नामांतर: सामाजिक परिवर्तनाची लढाई

शाम तांगडे


“मराठवाडा विद्यापीठ” चा नामविस्तार होऊन “डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ” असे नामांकन करण्यात आले. महापुरुषांच्या नावाने जगात अनेक वास्तू आहेत. नामांकनाची ही प्रथा जागतीक स्तरावर रुढ झालेलेली आहे. आपल्या भारतात देखील अनेक महापुरुषांच्या नावाने अनेक वास्तू आहेत. परंतू मराठवाडा विद्यापीठाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे यासाठी जो लढा द्यावा लागला, प्रचंड संघर्ष करावा लागला, सामाजिक स्तरावर अत्यंत हिंसक जाती युद्ध होऊन सरकारी नामांतराच्या ठरावाला १६ वर्षे आमलापासून रोखण्यात आले.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतातीलच नव्हे तर समग्र ज्ञानजगतात अग्रनी विद्वान म्हणून मान्य असलेले व्यक्तित्व. या नावाला सामाजिक पातळीवर लोकझूंडीतून विरोध राजकीय व्यवस्थेने मॅनेज केला. हा नामांतराचा लढा सामाजिक परिवर्तनाची लढाई म्हणून १६ वर्षे लढला गेला.

महापुरुषाच्या नावांने नामांतराच्या इश्युवर जगातील हा एकमेव व नाविन्यपूर्ण लढा म्हणून नोंद झाली. या संघर्षांतून भारतीय समाजमनात जाती विकाराची भावना किती हिंसक आहे याचा जगातील लोकांना परिचय झाला.

मराठवाडा विद्यापिठाचे दोन विभाग करुन परभणी हिंगोली नांदेंड लातूर जिल्ह्या साठी एक स्वतंत्र विद्यापिठ निर्माण केले. याला स्वामी रामानंद तिर्थ यांचे नाव देण्यात आहे या नावांला सामाजिक स्तरावर कुणीही विरोध केला नाही अथवा भावनीक समर्थनही केले नाही. परंतू डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध फारच आक्रसताळे पणाने करण्यात आला. हजारो वर्षांपासून जातीच्या डंबक्यात सडत असलेले समाजमन किती हिंसक असते हे मराठवाडा विद्यापिठ नामांतर लढ्यांने दाखवून दिले. आंबेडकरवाद्यांच्या अनेक जीवांना शहीद व्हावे लागले. अनेक घरदारं अग्नीत भस्म करण्यात आले. पोचिराम कांबळे, जनार्दन मेवाडे यांना आपल्या जीवाची बाजी लावावी लागली. पोलिस अधिकारी भूरेवार यांना जाळण्यात आले. इतकी मोठि प्रचंड किमत्त मोजून “डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ” चा नामविस्तार झालेला आहे.
शहीदांना त्रिवार अभिवादन व नामविस्ताराबद्दल सर्व जनतेला मंगलमय सदिच्छा !!!

~~~

शाम तांगडे यांचेकडून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*