सुरेखा पैठणे
नामदेवा तूच खरा कवितेचा प्रियकर
नामदेवा तूच खरा कवितेचा प्रियकर
तूच खरा मानवतेचा धरोहर।
तू दिलेस नवनवे शब्द ह्या मराठीला आंदण
अन ही रांडव मराठी पुन्हा सवाष्ण झाली..
गावकुसाबाहेरचा अंगार ओतला पानापानात
अन इथला पांढरपेशा समाजात भरली धडकी…..
साहित्यिक म्हणून तुला बाजूला काढण्याचे झाले प्रयन्त पण त्या सार्यांना तुझी कविता पुरून उरली
माणसांच्या निबिड जंगलात डरकाळी फोडणाऱ्या ढाण्या वाघा
तू माणसाने माणसासाठी गायलेले आदीमगीत गात राहिलास..
तसे मला नामदेव च्या आधी मल्लिका भेटली तिच्या ‘मला उध्वस्त व्हयाचय’ या आत्मचरीत्रातुन,
तिच्या बर्याच कवितातुन ती उजागर करीत राहिली माझ्या मनावर तीचे बाईपण,
अन त्या पागोळयातून नामदेव निथळत राहिला माझ्या मनाच्या तावदानवर.
राग राग धुमसत राहीला त्याच्याविषयी।
मग हळूच कधीतरी गोलपीठा अंगावर ओढून घ्यायचा प्रयत्न केला पण नाहीच झेपला
मग वय वाढले तसा पुन्हा प्रयत्न केला
तसतसे थोड़े थोड़े तो आकळू लागला।
अजुनही कुठे पुरता उलगडतो तो ।
जिथे आमच्या पांढरपेशी विचारकल्पना थांबतात तिथून पुढची पायरी म्हणजे ढसाळ ।।
ढसाळ म्हणजे एक विद्यापीठ ।
आमच्या रक्तात पेटवलेस तू तुझे अगणीत सूर्य।।
हे महासुर्या तुला विनम्र अभिवादन ।।
मुंबईच्या प्रियकरा तुला विनम्र अभिवादन
सुरेखा पैठणे
- बाबासाहेबांची प्रिय रामू, आमची रमाई! - May 27, 2021
- तेव्हा सखे सप्रेम जयभीम! - April 13, 2021
- महाडचा संगर केवळ पाण्यासाठी नव्हे तर मूलभूत मानवी हक्कांचा संगर - March 20, 2021
नामदेव ढसाळ म्हणजे ऊर्जा देणारे रसायन,अप्रतिम मांडणी सुरेखा जी🙏🙏🙏