बाबासाहेबांची प्रिय रामू, आमची रमाई!

सुरेखा पैठणे मानवीय सुखदुःख भोगून, करूणेच्या परमसीमा स्पर्शून ज्या महामानवांचे आयुष्य आज आदर्शवत झाले त्यात माता रमाई ही येते. पोटच्या चारही लेकरांना मातीआड लोटून जी साऱ्या उपेक्षितांची माय झाली, जिने संसार नावाचा गड खऱ्या अर्थाने एकटीने राखला अन मूर्तिमंत त्यागाचं लेणं लेऊन जी आपल्यातून निघून गेली ती आमची माता रमाई […]

तेव्हा सखे सप्रेम जयभीम!

सुरेखा पैठणेे प्रिय मैत्रिणी… आमच्यावर लादलेल्या अज्ञानाला विज्ञानाने दूर सारून, वैचारिक पुस्तकांचा दिवा जाळून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पेरून १४ एप्रिल हा दिवस साजरा करतो… खरे तर हा दिवस एक आमच्या माणूस म्हणून गणल्या जाण्याचा दिवस. आमच्या माय मावशीने गावात एखादं नवं लुगडं घातलं तरी गावातील पाटलीनीच लुगडं चोरीस […]

महाडचा संगर केवळ पाण्यासाठी नव्हे तर मूलभूत मानवी हक्कांचा संगर

सुरेखा पैठणे कित्येक शतके उलटली तरी ह्या पवित्र भारतभूमीवर अस्पृश्य आणि स्त्रिया यांची गणती माणसात होत नव्हती. किडा मुंगीला साखर घालणारा हा धर्म, पशु पक्ष्यानं दाणे घालणारा हा धर्म, पाण्यावर जातीची अन धर्माची वेटोळे घालून बसला होता. ‘पाणी वाढ वो माय’ म्हणत अस्पृश्य म्हणवल्या जाणाऱ्या अठरापगड जातीतील (केवळ महार नव्हे) […]

काळयाकुट्ट रात्रीतील धगधगती मशाल, सावित्रीमाई!

सुरेखा पैठणे जिच्या जन्म घेण्याने मी जागतिक पातळीवर साजऱ्या होणाऱ्या महिलादिनासोबत स्वतःला जोडू शकले, त्या सावित्रीबाई फुले ह्या रणरागिणीचा आज स्मृतिदिवस. पतीच्या कार्यात स्वतःला झोकून देऊनही स्वतंत्र मशाली सारखी पेटून उठलेले हे व्यक्तिमत्व. एखाद्या झुंजार लढाऊ सैनिकासारखाच मृत्यू हि. भारतातील मूलगामी समस्यांना वाचा फोडण्यात अवघी हयात खर्ची घातली. विधवा विवाह, […]

मी थेट आदिम स्त्री जिचे प्रश्न ही आदिम आहेत

सुरेखा पैठणे महिला दिनाच्या उरूस गाजवणाऱ्या तमाम मैत्रिणींनो, ज्याकाळात तुमच्या अक्षरांच्या अळ्या होऊन तुमच्या घरातील पुरुषांच्या ताटात जात होत्या न त्याकाळात काळाच्या पलीकडे जाऊन महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले आणि तिच्या जोडीने फातिमा शेख ह्या तुमच्यासाठी अंगावर दगड झेलीत होत्या। त्यांच्यावर दगड उचलणारे हात कोणाचे होते त्यांचे आडनाव सांगितले न […]

म्हणून माझे प्रश्न तुझे प्रश्न वेगळे ठरतात।

सुरेखा पैठणे “आम्ही स्त्रीया म्हणून सारख्याच शोषित आहोत, आम्ही स्त्रिया पददलित आहोत आमचे प्रश्न सेमच असतात।” अग माझे राणी, पण जेव्हा तू तुझी जात , कुळाचार, व्रतवैकल्ये सांगते,जेव्हा तू सरस्वती हीच विद्येची देवता आहे असे सांगते।अग हे झोपडपट्टी त राहणारे न असेचअग हे जयभीमवाले न असेचअग ह्यांच्यात न असेच सगळं […]

तरीही महात्मा फुले केवळ समाजसुधारकच…

सुरेखा पैठणे कार्ल मार्क्स आणि लेनिन ला गवसणी घालून येणारा भारतीय समाज आणि जगातील सगळा कामगार एक आहे अशी हाकाटी घालणारा समाज आपापले आठ तासाचे काम संपल्यावर त्याच्या जातीची झुल पांघरून निवांत सांगत बसतो महत्व इथल्या सनातन परंपरेचे. तेव्हा नाभीकांचा संप घडवून आणणारे महात्मा फुले पडून असतात इतिहासाच्या एका पानावर, […]

भारत नावाचे अवकाश पुन्हा हिंदुस्थान नावाच्या खाईत हरवू नये..

सुरेखा पैठणे “We the people of India” ह्या पहिल्याच वाक्यात तुकड्या तुकड्यात खंडित झालेल्या आणि गुलामगिरीच्या ओझ्याने वाकलेल्या ह्या हिंदुस्थानमधील प्रत्येक नागरिकाला “भारत” नावाचे स्वतंत्र अवकाश बहाल केले, २६ जानेवारी ला लोकांनी लोकांकरिता चालविलेले लोकतंत्र म्हणत प्रजासत्ताक भारत अस्तित्वात आला आणि मानविय मूलभूत हक्क संवैधानिक चौकटीत सुरक्षित झाले. शेकडो वर्षांची […]

नामदेवा तूच खरा कवितेचा प्रियकर

सुरेखा पैठणे नामदेवा तूच खरा कवितेचा प्रियकरनामदेवा तूच खरा कवितेचा प्रियकरतूच खरा मानवतेचा धरोहर। तू दिलेस नवनवे शब्द ह्या मराठीला आंदण अन ही रांडव मराठी पुन्हा सवाष्ण झाली..गावकुसाबाहेरचा अंगार ओतला पानापानातअन इथला पांढरपेशा समाजात भरली धडकी…..साहित्यिक म्हणून तुला बाजूला काढण्याचे झाले प्रयन्त पण त्या सार्यांना तुझी कविता पुरून उरलीमाणसांच्या निबिड […]

हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा नव्हे तर जिजाऊंनी पाहिलेले ज्वलंत स्वप्न

सुरेखा पैठणे 13 व्या शतकात यादवांचा पराभव करून अल्लाउद्दीन खिलजीची सत्ता दक्खन म्हणजेच महाराष्ट्र प्रांतावरही झाली आणि तिच्यात ही बंड होऊन बहामनी अर्थात हसन गंगू ह्या पूर्वी ब्राम्हणाच्या पदरी गुलाम असलेल्या आणि तत्कालीन सुल्तानाविरोधात बंड केलेल्या अमिराचे शासन सत्तेत आले। ह्या बहामनी शासकांनी यादवांच्या काळात थोडी सैल असलेली धर्मसत्ता अधिक […]