महामाता जिजाऊ यांचं स्वराज्य उभारणीतील अमूल्य योगदान

प्रा. प्रेम चोकेकर

जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेडराजा (जिल्हा – बुलढाणा) येथे झाला. लखूजी जाधव हे त्यांचे वडील.

1610 साली देवगिरी येथे शहाजी राजांशी त्यांचे लग्न झाले. तेव्हा त्यांचे वय होते 12 वर्षे. शहाजी राजांचे वय होते 16 वर्षे.

शहाजी राजांचा जन्म 18 मार्च 1594 रोजी झाला होता. वेरूळच्या राजे मालोजीराजे भोसले यांचा शहाजी हा पुत्र. शहाजीराजे आदिलशाहीत सेनापती होते. अहमदनगरचा सुलतान निजामशहाकडून त्यांना पुणे व सुपे जहागीर म्हणून ‌मिळाले. मुघल बादशहा शहाजहान याला दख्खन जिंकून घ्यायला त्यानी मदत केली.

सन 2002 साली जेम्स लेन याने ‘A Hindu King in Islamic India’ हे पुस्तक लिहून त्यात जिजाऊंची बदनामी केली. “शिवाजी महाराजांचा जन्मदाता शहाजी राजे नसून दादू कोंडदेव हा आहे” असं लिहून जेम्स लेनने जिजाऊंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून त्यांची बदनामी केली. 2002 साली याविरोधात प्रथम मीच दैनिक सम्राट मधून लेख लिहून जेम्स लेन व प्राच्य विद्या विद्वानांवर हल्ला चढविला.

जेम्स लेन हा अमेरिकेच्या मिनीसोटा विभागातील मॅकलेस्टर काॅलेजच्या ‘धर्म आणि भारतीय संस्कृती’ विभागाचा प्रमुख होता. तो 1986 पासून नियमितपणे अभ्यासासाठी भारतात येत असे. भांडारकर प्राच्यविद्या संस्था हे पुण्यातील एक प्रसिद्ध ब्राह्मणी संशोधन केंद्र. श्रिकांत बहुलकर, वा. ल. मंजूळ, सुनिता नेने, सुचेता परांजपे, वाय. बी. दामले, रेखा दामले, भास्कर चंदावरकर, ए. आर. कुलकर्णी, जयंत लेले, दिलीप चित्रे हे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्राचे संचालक मंडळ. त्यांनी जेम्स लेनला जीजाऊची बदनामी करणारं पुस्तक लिहायला मार्गदर्शन केले. पुण्याच्या चितळे मिठाई वाल्याने तर जेम्स लेनला आपला जावई बनवून घेतले. ‘वसुधैव कुटुंबकम’ दुसरं काय?

जिजाऊ स्वत: शिक्षित होती. प्रशिक्षित होती. पिता लखूजी जाधव यांच्या तालमीत ती तयार झाली होती. शिवरायांस व त्यांच्या सवंगड्यांस शस्त्रे शिकविली. त्यांना तलवारबाजी, दांडपट्टा चालविण्यात निपुण बनविले. घोडेस्वारी मध्ये तरबेज केले.

दादू कोंडदेव कुलकर्णी हा शिवरायांचा गुरु नाही. तो आदिलशहाचा नोकर होता. मोकाशी होता. त्याला शस्त्रज्ञान नव्हते. एका गुन्ह्या संबंधाने आदिलशहाने त्याचा उजवा हात तोडला होता. त्याने 7 मार्च 1647 रोजी विषप्राशन करून आत्महत्या केली. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला जिजाऊ शिवरायांचा गुरु म्हणून नेमणूक करणे शक्य नाही. ब्राम्हणी इतिहासकारांच्या सवयीप्रमाणे त्यानी शिवरायांच्या डोक्यावर दादु कोंडदेव कुलकर्णी या ब्राम्हणाला ठेवून ब्राम्हण श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु ती भाकडकथाच होय. थोडक्यात जिजाऊ याच शिवरायांच्या गुरु होत! ‌

जिजाऊने शिवरायांना नीतीमान बनविले. धैर्यशील व न्यायी बनविले. अन्यायाविरुद्ध मनात चीड निर्माण ‌केली. धर्मनिरपेक्ष बनविले. खंबीर व लढाऊ‌ बनविले. महत्त्वाकांक्षी बनविले. आत्मसमान‌ शिकविला. आत्मभान दिले.

जिजाऊने शिवरायांना युद्धशास्त्र शिकविले. युद्धनीती शिकविली. मुत्सद्दीपणा शिकविला.

शिवराय आग्र्याला नजरकैदेत असतांना व परत स्वराज्यात येईपर्यंत, तसेच जेव्हा जेव्हा शिवराय स्वारीवर जात असत अशा सर्व वेळी जिजाऊने स्वराज्याचा कारभार पूर्ण ताकदीनिशी सांभाळला!

एका प्रसंगी पिसाळलेला हत्ती पकडण्यासाठी दोन पथके तयार केली गेली. लखोजीचा मुलगा दत्ताजीराव जाधव आणि शहाजी राजांचा भाऊ सरफोजी यांच्यात भांडण झाले. त्यात संभाजी भोसले यांनी दत्ताजीरावाला ठार केले. लखोजी जाधवास हे‌ समजताच त्यांनी संभाजी भोसले यांस ठार केले. हे शहाजी राजांस समजताच ते सास-यावर चालून गेले. त्यात शहाजी राजांच्या दंडावर वार झाला. यानंतर जिजाऊने माहेरशी संबंध तोडले. यातून जिजाऊंचा खंबीरपणा व कणखरता स्पष्टपणे व्यक्त होते!

24 सप्टेंबर 1639 रोजी शहाजीराजांनी स्वत:ची राजमुद्रा तयार केली. भगवा ध्वज घेतला. शिवरायांच्या स्वराज्याचा पाया अशा प्रकारे घातला गेला. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जिजाऊंची साथ होती. अशा प्रकारे स्वराज्याचा हा‌ संकल्प शहाजी राजे, जिजाऊ व शिवाजीराजे यांच्या कठोर परिश्रमातून साकार झाला.

शिवरायांनी आपल्या वृद्ध मातेसाठी रायगडाच्या पायथ्याशी ‌असलेल्या पाचाड या गावी अडीच एकरावर महाल बांधला. आजही त्याचे अवशेष शिल्लक आहेत. हा महाल बौद्ध (पूर्वाश्रमीचा महार) वस्तीच्या मधोमध आहे.

रायगडाच्या पायथ्याशी पाचाड मध्ये जिजाऊंची समाधी आहे. ती सुद्धा बौद्ध वस्तीतच आहे.

वरील दोन्ही वास्तू जिजाऊंचे बौद्ध असण्याचे पुरावे आहेत असं म्हणता येईल.

23 जानेवारी 1664 रोजी घोड्यावरुन पडून झालेल्या अपघातात शहाजीराजांचा मृत्यू झाला. जिजाऊंवर आकाश कोसळले. परंतु जिजाऊ खणून गेल्या नाहीत. या प्रसंगी जिजाऊ सती जात नाहीत. ब्राम्हणी परंपरेशी काही संबंध नसल्याचाच हा पुरावा होय. उलट अब्राम्हणी बौद्ध परंपरेशी जिजाऊंचा घनिष्ठ संबंध दिसून येतो.

जिजाऊंचे वडील लखूजी जाधव हे सिंदखेडराजा या गावचे. आज सिंदखेडराजा इथे जाधवांची 22 घरे आहेत. आणि ते सर्वच्या सर्व बौद्ध आहेत. ही गोष्ट लखूजी जाधव हे बौद्ध असल्याचा निर्देश करतात.

स्वराज्य निर्माण करुन त्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावणा-या या महामातेचं 17 जून 1674 रोजी निधन झाले.

आज जयंती निमित्त या महामातेला विनम्र अभिवादन!!

प्रा. प्रेम चोकेकर

लेखक सामाजिक कार्यकर्ते असून BASERI (Dr Babasaheb Amebdkar Social and Educational Research Institute) चे संस्थापक आह

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*