महेंद्र शेगांवकर
बुध्द काळात पदार्थाची अंतिम अवस्था अणू आहे असेच समजत असत. लोकायत चार्वाक, सांख्य, न्यायवैशेषिक हेच मांडत असत. पण तो विषय तथागतांचा नव्हताच…..तर त्यांचा विषय मानवी दुखः हाच होता.

तेव्हाचा अणू म्हणजे आजचा अणू असू शकत नाही… कारण अणूचे आकारमान साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाही …आपल्या मानवी डोळ्यांना ४५०० ते ७५०० अँग्नास्ट्राम असणारे आकारमानच दिसते …अणूचे आकारमान फक्त १ अँग्नास्ट्राम असते, आपणास ते सूर्य प्रकाशामुळे दिसते, त्या सूर्यप्रकाशाची लहरलांबी हीच ४५०० ते ७५०० अँग्नास्ट्राम असते म्हणूनच त्यापेक्षा लहान आकारमान साध्या डोळ्यांनी दिसतच नाही. या अभ्यासाअंती हे लक्षात येते की तत्कालीन लोक पदार्थाच्या लहानात लहान कणांना अणू म्हणत असावेत, त्यांचा अणू हा हल्लीचा अणू असू शकत नाही फारच तर तो रेणू असावा.त्या रेणूचे विभाजन होऊन ते अणूपासुन बनले हे 19 व्या शतकात शास्त्रज्ञांना समजले. ग्रीकांचाही अणू हा रेणूच असावा.

क्वार्क चा अंतिम कण ” हिग्ज बोसान पार्टिकल ” आहे हे आज समजलेय…
अणूचे आकारमानच १ अँग्नास्ट्राम असते …तर प्रोटॉनचे आकारमान कितीतरी पट सुक्ष्म असते,क्वॉर्क तर त्यांच्यापेक्षाही सुक्ष्म असते, तर हिग्ज बोसान पार्टिकल अब्जोपट सुक्ष्म असणार…!
हे पदार्थाचे अंतिम सुक्ष्म कण डोळे बंद करून अनुभूती जोरावर बघता येतील काय ?
माझ्या मते मानसिक अनुभूतीला मर्यादा आहेत… भावभावनांचे विश्लेषण अंतर्मुख होऊन करणे हाच विषय विपश्यनेचा आहे असे मला वाटते … !
~~~
महेंद्र शेगांवकर हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्याचप्रमाणे बुद्ध, संस्कृती, इतिहास याचे भाष्यकार आहेत

Leave a Reply