भीम मोत्याचा हार गं माय
भीम नंगी तलवार गं माय
भीम काळजाची तार गं माय
भीम निळाईच्या पार गं माय
गुलामीने हाल हाल केले
मूकनायकाचे डोळे ओले
त्याचे मनूच्या छातीत भाले
भीम हत्ती सारे रान हाले
भीम विचाराला धार गं माय
भीम रक्तात भक्तात आला
देव केले त्याला जाया केला
जातीपातीत कोंडले त्याला
नव्या मनूचा विषारी घाला
भीम मुक्तीचा दार गं माय
भीम निळाईच्या पार गं माय
होते कलम कसाई लाख
भीम खोट्यांची करितो राख
त्याने पाचर ठोकली अशी
साऱ्या वैऱ्यांना भीमाचा धाक
भीम जळता अंगार गं माय
भीम निळाईच्या पार गं माय
भीम सूर्याची वात गं माय
जाळे अंधारी रात गं माय
भीम समतेचा हात गं माय
भीम ममतेची थाप गं माय
त्याचे लाख उपकार गं माय
लाख लाख उपकार गं माय
भीम निळाईच्या पार गं माय
~~~
कवी: नारायण पुरी
सौजन्य: youtube
- तंगलान (Thangalaan) – निवडक रिव्ह्यूस - September 21, 2024
- छ. शाहू महाराजांवर संपादित पुस्तकासाठी लेख पाठवण्याचे आवाहन. - May 18, 2023
- ब्राह्मणी माध्यम प्रायोजित “नव – दलित” नरेटिव्हची समीक्षा – खुले चर्चासत्र - April 13, 2023
Leave a Reply