्याच्या जातिला मात्र शूद्र भेदभाव ( discriminate ) करीत असतो कारण त्याच संस्कृतित हा शूद्र समूदाय वावरत आहे आणि म्हणून 85% शूद्र असलेल्या समूदायावर 15% उच्चवर्णीय समूदाय राज्य करीत आहे मग ती न्यायपालिका असो की प्रशासनिक असो की राजनितिक असो….

15% उच्च वर्णीय समूदाय हा राज्य करण्याचे कारण की 85% मागासवर्गीय(शूद्र) समूदाय हा हजारों जाती पोट जातीत विखुरला आहे आणि आपल्या संविधानिक हक्कासाठी सुद्धा एकत्र आला नाही ही शोकांतिका आहे……..

परंतु आता संविधानिक मागासवर्गीय समूदाय ओबीसी जो 52% या देशात आहे तो जागरूक झाला आहे आणि भारतीय संविधानाचे आर्टिकल 340 समजला आहे. त्यात उच्च शिक्षित ओबीसी वकील, डॉक्टर्स वगैरे युवा ओबीसी आपल्या समूदायाला जागरूक करीत आहे कारण ती सामाजिक बांधिलकी आहे आणि तसा सामाजिक जागरूकतेचा प्रयोग संविधान दिनी म्हणजे 26-11-2020 ला चंद्रपुर या शहरात झाला….

“ओबीसी जनगणना झाली पाहिजे” या मागणीसाठी रस्त्यावरच्या आंदोलनात लाखो ओबीसी सहभागी झाले असा मोर्चा आजपर्यंत कधी झालेला नाही ही ओबीसी जागरुकता अभिनंदनीय आहे…… ओबीसी खासदार आणि आमदार यांनी सुद्धा या मोर्चाची राजनितिक, सामाजिक दखल घेतली आहे कारण त्यांचे राजकीय भविष्य सुद्धा या ओबीसी समुदायावरच टीकून आहे…52% ओबीसी समूदाय जर राजनितिक एकत्र आला तर देशाची सत्ता ओबीसीचीच राहू शकते ही भीती 15% असलेल्या समूदायात निर्माण झाली आहे परंतु मानसिक आणि राजनितिक गुलामगिरी सोडली पाहिजे…..

बहुसंख्य असलेल्या ओबीसी समूदयासोबत, आंबेडकरवादी, SC, ST, मुस्लिम वगैरे 85% समुदाय राजकीय एकत्र होण्याची शक्यता आहे आणि तसे झाल्यास भारतात बहुसंख्य असलेल्या समुदायाची राजनितिक,न्यायिक आणि प्रशासनिक सत्ता राहील यात मुळीच संशय नाही …..

ऍड शंकरराव सागोरे

लेखक महावितरण येथील निवृत्त अधिकारी असून चंद्रपूर येथे वकिली करतात, तसेच ते VBA चे जिल्ह्याचे कायदेविषयक सल्लागार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*