भीमा कोरेगाव चित्रपटाचा वाद निर्माता – लेखकाने सामंजस्याने सोडवावा

राहुल पगारे

भीमा कोरेगाव हे वैभव, शौर्य आणि अद्वितीय धैर्याचे प्रतीक आहे जे आपल्या पूर्वजांनी आपल बलिदान देऊन आम्हाला दिले आहे. १८१८ मध्ये आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य इतर कोणत्याही प्रकारच्या स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे. या स्वातंत्र्याने क्रांतिकारक महात्मा फुले, महान शूर शाहू महाराज आणि राष्ट्र निर्माण करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जन्म दिला. या सर्वांनी ५०० मैलांचा प्रवास करून हिवाळ्यातील लढाई पेशव्यांच्या २८,००० इतक्या प्रचंड सैन्याचा पराभव करणाऱ्या ५०० अवेंजर्स कडून प्रेरणा घेतली आहे.

पीरियड मूव्ही ही एक अशी गोष्ट आहे जी लोकांना त्या विशिष्ट कालावधीसह आणि त्या घटनेसह माहिती होणे गरजेचे आहे. म्हणून, त्याच ऐतिहासिक पार्श्वभूमीवर चित्रपटाची निर्मिती करणे आणि हस्तलिखितांकडून स्निप्पेट्स (snippets) गोळा करणे हे एक अवघड काम आहे आणि जो कोणी एवढं महत्वाचं आव्हान पेलतो त्याला साहजिकच समाजाकडून मानसन्मान मिळतो. एवढेच नाही तर या चांगल्या कार्याला प्रोत्साहन देण्यातही आम्ही सुद्धा अभिमान बाळगतो.

परंतु जेव्हा आपण आगामी चित्रपटाबद्दल, भीमा कोरेगावची लढाई ह्या चित्रपटाबाबत याबद्दल बोलतो तेव्हा चित्रपट निर्मितीपूर्व होत असलेले वाद दुर्लक्षित करता येणार नाही. ते वाद अरुण शिंदे आणि दिग्दर्शक रमेश थेटे यांच्यात सुरू असून ते आता सर्वश्रुत झाले आहेत. अरुण शिंदे चित्रपट व दूरदर्शन या पार्श्वभूमीचे आहेत तर दिग्दर्शक रमेश थेटे हे सेवानिवृत्त सनदी अधिकारी असून त्यांनी मध्य प्रदेश केडरची सेवा केली आहे.

चित्रपटाचा वाद असलेला मुद्दा इतका शुल्लक आहे तरी सुद्धा दिग्दर्शक आणि लेखक दोघेही खासगीत समस्या सोडवण्याऐवजी सोशल मीडियावरून भांडत आहेत. त्यांच्यातील वादाचे काही मुद्दे आपण खालील videos मध्ये पाहू शकता.

या दोघांनाही ठाऊक असले पाहिजे की देश अजूनही आपल्याकडे एक संपूर्ण समुदाय म्हणून पाहत आहे, म्हणून जर ते दोघेही शुल्लक मुद्द्यांवरून भांडत असतील तर ते केवळ स्वत: ला मूर्खासारखेच नव्हे तर संपूर्ण समाजाला एक प्रकारे ह्या प्रकारे त्यांच्या वागण्याने चर्चेचा विषय बनवत आहेत. त्यांनी एकमेकांशी स्पष्ट संवाद साधणे आणि लोकांसमोर शक्य तितक्या लवकर सामोपचाराने भूमिका मांडणे शहाणपणाचे ठरेल.

सामाजिक कार्य हे अभिमान आणि पूर्वग्रह (pride and prejudice) यांचे सिंहासन आहे, परंतु आपल्या लोकांना जातीय सलोखा निर्माण करण्यापेक्षा पूर्वग्रहात अधिक रस आहे. बर्‍याच दिवसांनंतर आपल्या स्वतःच्या लोकांनी बनविलेल्या आपल्या इतिहासाविषयी एक चित्रपट आपल्याला दिसतो. परंतु सोशल मीडियावर एकमेकांना खाली खेचणे आणि आपण एकमेकांपेक्षा मोठे कसे आहे हे जगाला दर्शविणे हा मूर्खपणाशिवाय काहीही नाही!

एक समुदाय म्हणून, आम्ही आपणास दोन्ही कर्तृत्वाने मोठ्या व्यक्तींना विनंती करतो की प्रौढ व्यक्तीसारखे प्रश्न सोडवावेत आणि एक गोष्ट जी आपण कधीही विसरू नये, लोक सर्व काही पाहत आहेत.

बरेच तरुण आपल्या स्वत: च्या बांधवांकडून मोठ्या स्क्रीनवर चित्रपट निर्मितीची जादू पाहण्याची प्रतीक्षा करीत आहेत. ते तुम्हा उभयंतांकडे बऱ्याच आशावाद ठेऊन पहात आहेत. जर ह्याच प्रकारची प्रदर्शन होत राहील तर बरेचसे होतकरू तरुण जे ह्या चित्रपट क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना ते नकारात्मक पणे प्रभाव टाकू शकत. त्या साठी आपण दोघांनी स्वतः एक आदर्श निर्माण करणे अपेक्षित आहे.

शेवटी, जर चित्रपटाने इतिहासाशी योग्य न्याय दर्शविला असेल तर आम्ही आपल्याला खात्री देतो की आम्ही चित्रपटाला 100 कोटी क्लब किंवा त्यापेक्षा मोठ्या क्लबमध्ये घेऊन जाऊ, परंतु तसे न झाल्यास आपल्या समूदायाच्या तसेच समूदायाच्या बाहेरील टीकेचे स्वागत करण्यास तयार असावे. शुभेच्छा!

राहुल पगारे

लेखक हे Digital Marketer असून Writopreneur चे संस्थापक आहेत जी Content creation agency आहे आणि ते web articles, blogs, seo optimized content, social media creatives, whitepapers इत्यादी कामे करतात.स्वतःच्या फ्री वेळेत त्यांना पुस्तक वाचन, गायन, कुत्र्यासोबत खेळणं, ऑमलेट/Maggie बनवणं आवडत.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*