आकाश अनित्य
21 व्या शतकात देखील मुंबईसारख्या महानगर असलेल्या शहरात जातीवाद छुप्या पद्धतीने कसा समाजाला पोखरतोय याच जीवंत उदाहरण मी स्वतः अनुभवलं आहे. साधारण दहावर्षांपूर्वीची ही गोष्ट. जातीवाद जितका जातीयता वर्णव्यवस्था निर्माण करणार्या ब्राम्हणांनी जोपासला नसेल तितका क्षत्रिय वैश्य वर्णांमध्ये येत असलेल्या जातीय लोकांनी जोपासला आहे. एखादा ब्राम्हण किंवा त्याच कुटुंब हे तुम्हाला जवळीक करु शकतो तितका त्याच्या खाली येणाऱ्या तत्सम सवर्ण जाती तुम्हाला स्वीकारण्यास तयार नसतात. याचा अर्थ ब्राम्हण गुन्हेगार नाहीत असा नाही कारण ज्या पद्धतीने ब्राम्हनाणी वर्ण जाती निर्माण केल्या त्याच पद्धतीने त्या नष्ट करण्यास ब्राम्हण पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे ही समाज व्यवस्था निर्माण करण्यात ब्राम्हण हा मूळ गुन्हेगार आहे.
2008 साली मी central govt. Emplyoee म्हणून रुजू झालो. काम करत असताना कार्यालयात नवीन मित्र मिळाले त्यातील एक फारच जवळचा झाला तो राहायला ही कामाच्या जवळच बरेच दा त्याच्या घरापर्यंत चालत जायचो आणि तिथून बस पकडून घरच्या प्रवासाला निघायचो.
मी कधी त्याच्या घरी जावं किंवा तु मला घरी का नेत नाहीस अस कधी विचारले नाही तशी अपेक्षाही मनात नव्हती… त्या मित्रालाच काय झाले माहीत नाही त्यानेच एक दिवस विषय काढला आणि मला एकदाच सांगून टाकले ‘माझ्या आईला जयभीमवाले आवडत नाहीत’ कदाचित माझ्या आणि त्याच्यामध्ये मैत्रीचा जो बंध निर्माण झाला होता त्या दबावात त्याने कदाचित ही खंत व्यक्त केली असावी…त्यावेळी मी काहीच बोललो नाही फ़क्त एक स्मितहास्य देऊन मोकळा झालो… पण त्याने सांगितलेली त्याच्या आईची ती भूमिका पटली नव्हती, मनात इतकाच विचार होता की ही नवीन पिढी नक्कीच या सर्व जाती धर्माच्या पलीकडे असेल कारण आईला जयभीमवाले आवडत नाहीत हे माहीत असूनही त्याने माझ्या सोबत घट्ट मैत्री केली होती. त्यामुळे मी त्याच्या बाबतीत बराच आशावादी होतो.
आजही आम्ही मित्र आहोत जात-वर्ण-धर्म यावर चाललेल्या चर्चांमध्ये तो मला लक्ष देऊन ऐकत असतो समर्थन देत असतो… शिवरायांचे गुरू रामदास, जेम्स लेन प्रकरण या बद्दल त्याला अपुरी माहिती होती ती मी त्याच्याशी नीट चर्चा करून शिवरायांचे खरे गुरू कोण,जेम्स लेन काय प्रकरण आहे हे पटवून दिले…
आमच्या मैत्रीला 5 वर्ष झाल्यानंतर एक दिवस तो मला घरी घेऊन गेला त्याच्या घरी जात असताना मी त्याला आठवण करून दिली अरे तुझ्या आईला जयभीमवाले आवडत नाहीत ना? त्याने सुद्धा त्यावेळेस स्मितहास्य देऊन विषय संपवला, घरी गेल्यानंतर त्याच्या आईनेच मला ग्लासभर पाणी दिले 15 ते 20 मिनिट त्या माझ्याशी बोलल्या… हा बदल कदाचित नैसर्गिक असु शकतो पण हा बदलच अपेक्षित आहे… “माणूस हा केंद्रबिंदू” मानणारे बुद्धांचे तत्व हा जात वर्ण धर्म मोडीत काढणार शस्त्र आहे. इतकं जरी मनुष्याला समजल तरी जातीच्या भिंती आपोआप गळुन पडतील.
आकाश अनित्य
- गाडगेबाबांच्या “देव पाहिला का देव?” चा दाभोलकरी विपर्यास - December 20, 2021
- बाबासाहेबांच्या कल्पनेतील सामाजिक लोकशाहीच्या उभारणी करिता बहुजनांची जबाबदारी - January 22, 2021
- माझ्या आईला “जयभीमवाले” आवडत नाहीत - January 16, 2021
पुढे काय झालं.. त्यांना सांगितल का त्यांची प्रतिक्रिया काय होती. जात धर्म अणि माणूस ह्या मधली भिंत माणसाला तोडून टाकायची आहे..
पुढे आम्ही आजही मित्र आहोतच त्याची आई माझ्यासाठी कधी कधी दोन चपात्या भाजी जास्त पाठवते… आता माझ्या मित्राला माझ्याशी मैत्री असल्याचा कोणताही दबाव नाही… 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी घरी ये रात्री तू येशील आम्हाला माहीत आहे भेटून जा…अस म्हणतात
पुढं काय झालं ते ही सांगायला हवे होते.. परंतु ते अपुर्णच ठेवले आहे..
पाच वर्षांनी का होईना मित्राच्या आईच्या मानसिकतेत थोडा फरक पडला!
आपण आपल्या कृतीवर, आचरणावरच जास्त लक्ष दिलं पाहिजे, बाकीचे लोक आपली कृती पाहून आपोआप त्यांची मानसिकता बदलत जाईल…