बा भीमा तुला वाचलं नसतं तर…

अक्षय छाया

बा भीमा इथल्या मनूवादी  विषमतेच्या भेगावर समतेची मुळाक्षर कोरणारा तु आठवतोस तेंव्हा होतो नव्या युगाचा जन्म…या नव्या आधुनिक युगाचा पाया आहेस तु… इथल्या वर्चस्ववादी पितृसत्ताक व्यवस्थेला दिलेली सणसणीत चपराक आहेस तु …गरीब जणांचा, तळागाळातील  शेवटचा आवाज आहेस तु… आदिवासी, दिन-दलित, शोषित भटके विमुक्त, तृतीयपंथी इथल्या प्रत्येक स्त्री चा मुक्तिदाता त्यांचा सन्मान आहेस तु…प्रेम, मैत्री, करुणा, समता, बंधुभाव या तव्हांची शिकवण आहेस तु… तु ब्रह्मांड आहेस आमचा…. अनेक दिशाहीन आभाळाला सामावून घेणारा आमचा सूर्य आहेस तु…. माझ्या लिखाणा मागचा प्रत्येक शब्द आहेस तु…कारण खरंच बा भीमा एक तुझ्यामुळे आणि दुसरा त्या क्रांतीज्योती मुळे हातात लेखणी पकडायला शिकलो. जेंव्हा जेंव्हा तुझ्या फोटो कडे बघतो  तेंव्हा तेंव्हा मन भरून येतं अन डोळे पानावतात आणि आठवतो मी मला पुन्हा नव्याने…

खरच तुला वाचलं नसतं तर कुठेतरी सडत असतो आज एखाद्या दगडा ला शेंदूर फासत आणि बौद्धिक कुवतिच नसलेला माज करत मानत राहिलो असतो कथा, पोथी, पुराणं, कर्म, कांड.

अगोदर वस्तीत तुझा पुतळा दिसला की मस्तकात शिरायचाच तु, कारण साला या सडलेल्या जातीयवादी मानसिकतेनं घडलवलंच तस होतं  पण आता तो दृष्टीकोन बदललाय नव्यान बघतोय तुला समजून घेतोय  कारण आता कळतोय ना रे Freedom of mind चा अर्थ  आणि लिहायला लागलोय आता… 

कारण बा भीमा भीम नगरात  जन्मावा इतका भाग्यवान नव्हतो रे मी…. पण आता तु सोबत असणार आहे कायम अगदी मरणापर्यंत….आता तुझा जय भीम उरात घेऊन जगतोय आणि लढतोय, कुटूंबाशी, जातीय वाद्यांशी,कारण तोच जय भीम बळ देतोय लढायला, जगायला कारण आता तु खुप जवळचा वाटतं आहेस अगदी स्वतः च्या बापा पेक्षा सुद्धा…cultivation of mind चा अर्थ पोहोचतोय Buddha and his Dhamma सोबत… आणि आता जेंव्हा तुझं Philosophy of Education वाचायला घेतो तेंव्हा कळतं हळूहळू तुझ्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणन्या मागची तळमळता… आता वस्तीत उभा राहून तुझ्या पुतळ्याकडे बघतो तेंव्हा आठवतात संविधानातील सुवर्ण अक्षर… कारण आता कळायला लागलं ना रे थोडफार…त्यामुळे घरी परत जाऊन प्रचंड अभिमानाने ठळक कोरतो ग्रेगरियन कॅलेण्डरमधील *14- एप्रिल* हि तारीख…!! 

अक्षय छाया

लेखक – टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायंन्स, मुंबई या संस्थेत दलित, ट्रायबल स्टडीस अँड ऍक्षण याविषयामध्ये मध्ये पदव्युत्तर पदवी चे विद्यार्थी आहे

2 Comments

  1. Bahut sahi likha hain na bhai. पुतळा दिसल्यावर आजही अनेकांच्या मस्तकात आग जाते.par wo kehte hain na kisise itni bhi nafrat na karo ki pyar ho jaye.vaise tuze baba bhimrav ji se pyar hua abhi.aisawala pyar jo kabhi tut nahi sakta.

Leave a Reply

Your email address will not be published.


*